Live Updates: ST bus Strike : आतापर्यंत 9 हजार 625 संपकरी कर्मचारी निलंबित, 1990 जणांची सेवासमाप्त

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | December 04, 2021, 22:23 IST |
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  20:29 (IST)

  देशपातळीवरील भाजपविरोधी आघाडी ही काँग्रेसशिवाय होऊच शकत नाही, कारण देशभरात पाळंमुळं रुजलेला काँग्रेस हाच 

  एकमेव पक्ष आहे, जेव्हा वेळ येईल तेव्हा काँग्रेस नेतृत्व मोदींविरोधात आघाडी बनवण्यासाठी पुढाकार घेईलच की, इतरांनी त्याची 

  उगीच चिंता करू नये, ममतांसारख्या प्रादेशिक नेत्यांनी संयम पाळला पाहिजे - पृथ्वीराज चव्हाण

  20:26 (IST)

  फडणवीसांनी घेतली मृत अमोल इघेंच्या कुटुंबाची भेट
  भाजप पदाधिकाऱ्याची 10 दिवसांपूर्वी झाली होती हत्या
  अद्यापही कुटुंबाला योग्य न्याय नाही - देवेंद्र फडणवीस
  प्रकरणातील अजूनही उर्वरित आरोपी बाहेर - फडणवीस
  तात्काळ अटक करण्याची देवेंद्र फडणवीसांची मागणी
  कोर्टात केस चालून आरोपीला फाशी व्हावी - फडणवीस
  अधिवेशनातही हा विषय लावून धरणार - फडणवीस

  19:54 (IST)

  ओमायक्रॉनला रोखण्यासाठी महापालिका सज्ज
  मुंबई महापालिका नेहमीच सतर्क असते - महापौर
  आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचे निर्देश - महापौर
  कोरोना नियमावलीचं पालन करा - किशोरी पेडणेकर
  तिसऱ्या लाटेला आपण येऊ दिलं नाही - महापौर
  'ओमायक्रॉन येणार नाही याची शपथ सर्वांनी घेऊया'

  19:33 (IST)

  महाराष्ट्रात ओमायक्रॉन व्हेरियंटची एन्ट्री
  द.आफ्रिकेतून आलेल्या 33 वर्षीय प्रवाशाला लागण
  कल्याण-डोंबिवलीत ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण
  रुग्णाला सौम्य लक्षणं, कोविड सेंटरमध्ये उपचार

  19:0 (IST)

  पुणेकरांचं पाणी तोडणार नाही - जयंत पाटील
  खुलासा केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद - मुरलीधर मोहोळ
  'आपल्याच खात्यामार्फत पाणीकपातीचे आदेश का?'
  जलसंपदा मंत्र्यांनी याचं उत्तर द्यावं - पुणे महापौर
  'फडणवीसांचं नाव घेण्याचं काहीच कारण नाही'
  'पुणेकरांच्या रोषाच्या भीतीपोटीच पाणीकपात रद्द'
  'पाण्यावरून विनाकारण राजकारण करू नये'
  पुणे महापौर मुरलीधर मोहोळांचा राष्ट्रवादीला टोला

  18:41 (IST)

  आशिष शेलारांकडून मुंबईकरांची दिशाभूल - महापौर
  पत्रकार परिषद घेऊन चर्चेत राहण्याचा प्रयत्न - महापौर
  'सरकार स्थापन झाल्यापासून लोक काम पाहतायत'
  'भूखंडाच्या अदलाबदलीचा इतिहास सांगितला नाही'
  अदलाबदल नकोय, हरकत नाही - किशोरी पेडणेकर
  'सॉल्ट डिव्हिजनसाठी 15 वर्षं केंद्राकडे पाठपुरावा'
  'केंद्राच्या मालकीच्या जागेचा ताबा मिळाला नाही'
  विकास आला की हे का बिथरतात? - महापौर
  महापौरांनी आशिष शेलारांच्या आरोपांचं केलं खंडन
  शेलारांच्या आरोपांचं मी खंडन करतो - यशवंत जाधव
  आम्ही कोणतीही गोष्ट लपवत नाही - यशवंत जाधव
  शेलारांनी सभागृहाची शिस्त शिकवू नये - जाधव
  शेलारांनी संस्काराचे धडे देणं म्हणजे विनोद - जाधव
  'नायर रुग्णालयातील 'ती' घटना चीड आणणारीच'
  हे लोक फक्त राजकरण करण्यासाठी जातात - जाधव
  मनपा निवडणुकीत सेनेचा विजय होणार - यशवंत जाधव
  शेलार नैराश्येत, पायाखालची वाळू सरकतेय - यशवंत जाधव

  17:57 (IST)

  जयंत पाटलांची देवेंद्र फडणवीसांवर टीका
  'साहित्य संमेलनावरून राजकारण करू नये'
  पुणे महापालिकेतील राजकीय आघाडीचा मुद्दा
  स्थानिक प्रतिनिधीच निर्णय घेतील - जयंत पाटील

  17:39 (IST)

  भारतीय नौदलाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष
  नौदलाकडून खास कार्यक्रमाचं आयोजन
  गेट वे ऑफ इंडियावर शानदार कार्यक्रम
  'गेट वे'वर नौदलाकडून चित्तथरारक कसरती

  16:31 (IST)

  राज्यात नोव्हेंबरमध्ये 26,093 बेरोजगारांना रोजगार, कौशल्य विकासमंत्री नवाब मलिकांची माहिती

  16:24 (IST)

  शिवसेना सावरकरांची कसली वारसदार - फडणवीस
  शिवसेनेला लाज वाटली पाहिजे - देवेंद्र फडणवीस
  जावेद अख्तरांसारखे लोक एकांगी - फडणवीस
  कोणाच्या तरी प्रेरणेतून बोलतात - फडणवीस
  'अशा लोकांनी पुरस्कार परत केले, टीकाही केली'
  पण लोक मोदींच्या मागे आहेत - देवेंद्र फडणवीस
  ते नैराश्येपोटी बोलत आहेत - देवेंद्र फडणवीस

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स