LIVE NOW

LIVE: महाराष्ट्र द्वेष करणारे नेमके कोण? भाजप आमदाराचा मुख्यमंत्र्यावर निशाणा

कोरोनाचे अपडेट्स आणि राज्यासह देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स

Lokmat.news18.com | November 8, 2020, 9:17 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated November 8, 2020
auto-refresh

Highlights

9:44 pm (IST)

- राज्यपाल नियुक्त  विधान परिषद  12 जागा 
- विरोधी पक्षाकडून नवा पेच 
- आमचे 12 सदस्यांना नियुक्त करा 
- रयत क्रांती सेनेच्या वतीने यादी राज्यपालांना देणार
- आमदार सदाभाऊ खोत बुधवारी घेणार याज्यपालांची भेट
- राज्यपाल नियुक्त 12 जागांची मंत्रिमंडळ करतं शिफारस, मात्र सदाभाऊ खोत यांच्या संघटनेनं केली वेगळीच मागणी
- राज्यपाल काय उत्तर देतात, हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार

9:17 pm (IST)

पुण्यात दिवसभरात 217 रुग्णांची वाढ
पुण्यात दिवसभरात 259 रुग्णांना डिस्चार्ज
पुण्यात दिवसभरात 12 रुग्णांचा मृत्यू
पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 5146

8:32 pm (IST)

राज्यात दिवसभरात 5,092 नवीन रुग्ण
राज्यात दिवसभरात 110 रुग्णांचा मृत्यू
राज्यात दिवसभरात 8,232 कोरोनामुक्त
रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 91.71 टक्के
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्ण 96 हजार 372

6:41 pm (IST)

डोंबिवली स्टेशन परिसरात मोठी गर्दी
नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
डोंबिवलीकरांनो... प्रादुर्भाव कमी, धोका कायम

6:19 pm (IST)

भाजप प्रदेश सचिव दयानंद चोरघेंचा राजीनामा, चंद्रकांत पाटलांकडे दिला राजीनामा, ठाणे जिल्ह्यात भाजपला धक्का

6:02 pm (IST)

'मुख्यमंत्र्यांनी भाषणात योग्य भूमिका मांडली'
'माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम उत्तम'
मोहिमेचा सर्वांना फायदा -राजू वाघमारे
यापुढे सर्वांनी खबरदारी घ्यावी -राजू वाघमारे

5:59 pm (IST)

मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये दिवाळी खरेदीसाठी तुफान गर्दी, नागरिकांना कोरोनाचा विसर

4:32 pm (IST)

अतुल भातखळकरांची मुख्यमंत्र्यांवर टीका
'महाराष्ट्रद्वेष करणारे नेमके कोण?'
'हे भाषणात मुख्यमंत्री का सांगत नाहीत?'

4:31 pm (IST)

राम कदमांची ठाकरे सरकारवर टीका
'सामान्यांसाठी काय केलं हे सांगत नाहीत'
'आणि भाजपवर मात्र सीएम टीका करतात'
मदिरालय उघडं, मंदिर बंद -राम कदम
'एसटी कर्मचाऱ्यांना पगार नाही ही स्थिती'

4:28 pm (IST)

नांदेड - संभाजीराजे छत्रपतींच्या नेतृत्वात मराठा आरक्षण एल्गार मेळावा पडला पार, अनेक कार्यक्रमांना हजारो लोक जमतात, या मेळाव्याला अडीचशे लोकांना परवानगी, न्याय द्यायचा तर समान न्याय द्या -संभाजीराजे छत्रपती

माझा लढा फक्त मराठा समाजासाठी नाही, बहुजन समाजाला एकत्र आणण्याचं ध्येय, मी नेतृत्वासाठी बाहेर पडलो नाही, घटक म्हणून समाजासाठी काम करतो, मराठा समाजाचा सेवक म्हणून काम करायचंय, मराठा समाज ओबीसीविरोधात नाही -संभाजीराजे
बुद्धिवंत लोकांची समिती स्थापन करा, कोर्टात भूमिका मांडताना या समितीचा सल्ला घ्या, इथून पुढे चुका न करण्याचं आवाहन, संभाजीराजेंची अशोक चव्हाणांवर टीका

Load More
कोरोनाचे अपडेट्स आणि राज्यासह देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स