LIVE: मुंबईत लसींचा तुटवडा, उद्या लसीकरण बंद

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | June 30, 2021, 22:43 IST |
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  20:19 (IST)

  मुख्यमंत्र्यांनी दिल्या राज्यातील डॉक्टर्सना शुभेच्छा, डॉक्टरांमुळे कोविडविरुद्धच्या लढ्याचा गोवर्धन पेलणं शक्य झालं, जनतेला मोलाचा आधार दिल्याबद्दल महाराष्ट्र सदैव कृतज्ञ - उद्धव ठाकरे

  20:17 (IST)

  सोलापूर - आमदार गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर अज्ञातांची दगडफेक, घोंगडी बैठकीसाठी पडळकर सोलापूरच्या मड्डी वस्ती भागात आले होते

  19:49 (IST)

  सरकारच्या निर्णयाचं स्वागत, अर्थसहाय्यही द्यावं; 23 गावांच्या समावेशाबाबत महापौर मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया

  19:45 (IST)

  अमरावती - परीक्षा फॉर्म भरण्यासाठी गर्दी करणाऱ्या शिवाजी कला-वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्यांना अमरावती महापालिकेची कारणे दाखवा नोटीस, परीक्षा फॉर्म भरण्यासाठी गर्दी जमवल्याप्रकरणी आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा इशारा, 'न्यूज18 लोकमत'च्या बातमीनंतर पालिका प्रशासनाची कारवाई

  19:29 (IST)

  प्रवीण परदेशी पुन्हा सेवेत पण साईड पोस्टिंग, सरकारमध्ये सर्वेसर्वा असलेले प्रवीण परदेशी अडगळीत

  19:7 (IST)

  आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि कोल्हापुरातील व्यापाऱ्यांची मंत्रालयात पार पडली बैठक, जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या 
  प्रस्तावावर उद्या दुपारपर्यंत निर्णय होणार, व्यापारी निर्णयाची प्रतीक्षा करणार, कोल्हापूरच्या व्यापारी प्रतिनिधींनी दुकानं उघडण्याची भूमिका बैठकीत मांडली

  18:35 (IST)

  'वर्षा' बंगल्यावरील महत्वाची बैठक संपली
  मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हजेरीत होती बैठक
  'मविआ' समन्वय समिती नेत्यांशी महत्वाची चर्चा
  एकनाथ शिंदे, जयंत पाटील, थोरात होते उपस्थित
  अधिवेशनाबाबत राज्य सरकारची रणनीती ठरली
  विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीबाबतही चर्चा?

  18:18 (IST)

  सातव्या वेतन आयोगाची थकबाकी मिळणार, राज्य सरकारनं यासंदर्भात काढले आदेश

  18:16 (IST)

  पैठणला संतपीठ लवकरच सुरू होणार - उदय सामंत
  '50 लाख सरकार, 50 लाख बामु विद्यापीठ देणार'
  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सप्टेंबरमध्ये संतपीठाचं उद‌्घाटन

  18:6 (IST)

  पुणे महापालिका हद्दीत 23 गावं समाविष्ट
  23 गावं समावेशासंदर्भात अधिसूचना जारी
  23 गावांतील विकासकामांचा मार्ग मोकळा
  पुणे महापालिका हद्दीत 23 गावं समाविष्ट
  निर्णयाचं 23 गावांच्या कृती समितीकडून स्वागत

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स