• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Live : सेंट जॉर्ज हॉस्पिटलमधील ब्लड बँकेला आग; अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण आणण्यात यश

Live : सेंट जॉर्ज हॉस्पिटलमधील ब्लड बँकेला आग; अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण आणण्यात यश

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | July 05, 2021, 23:28 IST
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  22:14 (IST)

  भाजप उद्या संपूर्ण राज्यभर निलंबनाविरोधात आंदोलन करणार

  21:36 (IST)

  12 आमदारांचं निलंबन ही तर सूडभावनेनं केलेली कारवाई, जनता महाविकास आघाडी सरकारला माफ करणार नाही, सत्ता जाईल या भीतीपोटी भाजपचा आकडा कमी करण्याचा नियोजनबद्ध कट, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचा आरोप, कितीही मुस्कटदाबी केलीत तरी जनतेच्या प्रश्नांसंदर्भात आक्रमकता कमी होणार नाही - प्रवीण दरेकर

  20:50 (IST)

  शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाचा जीआर
  जीआर अद्याप अपूर्ण, काही SOP मध्ये बदल होणार
  आज काढण्यात आलेला जीआर पुन्हा मागे घेतला
  शिक्षणमंत्र्यांच्या सूचनेनुसार नवीन जीआर काढणार
  राज्य शिक्षण विभागाची 'न्यूज18 लोकमत'ला माहिती

  18:55 (IST)

  केंद्रीय मंत्रिमंडळाचा दोन-तीन दिवसांत विस्तार?
  महाराष्ट्रातील 2 नेत्यांची केंद्रात वर्णी लागणार?
  केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारावर बैठकांचं सत्र

  18:21 (IST)

  भाजपचे 12 निलंबित आमदार राज्यपालांना भेटले
  आशिष शेलारांच्या नेतृत्वाखाली राज्यपालांची भेट
  निलंबन कारवाईविरोधात राज्यपालांशी केली चर्चा
  भाजपचे 12 आमदार एक वर्षासाठी निलंबित
  निलंबन कारवाईनंतर भाजपचा आक्रमक पवित्रा
  सभागृहात जे घडलं नाही ते दाखवलं - शेलार
  राज्यपालांकडे सत्य परिस्थिती मांडली - शेलार
  निलंबित करण्याचं सरकारकडून षड‌‌्यंत्र - शेलार
  आम्ही अपशब्द वापरला नाही - आशिष शेलार
  'राज्यपालांनी अहवाल मागवून कार्यवाही करावी'
  या मुस्कटदाबीला आम्ही घाबरणार नाही - शेलार

  18:0 (IST)

  भाजपचे 12 निलंबित आमदार राजभवनवर
  आशिष शेलारांच्या नेतृत्वाखाली आमदार भेटीला
  निलंबनाच्या कारवाईविरोधात राज्यपालांशी चर्चा

  17:21 (IST)

  'सत्ताधारी-विरोधकांनी एकत्र काम करणं आवश्यक'
  'कमी कालावधीत जास्त प्रश्न मांडण्याचा मानस'
  विरोधकांना आधी बोलण्याची संधी दिली - भास्कर जाधव
  ठराव मांडण्यापूर्वीच विरोधकांकडून हरकत - जाधव
  'ओबीसी आरक्षणाबाबत भुजबळांनी प्रस्ताव आणला'
  'भाजप आमदारांनी अस्वस्थतेतून गोंधळ घातला'
  'राज्याच्या परंपरेला काळिमा फासण्याचं काम'
  सभागृहातलं वर्तन लांच्छनास्पद - भास्कर जाधव

  16:28 (IST)

  भाजपच्या बैठकीत उद्याची रणनीती ठरली
  आज कुठल्याच कामकाजात सहभागी होणार नाही
  निलंबनावर उद्या मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवणार

  16:8 (IST)

  भाजपचे निलंबित 12 आमदार राज्यपालांना भेटणार
  संध्याकाळी 5.30 वा. भगतसिंह कोश्यारींना भेटणार

  15:55 (IST)

  एमपीएससी‌ परीक्षेसाठी मोठी बातमी
  SEBCसाठी वयोमर्यादा 43 वर्षांपर्यंत वाढवली

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स