Live : रत्नागिरीत 2 ते 8 जून कडक लॉकडाऊन; अंत्यसंस्कार, वैद्यकीय आणीबाणीसाठी जिल्ह्यात प्रवेशाची परवानगी

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | May 31, 2021, 19:19 IST
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  21:41 (IST)

  पुणे - शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा परवाना रद्द, बॅंक लिक्विडेशनमध्ये काढल्याचा रिझर्व्ह बँकेनं काढला आदेश, शिवाजीराव भोसले सहकारी बँकेनं थकवलेत पैसे, आमदार अनिल भोसलेंसह इतर लोक अटकेत, बँकेचं लायसन्स रद्द झाल्यानं ठेवीदारांना बँक विमा महामंडळामार्फत प्रत्येकी किमान 5 लाख मिळण्याचा मार्ग मोकळा

  21:0 (IST)

  संभाजीराजे आरोप प्रकरणी चौकशीचे आदेश
  गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरणासाठी केला फोन
  विषय संपल्याची खासदार संभाजीराजेंची प्रतिक्रिया

  20:25 (IST)

  मुंबईत दिवसभरात केवळ 676 रुग्णांची नोंद
  मुंबईत दिवसभरात विक्रमी 5,570 कोरोनामुक्त
  मुंबईत दिवसभरात 29 कोरोना रुग्णांचा मृत्यू
  मुंबईत रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 94 टक्क्यांवर

  20:9 (IST)

  1 ते 15 जूनसाठी मुंबई मनपाची नियमावली लागू
  अत्यावश्यक सेवेतील दुकानांची वेळ वाढवली
  अत्यावश्यक दुकानांसाठी सम-विषम फॉर्म्युला लागू
  मुंबईत उद्यापासून 7 ते 2 दुकानं खुली राहणार
  पहिल्या आठवड्यात उजव्या बाजूची दुकानं खुली
  सोमवार, बुधवार, शुक्रवारी सुरू राहणार दुकानं
  डाव्या बाजूची दुकानं मंगळवार, गुरुवार खुली
  दुसऱ्या आठवड्यात हे उलट होईल
  शनिवार, रविवार दुकानं पूर्ण बंद राहणार

  20:4 (IST)

  राज्यात दिवसभरात 15 हजार 77 नवे रुग्ण
  राज्यात दिवसभरात 33 हजार कोरोनामुक्त
  राज्यात दिवसभरात 184 रुग्णांचा मृत्यू
  राज्यात रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 93.88 टक्के
  राज्यात सध्या 2 लाख 53,367 अॅक्टिव्ह रुग्ण

  19:56 (IST)

  राज्यातील मोठा आरोग्य घोटाळा?
  आरोग्यसेवेच्या नावाखाली प्रशासकीय पदांना मुदतवाढ
  'अ'दर्जाच्या 193 प्रशासकीय अधिकाऱ्यांना मुदतवाढ
  3 वर्षांपासून 'त्या' अधिकाऱ्यांना दिली जाते मुदतवाढ

  18:18 (IST)

  निवडणुकीआधी ओबीसी आरक्षण विषय सोडवा, ...नाही तर आम्ही शांत बसणार नाही - पंकजा मुंडे

  18:11 (IST)

  'ओबीसी राजकीय आरक्षणाविषयी निर्णय धक्कादायक'
  भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया
  '15 महिन्यांत या सरकारकडून कोणतंही पाऊल नाही'
  मराठा, ओबीसी आरक्षणाबाबत हे सरकार फेल - पंकजा

  18:9 (IST)

  पुण्यातील लॉकडाऊनला 60 दिवस झाले - महापौर
  कोरोनाही आटोक्यात आलाय - मुरलीधर मोहोळ
  आता पुन्हा अनलॉकच्या दिशेनं जातोय - मोहोळ
  'स.7 ते 2 पर्यंत सर्व प्रकारची दुकानं सुरू राहणार'
  'शनिवार, रविवारी फक्त अत्यावश्यक सेवांना मुभा'
  पुणेकरांना 'अनलॉक'चा मोठा दिलासा
  पुण्यात गेले 2 महिने लागू होते कठोर निर्बंध
  मॉल्स, थिएटर्स मात्र अजूनही बंदच राहणार

  17:57 (IST)

  मुंबईत धारावी पॅटर्न पुन्हा यशस्वी
  धारावीत दिवसभरात फक्त 2 नवे रुग्ण
  दादर 10, माहीममध्ये दिवसभरात 15 रुग्ण

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स