LIVE : राज्यातील लॉकडाऊन 15 जूनपर्यंत वाढवला

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

  • News18 Lokmat
  • | May 30, 2021, 21:46 IST |
    LAST UPDATED 2 YEARS AGO

    हाइलाइट्स

    7:7 (IST)

    पुण्यात पेट्रोलचे दर 100.15 रुपये

    डिझेलचे दर 90.71 रुपये

    21:31 (IST)

    अत्यावश्यक सेवेतील दुकानं स.7 ते दु.2 पर्यंत खुली'
    राज्यातील जिल्हाबंदी कायम ठेवली - मुख्यमंत्री

    21:18 (IST)

    मुख्यमंत्र्यांचा राज्यातील जनतेशी संवाद
    'कोरोनाचं संकट, त्यात वादळाचा फटका'
    प्रशासन, जनतेनं चांगलं काम केलं - मुख्यमंत्री
    राज्यात दरवर्षी चक्रीवादळाचं संकट - मुख्यमंत्री
    'तौक्ते चक्रीवादळामुळे गुजरातचं मोठं नुकसान'
    'मी रत्नागिरी, सिंधुदुर्गचा धावता दौरा केला'
    नुकसानभरपाई लवकरच देणार - मुख्यमंत्री
    'केंद्रानं मदतीचे निकष बदलण्याची गरज'
    'किनारपट्टीवर कायमस्वरूपी उपाययोजनेची गरज'
    अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना मदत - मुख्यमंत्री
    'कोरोना काळात मोफत अन्नधान्याचं वाटप'
    '54 लाखांहून अधिक मोफत थाळ्या वितरित'
    फेरीवाले, घरकामगार मजुरांसाठी निधी - मुख्यमंत्री
    'दुर्बलांना आर्थिक सहाय्य करणं वेगानं सुरू'
    'कोरोना काळात महाराष्ट्र सुरक्षित राहावा'
    अजूनही रुग्णसंख्या गेल्या लाटेएवढीच - मुख्यमंत्री
    'कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक आजही कायम'
    'रुग्णसंख्या बरं होण्याचं प्रमाण वाढल्यानं दिलासा'
    'काही जिल्ह्यांत रुग्णसंख्या काहीशी वाढतेय'
    'ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढतोय'
    'कडक लॉकडाऊन नाही, मात्र निर्बंध कायम'
    'तिसरी लाट येणार, पण कधी येणार माहीत नाही'
    हा व्हायरस वेगानं पसरतोय - उद्धव ठाकरे
    कोरोनाचे नवे स्ट्रेन अधिक घातक - उद्धव ठाकरे
    ऑक्सिजनची गरज दीर्घकाळ लागली - मुख्यमंत्री
    'रुग्ण कमी होत असले तरी काळजी आवश्यक'
    'पुढची पावलं सावधपणे टाकायला लागणार'
    'म्युकरमायकोसिसचे राज्यात 3 हजार रुग्ण'
    'म्युकरमायकोसिसवर टास्क फोर्स काम करतेय'
    फॅमिली डॉक्टरची भूमिका मोलाची - मुख्यमंत्री
    'राज्यात 'माझा डॉक्टर' मोहीम राबवतोय'
    आवश्यकतेनुसार औषधं घ्या; मुख्यमंत्र्यांचं आवाहन
    'सर्व जिल्ह्यांत स्थानिक तज्ज्ञ डॉक्टर्सचे टास्क फोर्स'
    'लहान मुलांसाठी बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स'
    वैद्यकीय उपचारासंदर्भात सतत संवाद - मुख्यमंत्री
    'तिसऱ्या लाटेत मुलांमध्ये संसर्ग होऊ शकतो ही भीती'
    'सातत्यानं सर्व डॉक्टरांशी संवाद साधण्यावर भर'
    18-44 वयोगटाचं लसीकरण करणार - मुख्यमंत्री
    जूनपासून लस पुरवठ्यात वाढ होईल - मुख्यमंत्री
    'गरज पडल्यास 24 तास लसीकरण करू'
    'पुरवठा वाढल्यानंतर लसीकरणाचा वेग वाढेल'
    'परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण'
    'दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला'
    12वी परीक्षेचा निर्णय लवकरच घेणार - मुख्यमंत्री
    'देशासाठी एक शैक्षणिक धोरण असायला हवं'
    'शिक्षणासंदर्भात क्रांतिकारी निर्णयाची गरज'
    एकेक गोष्ट पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न - मुख्यमंत्री
    'लॉकडाऊन असला तरी अर्थचक्र चालू राहावं'
    'कोरोनामुक्त गाव' करण्याची मोहीम राबवा
    मुख्यमंत्र्यांचं राज्यातील सर्व सरपंचांना आवाहन
    कृषी क्षेत्रावर कुठलीही बंधनं नाहीत - मुख्यमंत्री
    'शेतीशी निगडित सर्वच दुकानं खुली राहतील'
    'कोरोनाच्या लाटेत काही बालकं अनाथ झाली'
    'अनाथ बालकांचं पालकत्व सरकार घेणार'
    रस्त्यावर उतरण्याचा इशारा देऊ नका - मुख्यमंत्री
    कोरोना योद्धे म्हणून रस्त्यावर उतरा - मुख्यमंत्री
    'काही जिल्ह्यांत कडक तर काही जिल्ह्यांत निर्बंध शिथिल करणार'
    राज्यात 15 जूनपर्यंत निर्बंध कायम - मुख्यमंत्री

    19:40 (IST)

    मुंबईत दिवसभरात 1066 नवीन रुग्ण
    मुंबईत दिवसभरात 1327 कोरोनामुक्त
    मुंबईत दिवसभरात 22 रुग्णांचा मृत्यू

    19:16 (IST)

    राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, गोव्यातून पुन्हा एकदा मद्यतस्करी, तब्बल 37 लाख 81 हजारांची मद्यतस्करी, ठाणे-बेलापूर रोडवर एका तस्कराला केली अटक

    19:13 (IST)

    पुण्यात दिवसभरात 486 रुग्णांची नोंद
    पुण्यात दिवसभरात 887 रुग्णांना डिस्चार्ज
    पुण्यात कोरोनाबाधित 27 रुग्णांचा मृत्यू

    19:11 (IST)

    मंत्रालयात बॉम्बचं निनावी फोन प्रकरण
    नागपूरच्या उमरेडमधून एकाला अटक
    43 वर्षांचा सागर मांडरे हा मनोरुग्ण
    मंत्रालयात बॉम्ब असल्याचा केला होता फोन

    19:0 (IST)

    मान्सून लांबला, याआधीच्या अंदाजानुसार तो 1 दिवस आधी म्हणजे 31 मे रोजी केरळमध्ये दाखल होणार होता, पण त्याऐवजी तो 3 जूनला दाखल होणार, 2 दिवस उशिरानं येणार

    18:46 (IST)

    7 वर्षांत आम्ही काय केलं ते सांगायला तयार आहोत, पण तुम्ही 70 वर्षांत काय केलं ते सांगायला तयार आहात का? विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचा सवाल

    18:46 (IST)

    लसीसंदर्भात मुंबई पालिका, राज्य सरकार गोंधळलंय, केंद्राचं उद्घाटन केलं तिथं लस नाही - प्रवीण दरेकर

    कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स