Live Updates: मावळमध्ये बैलगाडा शर्यतींना परवानगी नाकारली

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

  • News18 Lokmat
  • | December 31, 2021, 23:19 IST |
    LAST UPDATED A YEAR AGO

    हाइलाइट्स

    20:31 (IST)

    एमडी ड्रग्जचा मोठा साठा पकडला
    स्थानिक गुन्हे शाखेची जबरदस्त कामगिरी
    एमडी ड्रग्ज तयार करणारी फॅक्टरीही उद‌्ध्वस्त
    पनवेलच्या नेरे भागात होती फॅक्टरी
    31 डिसेंबरच्या पार्ट्यांसाठी होणार होता पुरवठा
    अडीच किलो पांढरी मेथ्याकुलॉनचा साठा ताब्यात
    3 आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

    19:35 (IST)

    कोविड विषाणू जनुकीय सूत्र निर्धारण अंतर्गत सातव्या चाचणीचे निष्कर्ष जाहीर - एकूण 282 नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरियंटचे 13 टक्के, डेल्टा डेरिव्हेटिव्हचे 32 टक्के तर ओमायक्रॉनचे 55 टक्के रुग्ण, 282 पैकी फक्त 17 जणांनाच रुग्णालयात करावं लागलं दाखल, ओमायक्रॉनबाधित 156 पैकी केवळ 9 जणांना रुग्णालयीन उपचारांची भासली गरज, नमुने संकलित केलेल्यांपैकी डेल्टा डेरिव्हेटिव्हबाधित एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

    19:30 (IST)

    राज्यात कोरोनाचा धोका अधिक वाढला
    राज्यात कोरोनाचे 8 हजार 67 नवे रुग्ण
    मुंबईत दिवसभरात 5 हजार 428 रुग्णांची नोंद
    राज्यात दिवसभरात ओमायक्रॉनचे 4 रुग्ण
    राज्यात ओमायक्रॉनचे एकूण 454 रुग्ण

    19:29 (IST)

    पुरवठा मंत्र्यांच्याच जिल्ह्यात बायोडिझेलची तस्करी
    नाशिक-मालेगावात बोगस बायोडिझेल पंप उद‌्ध्वस्त
    पोलिसांच्या कारवाईत 5 हजार लीटर डिझेल जप्त
    2 आरोपी ताब्यात, एक राजकीय पक्षाशी संबंधित?

    18:48 (IST)

    यशोमती ठाकूर यांना कोरोनाची लागण
    यशोमती ठाकूर यांची ट्विटरद्वारे माहिती
    संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचं आवाहन

    18:38 (IST)

    पुण्यात दिवसभरात कोरोनाचे 412 नवे रुग्ण

    पुण्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 1799 वर पोहोचली

    18:33 (IST)

    जगभरात नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनला सुरुवात
    न्यूझीलंडच्या ऑकलंडमध्ये नववर्षाचं स्वागत
    फटाक्यांची आतषबाजी आणि रंगांची उधळण
    ऑस्ट्रेलियाच्या सिडनीत नववर्षाचं उत्साहात स्वागत
    सिडनी हार्बर ब्रिजवर आकर्षक रोषणाई
    फटाक्यांच्या आतषबाजीनं आसमंत उजळला

    17:56 (IST)

    'समृद्ध महाराष्ट्र, बलशाली भारतासाठी एकजूट होऊया'
    आव्हानांवर मात करूया - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
    मुख्यमंत्र्यांकडून नववर्षाच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा
    गर्दी टाळा, आरोग्यदायी संकल्पांचंही केलं आवाहन

    17:46 (IST)

    राज्यपालांकडून डॉ.कारभारी काळेंची लोणेरे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती

    17:40 (IST)

    '31 डिसेंबर रोजी दारू नको, दूध प्या'
    पुण्यातील सामाजिक संस्थांचा उपक्रम

    कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स