राज्यात सोमवारी रात्री 8 पासून कठोर निर्बंध
राज्यात 30 एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध लागू
शनिवार, रविवार राज्यात पूर्ण लॉकडाऊन
शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी स.7 लॉकडाऊन
कोरोना थोपविण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय
अर्थचक्राला धक्का नाही, श्रमिकांना त्रास नाही
सर्व प्रकारची वाहतूक नियमितपणे सुरूच
बसमध्ये स्टँडिंग प्रवासाला घातला प्रतिबंध
रिक्षामध्ये चालकासह 2 प्रवाशांना परवानगी
राज्यात गर्दीची ठिकाणं बंद राहणार
खासगी कार्यालयांना वर्क फ्रॉम होम बंधनकारक
केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरू
रात्री संचारबंदी तर दिवसा जमावबंदी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं सहकार्याचं आवाहन
मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांनाही घेतलं विश्वासात
यापुढे 'ब्रेक दी चेन' असं संबोधण्यात येणार
राज्यात शेतीविषयक कामं सुरू राहणार
अन्नधान्य, शेतमालाची वाहतूक सुरू राहणार
वित्तीय सेवा सोडून इतर खासगी कार्यालयं बंद
शासकीय कार्यालयं 50% क्षमतेनं सुरू राहणार
चित्रपटगृहं, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहं बंद राहणार
व्हिडिओ पार्लर्स, क्लब, जलतरण तलाव बंद
क्रीडा संकुलं, सभागृहं, वॉटर पार्क बंद राहणार
सर्व धर्मीयांची स्थळं, प्रार्थनास्थळं बंद राहणार
हॉटेल आणि बार पूर्णत: बंद राहणार
मात्र टेक अवे किंवा पार्सलची सेवा सुरू राहील
खाद्य विक्रेत्यांसाठी पार्सल सेवेची परवानगी
नियमांचं पालन होत नसल्यास कारवाई होणार
ई-कॉमर्स सेवा नियमितपणे सुरू राहणार
सर्व कटिंग सलून, ब्युटी पार्लर्स, स्पा बंद राहणार
वृत्तपत्रं छपाई आणि वितरण सुरू राहणार
राज्यातील शाळा-कॉलेज बंद राहणार
मात्र 10वी, 12 परीक्षांचा अपवाद असेल
उद्योग आणि उत्पादन क्षेत्र सुरूच राहणार
मोजक्या माणसांमध्ये शूटिंगला परवानगी
राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी
आजारी कामगाराला काढता येणार नाही
5हून अधिक रुग्ण तर सोसायटी मिनी कंटेन्मेंट

