Live Updates: काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

  • News18 Lokmat
  • | January 31, 2022, 15:47 IST |
    LAST UPDATED A YEAR AGO

    हाइलाइट्स

    21:22 (IST)


    सोलापूर - 10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन
    आंदोलनावर सरकारनं विचार करावा - उज्ज्वल निकम
    मुलांचं लसीकरण अजून पूर्ण झालेलं नाही - निकम
    'परीक्षा ऑनलाईन घेणं योग्य, हे माझं वैयक्तिक मत' 

    20:25 (IST)

    नागपूर - बहुचर्चित वकील सतीश उकेंना नागपूर क्राईम ब्रँचनं घेतलं ताब्यात, एका महिलेला पिस्तूलचा धाक दाखवून विनयभंग केल्याचा आरोप

    20:17 (IST)

    मुंबई - धारावीतील विद्यार्थ्यांचं आंदोलन प्रकरण
    संजय पांडे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांच्या भेटीला
    धारावीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दिली माहिती
    ऑफलाईन परीक्षेविरोधात विद्यार्थी आक्रमक
    10वी, 12वी परीक्षा ऑनलाईन घेण्याची मागणी
    गृहमंत्री वळसे-पाटलांनी दिले होते चौकशीचे आदेश

    19:26 (IST)

    टीईटी घोटाळ्यातील आयएएस अधिकारी
    आरोपी सुनील खोडवेकरला कोरोनाची लागण
    खोडवेकरला कोर्टाकडून न्यायालयीन कोठडी
    येरवडा आयसोलेशन जेलला होणार रवानगी
    कोर्टानं सुनील खोडवेकरचा अर्जही फेटाळला

    19:15 (IST)

    विद्यार्थ्यांचं आंदोलन योग्य नाही - गृहमंत्री
    'आंदोलनामागे मोठी शक्ती, चौकशी सुरू'
    गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांची माहिती

    19:11 (IST)

    विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नका - नाना पटोले
    मविआ सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी - नाना पटोले
    विद्यार्थ्यांना पुढे करून राजकारण करू नये - पटोले
    रस्त्यावर उतरवणाऱ्यांवर कडक कारवाई करा - पटोले

    17:30 (IST)

    शरद पवारांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह
    पवारांनी स्वत: ट्विट करून दिली माहिती

    17:24 (IST)

    सुप्रीम कोर्टानं निलंबन रद्द केल्यामुळे 12 आमदारांना यापुढे विधानभवनात प्रवेश मिळावा, 12 आमदारांच्या वतीनं भाजप नेते, आमदार अॅड. आशिष शेलारांचं विधानभवन सचिवांना पत्र

    17:14 (IST)

    सिंधुदुर्ग - संतोष परबांवरील हल्ला प्रकरण
    सरकारी पक्षाचा कोर्टातील युक्तिवाद संपला
    नितेश राणेंच्या जामिनावर उद्या 3 वा. सुनावणी
    सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालय देणार निकाल
    नितेश राणेंना घरी जाण्यास कोर्टाची परवानगी

    16:35 (IST)

    नोटीस न देता आंदोलन करणं अयोग्य - बच्चू कडू
    काही ठिकाणी मुलं आंदोलन करतायत - बच्चू कडू
    'पण लाखो लोक मेसेज करतायत की परीक्षा घ्या'
    चुकीचा पायंडा पाडायचा नाही - बच्चू कडू
    'कमी गुणांचा पेपर घेण्याबाबत विचार करू शकतो'
    परीक्षा घेऊ नये असं होणार नाही - बच्चू कडू
    मुलांना रस्त्यावर उतरवणं योग्य नाही - बच्चू कडू
    'आता हे कुणी केलंय, गृहविभाग चौकशी करेल'

    कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स