LIVE : नवी मुंबईत रुबी गोदामाला भीषण आग

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | March 07, 2021, 19:04 IST |
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  21:55 (IST)

  बीड-परळी महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकची रिक्षा-दुचाकी-टाटा एसीला धडक, अपघातात 5 जण ठार तर 7 जण गंभीर जखमी

  20:36 (IST)

  नाशिक - विद्रोही साहित्य संमेलनही स्थगित
  25 आणि 26 मार्चला होतं नियोजन
  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय

  20:32 (IST)

  आईनंच घेतला केवळ एक महिन्याच्या मुलीचा जीव, नवजात मुलीला पाण्याच्या बकेटमध्ये बुडवून केलं ठार, दुसऱ्यांदाही मुलगी झाली म्हणून रागाच्या भरात पोटच्या गोळ्यालाच संपवलं, चिपळूणच्या वहाळ गावातील दुर्दैवी घटना, विकृत महिलेला चिपळूण पोलिसांनी घेतलं ताब्यात, महिलेवर खुनाचा गुन्हा दाखल

  19:44 (IST)

  सावधान ! राज्यात कोरोनानं चिंता वाढवली
  राज्यात करोनाचा आकडा 11 हजारांवर
  राज्यात कोरोनाची संख्या 11 हजारांवर
  राज्यात दिवसभरात 38 रुग्णांचा मृत्यू
  राज्यात दिवसभरात 6 हजार 13 रुग्ण बरे
  रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 93.17 टक्के

  19:31 (IST)

  ठाणे - मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण
  रेतीबंदर खाडीत सापडला होता मृतदेह
  मनसुख हिरेन यांचा मृतदेह तिथं कसा आला?
  ATS क्राईम सीन रिक्रिएट करणार - सूत्र
  एटीएसचे डीआयजी शिवदीप लांडे यांनी घटनास्थळाची परिस्थिती समजून घेतली
  घरापासूनचं CCTV फुटेजही पडताळणार - सूत्र
  मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचं गूढ अद्याप कायम
  उलगडा करण्यासाठी एटीएसकडून जोरदार प्रयत्न

  19:10 (IST)

  मुंबईत सध्या लॉकडाऊनचा विचार नाही - शिंदे
  नियमांचं पालन करणं आवश्यक - एकनाथ शिंदे

  18:43 (IST)

  नवी मुंबई
  - पनवेल पालिका हद्दीतील धानसर गाव परिसरात असलेल्या रुबी गोदामाला भीषण आग 
  - अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल
  - आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरूच 
  - सुमारे साडेचार वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीला नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू

  18:40 (IST)

  औरंगाबाद - 15 फेब्रुवारीपासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ, पूर्ण लॉकडाऊनपेक्षा अंशत: लॉकडाऊन लावणार, 11 मार्चपासून रात्री 12 ते 4 एप्रिलपर्यंत नवीन नियमावली लागणार, त्यानंतर रुग्ण वाढले तर लागणार लॉकडाऊन; राजकीय-सामाजिक सभा, आठवडी बाजार, क्रीडा स्पर्धा, शाळा, महाविद्यालय बंद असणार, औरंगाबाद शहरातील मंगल कार्यालय बंद राहणार, विवाह सोहळे होणार नाहीत; औरंगाबादेत प्रत्येक शनिवारी, रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता लॉकडाऊन राहणार -जिल्हाधिकारी

  18:22 (IST)

  ठाणे - मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण
  हिरेनप्रकरणी एटीएसची कारवाई सुरू
  पुतळा बनवून करणार नाट्यरूपांतर
  मनसुख हिरेनच्या मृत्यूचं होणार रिक्रिएशन
  मृत्यू कशामुळे झाला याचं उत्तर शोधणार
  घटनास्थळी ATS करणार रिक्रिएशन
  आज रात्री करू शकतात रिक्रिएशन

  17:45 (IST)

  महिलांसाठी रिलायन्स समूहाचं महत्वाचं पाऊल, महिलांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्मची निर्मिती, रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांची घोषणा, डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे सशक्तीकरण आणि सुसंवाद, जगभरातील महिलांना एकत्र आणण्याचा मानस

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स