LIVE: वरळीतील पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | July 31, 2021, 20:23 IST |
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  20:58 (IST)

  भाजप आ.प्रसाद लाड यांचं चिथावणीखोर वक्तव्य
  वेळ आली तर शिवसेना भवन फोडू - प्रसाद लाड
  आमच्याकडे शिवसेनेच्या कुंडल्या - प्रसाद लाड
  शिवसेनेचे बालेकिल्ले आम्ही पाडून टाकू - लाड 

  19:47 (IST)

  संजय राऊतांच्या टीकेला नितेश राणेंचंही प्रत्युत्तर
  'मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक, ती माझी ओळख'
  'मात्र संजय राऊत हे शिवसेनेचे की शरद पवारांचे?'
  भाजप नेते नितेश राणेंचा संजय राऊतांवर पलटवार 

  19:47 (IST)

  खासदार संजय राऊतांचा नारायण राणेंवर निशाणा
  'कोणत्याही पक्षात गेला तरी ओळख शिवसैनिकच'
  'नारायण राणेंनाही शिवसैनिक म्हणूनच ओळखतात'
  शिवसेना नेते संजय राऊतांचा नारायण राणेंना टोला 

  19:47 (IST)

  आपत्तीग्रस्त विद्यार्थ्यांना सरकारचा मोठा दिलासा
  राज्यातील पूरग्रस्त, दरड दुर्घटनाग्रस्त विद्यार्थी
  आपत्तीग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा नंतर घेणार
  शैक्षणिक नुकसान न होण्यासाठी मोठा निर्णय
  उच्च, तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंतांची माहिती
  सर्व विद्यापीठांना दिले आदेश - उदय सामंत
  वीज बिलांपाठोपाठ सरकारचा महत्वाचा निर्णय 

  16:53 (IST)

  टोकियो ऑलिम्पिक - बॅडमिंटन स्पर्धा
  सेमीफायनलमध्ये पी.व्ही. सिंधूचा पराभव
  तैपेईच्या झू यिंग तैकडून सिंधू पराभूत
  सिंधूचा 18-21 आणि 12-21 असा पराभव
  ब्रॉंझ पदकासाठी सिंधूला झुंजावं लागणार
  चीनच्या हे बिंगजियाओशी होणार सामना 

  16:10 (IST)

  महाडच्या महास्वच्छता अभियानास सुरुवात
  नगरविकासमंत्री स्वतः रस्त्यावर
  विविध महापालिकांच्या सहकार्याने शहराच्या स्वच्छतेला सुरुवात 
  शहराच्या स्वच्छतेसाठी दीड कोटींचा वाढीव निधी जाहीर
  ठाणे, नवी मुंबई, पनवेल महापालिकेची पथके तैनात
  ४५० कर्मचारी, २० जेसीबी, २० डंपर, घंटागाड्या महाडच्या मदतीला

  13:44 (IST)

  नागपुरातील रेल्वे उड्डाणपुलाचं भूमिपूजन
  कडबी चौक ते गोळीबार चौक उड्डाणपूल
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ऑनलाईन उपस्थिती
  'राजकीय अडथळे न आणता विकासासाठी एकत्र'
  नैसर्गिक संकटातून महाराष्ट्र सावरतोय - मुख्यमंत्री
  संकटातही विकासकामं रखडू नयेत - उद्धव ठाकरे

  10:45 (IST)

  नाशिक - धरण क्षेत्रातला पाऊस थांबला
  गंगापूर, दारणा धरणांतून विसर्ग केला कमी
  गंगापूर 1000, दारणातून 3000 क्यूसेकनं विसर्ग
  विसर्ग कमी केल्यानं नदीची पातळी झाली कमी
  नांदूरमध्यमेश्वरमधून 9000 क्यूसेकनं विसर्ग सुरू

  10:45 (IST)

  टोकियो ऑलिम्पिक - महिला हॉकी स्पर्धा
  भारतीय महिलांची दमदार कामगिरी
  अटीतटीच्या सामन्यात द.आफ्रिकेवर मात
  भारतीय महिला संघाचा 4-3 नं विजय
  भारतीय संघाची क्वार्टर फायनलमध्ये धडक

  9:24 (IST)

  राज्यातील कडक निर्बंध शिथिल होणार?
  1 ऑगस्टपासून होऊ शकतात निर्बंध शिथिल
  नवी नियमावली आज होऊ शकते जाहीर
  राज्यातील 25 जिल्ह्यांना मिळू शकतो दिलासा
  दुकानदारांना वेळ वाढवून मिळण्याची शक्यता
  मॉल, सिनेमागृहांना मिळू शकते परवानगी
  सर्वसामान्यांचा लोकल प्रवास सुरू होणार?

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स