Live Updates: लता मंगेशकर यांचा उपचारांना सकारात्मक प्रतिसाद

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | February 05, 2022, 20:15 IST
  LAST UPDATED 8 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  20:55 (IST)

  'पुणे मनपा आवारात सोमय्यांना धक्काबुक्की'
  'धक्काबुक्की करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार'
  पुण्याच्या डीसीपी नम्रता पाटील यांची माहिती 

  20:31 (IST)

  लतादीदींची प्रकृती स्थिर - आशा भोसले
  लतादीदींचा उपचारांना प्रतिसाद - आशा भोसले 

  20:17 (IST)

  अन्न, औषध प्रशासनमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणेंना कोरोना
  काल राज्यपालांच्या दौऱ्यात डॉ.शिंगणेची उपस्थिती
  राज्यपालांनाही करावी लागू शकते कोरोना चाचणी 

  20:14 (IST)

  गानसम्राज्ञी लतादीदी मंगेशकर यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु, लतादीदींच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी केंद्रीय मंत्री पीयुष गोयल ब्रिच कॅंडी रुग्णालयात पोहचले, भाजप मुंबई प्रदेश अध्यक्ष मंगल प्रभात लोढा सुद्धा रूग्णालयात दाखल, थोड्या वेळापूर्वी रश्मी ठाकरे रुग्णालयात दाखल, आतापर्यंत राज ठाकरे, आशा भोसले, सुप्रिया सुळे, मधुर भांडारकर, मंगलप्रभात लोढा, पियूष गोयल यांनी रुग्णालयात जावून लतादीदींच्या प्रकृतीची विचारपूस केली

  19:20 (IST)

  सोमय्यांच्या पुणे दौऱ्यात शिवसैनिकांचा राडा
  किरीट सोमय्यांविरोधात शिवसेना आक्रमक
  शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांची गाडी अडवली
  कायदेशीर भाषेत प्रत्युत्तर देणार - चंद्रकांत पाटील
  'मुद्यावरून गुद्यावर येण्याची भाजपची संस्कृती नाही'
  किरीट सोमय्यांची प्रकृती ठिक - डॉ.पराग संचेती
  'सोमय्या खाली पडल्यानं मुका मार लागलाय'
  किरीट सोमय्यांना कुठेही फ्रॅक्चर नाही - डॉक्टर
  '24 तास अंडर मेडिकल ऑब्झर्वेशन ठेवणार'
  पुण्यातील डॉ. पराग संचेती यांची माहिती

  17:18 (IST)

  सिंधुदुर्ग - शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरण
  नितेश राणेंच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी
  खटला वर्ग करण्याबाबतही सोमवारी सुनावणी
  सरकारी वकिलांच्या अर्जावर होणार सुनावणी

  सिंधुदुर्ग - शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात आमदार नितेश राणेंच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी तर नितेश राणेंचं प्रकरण न्यायाधीश आर.बी. रोटेंकडून दुसऱ्या न्यायाधीशांकडे वर्ग करण्याच्या सरकारी वकिलांच्या अर्जावरही सोमवारी होणार सुनावणी

  सोमवारी दोन अर्जांवर सुनावणी आहे 

  16:40 (IST)

  लतादीदींवर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार
  लता मंगेशकरांवर आयसीयूत उपचार सुरू
  लतादीदींचा उपचारांना प्रतिसाद - डॉक्टर 

  She is under aggressive therapy. We are continuously observing her. She continues to be in ICU, she is under serious observation. Her treatment is going on in Breach Candy hospital.

  डॉक्टर प्रतीत सदनानी
  ब्रीच कँडी रुग्णालय

  16:11 (IST)

  - नितेश राणे जामीन अर्ज सुनावणी 
  - सरकारी वकीलांनी केला अर्ज 
  - जिल्हा न्यायालयाला केला अर्ज 
  - बी आर रोटे यांच्या न्यायालयातून केस दुसरीकडे पाठवण्याची केली विनंती 
  - राणे आणि सरकारी वकीलांचा कोर्टात जोरदार वाद

  सतिश माने - शिंदे 

  - “सरकारी वकील मुद्दाम वेळ काढतायेत”
  - “सरकारी वकील बदमाशी करताहेत”
   

  15:44 (IST)

  'काँग्रेससोबत आम्ही आजही जाण्यास तयार आहोत, त्यांनी एक पाऊल पुढं टाकावं'
  'सध्या सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीकडूनही प्रस्ताव आला तर वंचित विचार करेल'
  प्रकाश आंबेडकर यांचं मोठं वक्तव्य

  15:43 (IST)

  पुण्यात नाना पटोलेंच होणार जंगी स्वागत, 

  विद्यापीठ चौकातून निघणार परिवर्तन रँली, 

  कार्यकर्ते विद्यापीठ चौकात जमले, 

  उत्साहाचं वातावरण हातात झेंडे घेऊन कार्यकर्ते हजर

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स