Live Updates: राज ठाकरे-नितीन गडकरी यांच्यात दोन तास चर्चा

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | April 04, 2022, 00:01 IST
  LAST UPDATED 6 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  22:2 (IST)

  राजकीय वर्तुळातली आताची मोठी बातमी
  नितीन गडकरी राज ठाकरेंच्या भेटीला
  राज ठाकरेंची 'शिवतीर्थ'वर घेतली भेट
  भाजप-मनसे युतीच्या चर्चेला उधाण

  21:41 (IST)

  'मुंबई-गोवा महामार्ग वर्षभरात पूर्ण करणार'
  नितीन गडकरींचं कोकणवासीयांना आश्वासन

  20:25 (IST)

  गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ
  महामंडळाच्या राज्यस्तरीय कार्यालयाचं केलं उद‌्घाटन
  ऊसतोड कामगारांचं जीवनमान उंचावणार - मुख्यमंत्री
  मुलांच्या हातात कोयत्याऐवजी पुस्तक देणार - मुख्यमंत्री
  महामंडळाच्या माध्यमातून प्रयत्न करणार - मुख्यमंत्री
  'ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सहकार्य'

  19:59 (IST)

  'कारखान्यानं निधीसाठी टनामागे 10 रुपये द्यावेत'
  '...अन्यथा पुढच्या वर्षी कारखान्याला ऊस नाही'
  अजित पवारांचा साखर कारखानदारांना इशारा
  'चुकीचं वागणाऱ्यांबाबत काही कठोर निर्णय घेणार'
  तुमच्या कष्टाला हे सरकार न्याय देणार - उपमुख्यमंत्री

  19:47 (IST)

  ऊसतोड कामगारांबाबत अभ्यास - अजित पवार
  'पण 20 वर्षं कोणाला काही करता आलं नाही'
  मविआनं महामंडळ अस्तित्वात आणलं - अजितदादा
  'प्रतिकूल परिस्थितीत हे सर्व काबाडकष्ट करतात'
  'त्यातून साखर कारखान्यांना ऊस पुरवतात'
  'ऊसतोड कामगाराचा मुलगा सामाजिक न्यायमंत्री'
  असं भाग्य ठराविक जणांना मिळतं - अजित पवार
  राज्यात 9-10 लाख ऊसतोड कामगार - अजित पवार
  'आता ऊसतोड कामगारांना ओळख मिळायला हवी'
  'शिक्षण, आरोग्य, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे'
  गर्भायश काढण्याच्या घटना घडतायत - अजित पवार
  'तात्पुरती घरं, पेन्शनबाबत विचार करावा लागेल'
  'ऊसतोडणीसाठी आधुनिक साधनांचा प्रयत्न'
  'ऊसतोड कामगार ही पद्धतच बंद झाली पाहिजे'
  'किती वर्षं या लोकांनी ऊसच तोडायचा?'
  नवनवीन टेक्नॉलॉजी आली आहे - अजित पवार

  19:44 (IST)

  पनवेल - JNPT पोर्ट रोड प्रकल्पाचं लोकार्पण
  नवी मुंबई विमानतळ पूर्व प्रवेशद्वाराचं भूमिपूजन
  नितीन गडकरींच्या हस्ते लोकार्पण, भूमिपूजन
  कळंबोली जंक्शन विस्तारीकरणाचंही भूमिपूजन
  कोकणाची लाईफलाईन असलेला मुंबई-गोवा महामार्ग
  10 वर्षं झाली, पूर्ण न झाल्याचं अतिशय दु:ख - गडकरी
  JNPT कनेक्ट रस्ता अप्रतिम निर्मित झाला - गडकरी
  'JNPT मध्ये यंदा विक्रमी कंटेनर ट्रान्सपोर्टेशन'
  'जगातील तिसऱ्या क्रमांकाचं पोर्ट JNPT होणार'
  '4 लेन तीनमजली रस्ता, 1200 कोटी खर्च करणार'
  कळंबोली जंक्शन तयार करणार - नितीन गडकरी
  'पाण्यातून हायड्रोजन तयार केलेली माझी गाडी'
  डिझेल, पेट्रोल वापर कमी करायचाय - गडकरी
  'पेट्रोल-डिझेल महाग, इथेनॉलचा वापर करा'
  प्रवासी वाहतुकीसाठी जलमार्ग सर्वोत्तम - गडकरी
  'मी राज्यात मंत्री असताना प्रोजेक्ट तयार केलाय'
  'JNPTजवळून दक्षिणेकडे जाण्यासाठी नवा रस्ता'
  '32 किमी अंतर, 4 टनेल चिरनेर एक्स्प्रेस हायवे'
  हा थेट हायवेला कनेक्ट होईल - नितीन गडकरी
  'कोकणातील दीड लाख भूमिपुत्रांसाठी रोजगार योजना'
  पोर्टशी कनेक्ट सर्व परिसर विकसित करूया - गडकरी
  JNPT, विमानतळ हे ग्रोथ इंजिन - नितीन गडकरी
  विकास असेल तर गुंतवणूक येईल - नितीन गडकरी
  गुंतवणूक आली तर रोजगार उपलब्ध होईल - गडकरी
  'भारतमाला 2 मध्ये कोकणातील दुसरा सागरी मार्ग'
  कोकणात सी प्लॅननं वाहतूक सुरू - नितीन गडकरी

