LIVE:अमित देशमुखांची चर्चा फळाला, वैद्यकीय महाविद्यालय प्राध्यापक संप मागे
कोरोनाचे अपडेट्स आणि राज्यासह देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स
Lokmat.news18.com | November 5, 2020, 9:34 PM IST
Last Updated November 5, 2020
auto-refresh
Highlights
9:34 pm (IST)
दिवाळीच्या तोंडावर सिडकोचा लॉटरी विजेत्यांना दिलासा
घराच्या नोंदणीसाठी केवळ 1 हजार रुपये मुद्रांक शुल्क
9:29 pm (IST)
'राज्य सरकारनं स्वतंत्र कृषी कायदा करावा'
'एमएसपी' अनिवार्य करावी -अशोक चव्हाण
'शेतकरीहिताच्या विविध तरतुदींचा समावेश असावा'
सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाणांची मागणी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिलं निवेदन
8:06 pm (IST)
कोल्हापुरातील धक्कादायक प्रकार
पंचगंगेत उडी टाकून आत्महत्येचा प्रयत्न
लग्नाला नकार दिल्यानं प्रेयसीचं कृत्य
प्रेयसीच्या उडीनंतर प्रियकराचीही नदीत उडी
नागरिकांनी दोघांनाही नदीतून बाहेर काढलं
सध्या प्रेयसी-प्रियकराची प्रकृती स्थिर
मात्र दोघांवरही करवीर पोलिसात गुन्हा
7:35 pm (IST)
राज्यात दिवसभरात 5,246 नवे रुग्ण
राज्यात दिवसभरात 117 रुग्णांचा मृत्यू
राज्यात दिवसभरात 11,277 रुग्ण बरे
रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 91.07 टक्के
राज्यात सध्या 1,06,519 अॅक्टिव्ह रुग्ण
7:32 pm (IST)
पुणे - दिवसभरात 228 रुग्णांची वाढ
पुण्यात दिवसभरात 356 रुग्णांना डिस्चार्ज
पुण्यात दिवसभरात 22 रुग्णांचा मृत्यू
पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 5,497
7:20 pm (IST)
युरोपमध्ये कोविडची दुसरी लाट -राजेश टोपे
'थंडीच्या दिवसात अधिक सतर्कतेची गरज'
राज्यात यंदाची दिवाळी फटाकेमुक्त होणार?
दिवाळीत फटाकेबंदीचा आरोग्य विभागाचा विचार
फटाक्यांमुळे श्वसननलिकेला त्रास -राजेश टोपे
'फटाके बंदीवरून काही मतभेद असू शकतात'
2-3 दिवसांत याबाबत निर्णय होऊ शकतो -टोपे
6:19 pm (IST)
दिल्ली - दिवाळीत फटाके फोडता येणार नाहीत
दिल्लीत सर्व प्रकारच्या फटाक्यांवर निर्बंध
दिल्लीत फटाकेही खरेदी करता येणार नाहीत
वाढत्या वायुप्रदूषणामुळे दिल्ली सरकारचा निर्णय
6:16 pm (IST)
राज्यात अन्न सुरक्षा अंतर्गत शिधापत्रिका असणारे 7 कोटी लोक, 1 कोटी 60 लाख कार्ड, दिवाळीआधी प्रतिकार्ड 20 रुपये किलो साखर दिली जाईल -छगन भुजबळ
6:01 pm (IST)
राज्यातील शाळांना 5 दिवसांची दिवाळी सुट्टी
12 ते 16 नोव्हेंबर अशी शाळांना सुट्टी जाहीर
शालेय शिक्षण विभागानं काढलं परिपत्रक
5:59 pm (IST)
लोकलसेवेबाबत वारंवार पत्रव्यवहार -वडेट्टीवार
'लोकलसंदर्भात केंद्र सरकारला क्रेडिट घ्यायचंय'
त्यामुळे परवानगी दिली जात नाही -वडेट्टीवार