• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Live Updates: आमदार गोपीचंद पडळकर यांना केंद्राची X दर्जाची सुरक्षा

Live Updates: आमदार गोपीचंद पडळकर यांना केंद्राची X दर्जाची सुरक्षा

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | April 30, 2022, 20:03 IST
  LAST UPDATED 4 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  22:35 (IST)

  पुण्याच्या कैलास स्मशानभूमीतील घटना
  अंत्यसंस्काराच्या दरम्यान आग भडकली
  अंत्यसंस्कारासाठी आलेले 7 जण भाजले
  पेट्रोल किंवा डिझेल टाकल्यानं दुर्घटना? 

  22:25 (IST)

  देवेंद्र फडणवीसांचा मविआ सरकारवर हल्लाबोल
  'कोरोनात सरकारनं श्रमिकांना मदत केली नाही'
  'सरकारनं श्रमिकांसाठी एकही निर्णय घेतला नाही'
  'बिल्डरांना हजारो कोटींचा फायदा करून दिला'
  सरकारनं राज्यात लोडशेडिंग सुरू केलं - फडणवीस 

  20:32 (IST)

  महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर; राज्यात सर्वाधिक 136 सन्मानचिन्ह गडचिरोली पोलीस दलाला जाहीर; माओवादविरोधी अभियानात चांगली कामगिरी केल्याबद्दल गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, माओवादविरोधी अभियानाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह 2 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 25 पोलीस उपनिरीक्षक आणि गडचिरोली पोलीस दलातील 106 पोलीस शिपाई यांना सन्मानचिन्ह जाहीर 

  20:30 (IST)

  आमदार गोपीचंद पडळकरांना 'X' दर्जाची सुरक्षा
  किरीट सोमय्यांनंतर पडळकरांनाही केंद्राची सुरक्षा
  यापूर्वी पडळकर यांच्यावरही झाला होता हल्ला
  पवारांविरोधात वारंवार भूमिका घेतात पडळकर  

  20:21 (IST)

  देशातील मुस्लिमांना सामूहिक शिक्षा - ओवेसी
  'कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्याची गरज'
  'महाराष्ट्रात सध्या 2 भावंडांची भांडणं सुरू'
  'राज ठाकरेंच्या सभेला जाणीवपूर्वक परवानगी'
  'शांतता राखण्याची जबाबदारी राज्य सरकारची'
  खा.इम्तियाज जलील यांचा 'मविआ'वर निशाणा 

  20:13 (IST)

  'सौहार्द, सामंजस्याचं वातावरण बिघडू देऊ नका'
  'महाराष्ट्रासमोरची आव्हानं एकत्र परतवून लावू'
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं जनतेला आवाहन

  20:1 (IST)

  - आमदार गोपीचंद पडळकर यांना x  दर्ज्याची सुरक्षा

  - किरिट सोमय्या पाठोपाठ पडळकरांनाही केंद्राची सुरक्षा

  - याकपूर्वी गोपीचंद पडळकर यांच्यावरही झाला होता हल्ला

  - पडळकर वारंवार शरद पवारांच्या विरोधात भूमिका घेतात 

  18:48 (IST)

  बदलापूर :
  - महानगर गॅसच्या पाईपला आग
  -रस्त्याच्या शेजारी ठेवले होते पाईप
  - आगीमुळे धुराचे साम्राज्य
  - आगीचे कारण अस्पष्ट

  17:46 (IST)

  भाजप आमदार गणेश नाईकांच्या अडचणीत वाढ
  गणेश नाईकांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
  ठाणे सेशन कोर्टाचा गणेश नाईकांना दिलासा नाही
  आमदार गणेश नाईकांना केव्हाही होऊ शकते अटक 

  17:45 (IST)

  राणा दाम्पत्याच्या जामिनावरील सुनावणी पूर्ण
  न्यायालयातील दोन्ही बाजूंचे युक्तिवाद संपले
  मुंबई सत्र न्यायालयानं निकाल राखून ठेवला
  राणा दाम्पत्याच्या जामिनावर सोमवारी निकाल 

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स