  19:22 (IST)

  ऊसतोड मजुरापोटी माझा जन्म - धनंजय मुंडे
  'मागच्या सरकारच्या काळात मंडळ आलं-गेलं'
  'नाव जरी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचं आहे'
  त्यांनी तहहयात ऊसतोड मजुरांसाठी दिली - मुंडे
  'कार्यकाळात हे महामंडळ देणं शक्य झालं नाही'
  'त्यांच्यानंतर त्यांच्या वारसदारांना संधी मिळाली'
  'पण त्यांनाही महामंडळ निर्माण करता आलं नाही'
  'हे महामंडळ आमच्या हस्ते व्हावं, नियतीची इच्छा'
  आज मुंडे साहेबांना ही आदरांजली आहे - धनंजय मुंडे
  धनंजय मुंडेंची पंकजा मुंडेंचं नाव न घेता टीका

  19:1 (IST)

  'मदरशात जाऊन वस्तरा शोधून दाखवा'
  जितेंद्र आव्हाडांचं राज ठाकरेंना प्रतिआव्हान
  'समाजात आग लावण्याचं काम करतात'
  राज ठाकरेंनीही मशिदीच्या बाहेर जावं - आव्हाड
  'राज ठाकरेंनी कधी जयभीम तरी म्हटलंय का?'
  जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंवर निशाणा

  18:35 (IST)

  लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ उद‌्घाटन सोहळा
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन सहभागी
  'नव्या वर्षाची सुरुवात झाली, सर्वांना शुभेच्छा'
  'महाविकास आघाडीच्या शुभेच्छा कोरड्या नसतात'
  'जनतेच्या आयुष्यात सुख-समाधानाचे दिवस आणण्याच्या असतात'
  'या महामंडळाला गोपीनाथ मुंडेंचं नाव दिलंय'
  'पक्षभेद विसरून कसं काम करतो याचं हे उदाहरण'
  आम्ही संघर्ष करून अनेक गोष्टी मिळवल्या - सीएम
  लवकरच मुंबईबाहेर कार्यक्रम घेईन - उद्धव ठाकरे
  'धनंजय मुंडेंनी बीडमध्ये मेळावा घ्यावा, मी येईन'
  ऊसतोड कामगारांच्या मुलांचा प्रश्न
  'कोयता द्यायच्या ऐवजी वही-पेन-पुस्तक देणार'
  हल्लीचं जग हे दिखाव्याचं झालंय - उद्धव ठाकरे
  या नुसत्या घोषणा नाहीत - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

  17:38 (IST)

  नाशिक - एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले
  लहावीत ते देवळाली दरम्यानची घटना
  मुंबई-मनमाड पंचवटी एक्स्प्रेस रद्द
  आदिलाबाद-नंदीग्राम एक्स्प्रेस केल्या रद्द
  अपघातामुळे मार्ग बदलण्यात आलेल्या गाड्या
  निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसचा मार्ग बदलला
  CSMT, वसई रोड, जळगाव, भुसावळमार्गे
  हावडा-दुरंतो CSMT,वसई,जळगाव,भुसावळमार्गे
  प्रतापगड-उद्योग नगरी लोणावळा, पुणे, दौंडमार्गे
  सीएसएमटी - 022-22694040, 022-67455993
  नाशिक 0253-2465816, भुसावळ 02582-220167
  आपत्ती व्यवस्थापन कक्ष हेल्पलाईन नं. - 54173

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स