Live Updates: परमबीर सिंग यांनी निलंबनाची नोटीस स्वीकारली

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | December 03, 2021, 23:59 IST |
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  21:24 (IST)

  पुणेकरांचं पाणी तोडण्याचा प्रयत्न करू नये - फडणवीस
  '...तर हीच जनता पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही'
  फडणवीसांनी फुंकलं पुणे मनपा निवडणुकीचं रणशिंग
  'ही गर्दी भाजपचं शक्तिप्रदर्शन नव्हे, कार्यकर्त्यांचा उत्साह'
  'यापूर्वी सोबत असलेले आता मांडीला मांडी लावून'
  'जे रोज उठून सावरकरांचा करतायत अपमान'
  'हो आम्ही हिंदुत्ववादी आहोत, सावरकरवादी आहोत'
  हे आम्ही ठणकावून सांगणार - देवेंद्र फडणवीस
  मोदीजींच्या नेतृत्वात लस तयार झाली - फडणवीस
  '...अन्यथा विचार करा आज काय झालं असतं?'
  'मविआ सरकार सांगतंय आम्ही 10 कोटी लसी दिल्या'
  'मोदींनी लसी दिल्या नसत्या तर काय दिलं असतं?'
  फडणवीसांचा महाविकास आघाडी सरकारला सवाल
  इंग्लंडच्या पीएमनं मोदींचं कौतुक केलंय - फडणवीस
  मोदींच्या नेतृत्वात देश पुढे जातोय - देवेंद्र फडणवीस
  महाराष्ट्रात फक्त वसुली सुरू, फडणवीसांचा घणाघात
  'कोरोना काळात फक्त भाजप कार्यकर्त्याकडून सेवा'
  पुणेकरांच्या मनामनात फक्त भाजप - फडणवीस
  'पुढच्या 25 वर्षांचं नियोजन डोळ्यासमोर ठेवून विकास'
  पुण्यात शिवसेना नावालाही उरली नाही - फडणवीस
  राष्ट्रवादी ही तर भ्रष्टवादी पार्टी - देवेंद्र फडणवीस
  'म्हणून पुणेकर आमच्याच पाठीमागे उभे राहतील'

  20:22 (IST)

  सुभाष देसाईंनी वाचून दाखवला उद्धव ठाकरेंचा संदेश
  माझी प्रकृती आता चांगली, मुख्यमंत्र्यांचा संदेश
  'ओमायक्रॉन व्हेरियंटचा धोका समोर आलाय'
  'मन टवटवीत करण्यासाठी संमेलन आवश्यक होतं'
  मराठीची आजन्म सेवा व्हावी, मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा
  'अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न सुरूच'

  20:17 (IST)
  रंगनाथ पठारे समितीनं अहवाल दिलाय, आता अजून पुराव्यांची आवश्यकता नाही असं केंद्र सरकार म्हणतं, मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा न देणं हा भाषेचा आणि मराठी नागरिकांचा अपमान, 12 करोड मराठीजन आता थेट राष्ट्रपतींना पत्र पाठवणार, या साहित्य संमेलनात ठराव करावा ही आमची मागणी - सुभाष देसाई
   
  20:13 (IST)

  बोलण्याचं माध्यम म्हणजे भाषा, मात्र जगात भाषाच वादाचं कारण झालंय कूपमंडुक वृत्तीच्या लोकांमुळे, संत साहित्य हे खरं अध्यात्म, संतांच्या रचना आणि दोहे हे खरं अभिजात साहित्य, लेखणी-साहित्यात मोठी ताकद, घाबरून आयुष्य जगणं योग्य नाही - जावेद अख्तर

  20:13 (IST)

  मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायलाच हवा, ग्रंथालय कर्मचाऱ्यांना योग्य मोबदला मिळायला हवा, सरकार कोणतंही असो, त्यांनी हे करायलाच हवं - पानिपतकार विश्वास पाटील

  19:53 (IST)

  केंद्रीय गृहमंत्रालयानं नारायण राणेंची सुरक्षा वाढवली
  नारायण राणेंना 'Z' सुरक्षा, यापूर्वी 'Y' सुरक्षा होती
  पूर्वी CISFचे 2 कमांडो होते, आता 8 कमांडोंचं कवच

  19:37 (IST)

  मुंबई महापालिका सभागृहात राडा
  चिमुकल्याच्या मृत्यूवरून सभागृहात गोंधळ
  भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक भिडले
  यशवंत जाधवांनाही भाजप नगरसेवकांचा घेराव

  19:29 (IST)

  पुणे - भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयाचं‌ उद‌्घाटन
  नगरसेवकांसह इच्छुकांचं जोरदार शक्तिप्रदर्शन
  महापालिका परिसरात मोठी वाहतूक कोंडी
  अनेक बसेस गर्दीत पडल्या अडकून

  19:18 (IST)

  मुंबई विमानतळाजवळील फनेल झोनमधील इमारतींचा पुनर्विकासाचा मार्ग होणार प्रशस्त, राज्याचा नगरविकास विभाग या इमारतींच्या पुनर्विकासाचं अंतिम धोरण लवकरच निश्चित करणार, फनेल झोनमधील इमारतींना दिलासा देण्याबाबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे सकारात्मक

  19:11 (IST)

  विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवड डिसेंबरमध्ये होत असलेल्या हिवाळी अधिवेशनातच होईल आणि अध्यक्ष काँग्रेसचाच होईल - नाना पटोले

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स