• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • LIVE: MPSCबाबत मंत्रिमंडळात चर्चा करणार, आदित्य ठाकरेंची माहिती

LIVE: MPSCबाबत मंत्रिमंडळात चर्चा करणार, आदित्य ठाकरेंची माहिती

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | July 04, 2021, 13:54 IST
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  21:54 (IST)

  राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेतर्फे सन 2017-2018 साठी महाराष्ट्र विधान परिषद उत्कृष्ट भाषण पुरस्कार विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांना जाहीर

  21:26 (IST)

  राज्य मंत्रिमंडळ बैठकीत केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात ठराव करून नवीन कायदा राज्यात करण्यासंदर्भात चर्चा, ओबीसी राजकीय आरक्षण आणि मराठा आरक्षणावर चर्चा केली, अधिवेशनात ठराव करण्याबाबत चर्चा

  21:18 (IST)

  'या क्षणाला सेना-भाजप युती होईल असं वाटत नाही'
  भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य
  'शिवसेना आणि आम्ही एकत्र येऊ असं दिसत नाही'
  भविष्यात जर सेनेला वाटलं तर बदल होईल - मुनगंटीवार

  21:1 (IST)

  कॅबिनेटची 'सह्याद्री'वर झाली मॅरेथॉन बैठक
  3 तासांपेक्षाही अधिक वेळ बैठकीत खलबतं
  राज्य मंत्रिमंडळ बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा
  स्वप्नील आत्महत्या प्रकरणावरून बैठकीत चर्चा
  MPSC परीक्षेबाबत सरकार समिती गठित करणार
  समिती अभ्यास करून शासनाला अहवाल देणार
  स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येनंतर सरकारला जाग

  21:1 (IST)

  कॅबिनेटची 'सह्याद्री'वर झाली मॅरेथॉन बैठक
  3 तासांपेक्षाही अधिक वेळ बैठकीत खलबतं
  राज्य मंत्रिमंडळ बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा
  स्वप्नील आत्महत्या प्रकरणावरून बैठकीत चर्चा
  MPSC परीक्षेबाबत सरकार समिती गठित करणार
  समिती अभ्यास करून शासनाला अहवाल देणार
  स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येनंतर सरकारला जाग

  20:37 (IST)

  राज्यात दिवसभरात 9,336 रुग्णांची नोंद
  राज्यात दिवसभरात 3,378 कोरोनामुक्त
  राज्यात दिवसभरात 123 रुग्णांचा मृत्यू
  रिकव्हरी रेट 95.91 तर मृत्युदर 2.1 टक्के
  राज्यात 1 लाख 23,225 अॅक्टिव्ह रुग्ण

  19:48 (IST)

  अनिल देशमुखांची सुप्रीम कोर्टात याचिका, ईडीनं कारवाई करू नये यासाठी याचिका दाखल, अनिल देशमुखांच्या वकिलांची माहिती

  18:30 (IST)

  अधिवेशन पूर्वसंध्येला भाजपची पत्रकार परिषद
  कालावधीवरून मविआ सरकारवर हल्लाबोल
  'कार्यकाळात 5 दिवसही अधिवेशन झालं नाही'
  '2 दिवसांचं अधिवेशन घेण्याचा रेकॉर्ड'
  अधिवेशनाचे दिवस घटवल्यानं हल्लाबोल
  लोकशाहीला कुलूप लावण्याचं काम - फडणवीस
  'विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न'
  'लोकशाहीचे नियम पायदळी तुडवले'
  'उद्या बिलं मांडून त्यावर चर्चा होईल'
  'परवा पुरवणी मागण्या मांडल्या जातील'
  '2 दिवसांत अनेक मुद्दे मांडायचे कसे?'
  'इथं मांडता येत नाही ते बाहेर मांडणार'
  'हे सर्व विषय लावून धरण्याचा प्रयत्न करू'
  'लोकशाहीची थट्टा तात्काळ बंद करा'
  'कोरोनाच्या नावावर बाकी सर्व सुरू'
  'सरकार अधिवेशनापासून पळ काढतंय'
  सरकारचा चेहरा उघडा पाडू - फडणवीस
  3 पक्षात कुठलंही एकमत नाही - फडणवीस
  'अध्यक्षाची निवडणूक होईल असं वाटत नाही'
  सर्व चौकशा कोर्टाच्या आदेशानं - फडणवीस
  'ओबीसी आरक्षणाचा प्रश्न फक्त महाराष्ट्रात'
  '50 टक्के ओबीसी आरक्षण गेलं नसतं'
  'डेटासंदर्भात दिशाभूल करण्याचं काम'
  'जाणीवपूर्वक केंद्रावर आरोप करतायत'
  'मराठा आरक्षणाची लढाई सोपी नाही'
  'MPSC विद्यार्थ्याची आत्महत्या दुर्दैवी घटना'
  'MPSC मंडळाच्या कारभाराचा आढावा घ्यावा'
  देवेंद्र फडणवीसांची सरकारला विनंती
  'प्रसिद्धी नेमकी कुणाची, कशाची चाललीय'
  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा सवाल
  'कोणत्या विभागावर किती खर्च होतोय हे सांगा'
  सर्व माहिती मिळाली पाहिजे - फडणवीस
  'सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करणार'
  'जनतेसाठी लढाई लढण्याची आमची तयारी'
  'राजकारणात परिस्थितीवर निर्णय होतात'
  'शिवसेना-भाजपात शत्रुत्व कधीच नव्हतं'
  वैचारिक मतभेद आहेत - देवेंद्र फडणवीस
  सरकारी पक्षाचा बचावात्मक पवित्रा - फडणवीस
  'ज्याच्याबद्दल सापडेल त्याचा राजीनामा मागू'

  17:18 (IST)

  कोरोना चाचणीतील 4 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
  विधान भवन परिसरात सुरू आहे कोरोना चाचणी
  काल एकूण 2200 जणांची चाचणी, 4 जण पॉझिटिव्ह
  लिपिक, फायरमन, 2 शिपाई यांचा अहवाल पॉझिटिव्ह
  रविवारी सुरू असलेल्या चाचण्यांचा अहवाल येणं बाकी

  15:51 (IST)

  धारावीत आज कोरोनाचा एकही रुग्ण नाही
  दादर 6 तर माहीममध्ये 7 रुग्णांची नोंद

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स