Live Updates : नवी मुंबईत कोरोनाचा आकडा 266 वर, एकाच दिवसात 100 रुग्ण वाढले

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | December 30, 2021, 21:49 IST |
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  21:50 (IST)

  महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांना कोरोनाची लागण
  'संपर्कात आलेल्यांनी कोरोना टेस्ट करून घ्यावी'

  21:33 (IST)

  कालीचरणला 2 दिवसांची पोलीस कोठडी
  रायपूरच्या न्यायालयानं सुनावली कोठडी

  21:28 (IST)
  मराठी भाषेची वैविध्यता, समृद्धता पुन्हा एकदा अधोरेखित; अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचा मार्ग सुकर होण्यास मदत - अजित पवार
  'साहित्य अकादमी' विजेत्या मराठी साहित्यिकांचं उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून अभिनंदन
   
  डॉ.किरण गुरव, प्रणव सखदेव, संजय वाघ यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अजित पवारांनी केलं अभिनंदन
   
  ग्रामीण जीवन, संस्कृतीशी नातं सांगणाऱ्या साहित्यिकांना पुरस्कार जाहीर झाल्यानं ग्रामीण युवकांना प्रेरणा मिळेल
   
  कोकणी भाषेसह सर्व भाषेतील पुरस्कार विजेत्यांचं उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून अभिनंदन
  21:22 (IST)

  इलेक्ट्रिक वाहन धोरणांतर्गत 31 डिसेंबर 2021 पर्यंत असलेली त्वरित नोंदणी सूटची मर्यादा दिनांक 31 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यास शासनाची मान्यता

  20:59 (IST)

  सिंधुदुर्ग - शिवसेनेचे आमदार, इतर नेत्यांना नोटीस
  पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईची पाठवली नोटीस
  सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी
  कायदा-सुव्यवस्था न बिघडण्यासाठी पोलिसांची नोटीस
  सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधींना प्रतिबंधात्मक नोटीस
  कोणालाही विजयी मिरवणूक काढता येणार नाही
  5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येताही येणार नाही
  सिंधुदुर्ग पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस

  20:27 (IST)

  महाराष्ट्रात ओमायक्रॉनचं संकट अधिक गडद
  राज्यात दिवसभरात ओमायक्रॉनचे 198 नवे रुग्ण
  एकट्या मुंबईत दिवसभरात 190 ओमायक्रॉनचे रुग्ण
  मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 327 तर राज्यातील 450

  20:12 (IST)

  नाशिकमध्ये ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण, रुग्ण नॉन सिम्प्टमिक असून प्रकृती ठीक, नागरिकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही, लसीकरण करून घेणं हे यावरील महत्त्वाचं सुरक्षाकवच, नागरिकांनी तातडीनं स्वत:चं लसीकरण करून घ्या - सूरज मांढरे

  20:0 (IST)

  उदय सामंतांची रात्री 9.30 वा. ऑनलाईन बैठक
  राज्यातील सर्व कुलगुरूंसोबत करणार चर्चा
  कोविड संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनेवर चर्चा
  महाविद्यालयाबाबत मोठ्या निर्णयाची शक्यता - सूत्र

  19:22 (IST)

  कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ - राजेश टोपे
  गर्दी टाळण्याच्या दृष्टीनं योग्य निर्णय घेणार - टोपे
  टास्क फोर्ससोबत उपाययोजनांबाबत चर्चा - टोपे
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील - राजेश टोपे
  नागरिकांनी गर्दी टाळावी, आरोग्यमंत्र्यांचं आवाहन
  'थर्टीफर्स्ट, नववर्षाच्या सेलिब्रेशनला गर्दी करू नका'
  वाढत्या रुग्णांमुळे राज्याची चिंता वाढली - राजेश टोपे

  19:5 (IST)

  मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी
  मुंबईत दिवसभरात कोरोनाचे 3,671 नवे रुग्ण

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स