LIVE : राज्याच्या विविध भागात 20 पर्यटन महोत्सवांचे आयोजन

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | February 04, 2021, 18:08 IST |
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  20:56 (IST)

  राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा या वर्षीचा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार
  ज्येष्ठ व्हायोलिन वादक, गुरू विदुषी डॉ.एन. राजम यांना जाहीर, 5 लाख रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप

  20:16 (IST)

  ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचं निधन, पुण्यातील राहत्या घरी 83व्या वर्षी निधन, 'झपाटलेला' चित्रपटात त्यांची 'बाबा चमत्कार' ही भूमिका गाजली

  20:8 (IST)

  मंत्रिमंडळ बैठकीत कोरोनाबाबत सादरीकरण 
  कोविडचं लसीकरण वेगानं सुरू -उद्धव ठाकरे
  'ब्रिटन, ब्राझीलमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग'
  आपल्याकडेही बेफिकीर राहू नका -मुख्यमंत्री
  अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज -मुख्यमंत्री
  'राज्यात सुमारे साडेतीन लाखांचं लसीकरण'

  20:5 (IST)

  नाना पटोलेंचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा
  महाविकास आघाडीतील घटकपक्षांची नाराजी
  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली नापसंती
  'महाविकास आघाडीचं सरकार होत होतं स्थिर'
  पटोलेंना राजीनामा देण्याची गरज नव्हती -मुख्यमंत्री
  अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर अध्यक्षांचा राजीनामा
  पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मुद्दा सरकारसमोर
  सह्याद्रीवरील मंत्रिमंडळ बैठकीनंतर याबाबत चर्चा झाल्याची माहिती

  19:35 (IST)

  बेकायदेशीर पिस्तूल विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा केला पर्दाफाश, बारामती तालुका पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

  19:13 (IST)

  नाशिक जिल्ह्यातील लोकांना मोठा दिलासा
  आज एकाही कोरोना बळीची नोंद नाही
  8 महिन्यांत बळी नोंद नसलेला पहिला दिवस
  नाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे नवे 145 रुग्ण

  19:4 (IST)

  ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या प्रयत्नाला यश, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय पारित, विकासकामासाठी, गुंठेवारी प्रकरणं नियमित करण्यासाठी नागपूर सुधार प्रन्यास हवंच -नितीन राऊत

  18:31 (IST)

  इराणचा पाकिस्तानमध्ये 'सर्जिकल स्ट्राईक'
  2 अपहरण केलेल्या सैनिकांना सोडवलं

  18:16 (IST)

  काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यानं उपमुख्यमंत्री म्हणून मागणी केलेली नाही, कुठून बातमी आली माहीत नाही, पण यावर तिन्ही पक्ष एकत्र बसून चर्चा करू -अस्लम शेख

  18:16 (IST)

  नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहेच, पण राज्यात विधानसभा अध्यक्ष कोण होणार? दिल्लीतून याचं उत्तर मिळेल -अस्लम शेख

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स