Live Updates : मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प प्रत्यक्ष सादर होणार, भाजपच्या इशाऱ्यानंतर सत्ताधारी शिवसेना नमली

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | February 02, 2022, 20:57 IST
  LAST UPDATED 8 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  22:31 (IST)

  मराठी सिनेमाचा गौरव हरपला
  ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

  21:34 (IST)

  उद्याचा अर्थसंकल्प आता प्रत्यक्ष सादर होणार
  मुंबई महापालिका, सत्ताधारी शिवसेना नमली
  भाजपनं आंदोलनाचा दिला होता इशारा
  अर्थसंकल्प ऑनलाईन सादर केला जाणार होता
  ऑनलाईन अर्थसंकल्पावर भाजपनं घेतलेला आक्षेप
  मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प उद्या सादर होणार
  मनपा आयुक्त चहल करणार अर्थसंकल्पाचं वाचन

  21:14 (IST)

  ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं निधन
  वयाच्या 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
  रमेश देव यांचं हृदयविकारानं मुंबईत निधन
  मराठी, हिंदी चित्रपटांत साकारल्या भूमिका
  अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक म्हणून ओळख
  आनंद, तकदीर चित्रपटातील भूमिका गाजल्या
  रमेश देव यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट 'आरती'

  20:56 (IST)

  भाजपच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर मुंबई महापालिका आणि सत्ताधारी शिवसेना नमली

  उद्या होणारा मुंबई महापालिकेचा अर्थ संकल्प आता प्रत्यक्ष सादर केला जाणार 

  इशाऱ्यापूर्वी हा अर्थसंकल्प ॲानलाईन सादर केला जाणार होता, त्यावर भाजपने आक्षेप घेतला होता

  20:56 (IST)

  मनमाडच्या शेंडी डोंगरावरील घटना
  डोंगरावरून पडून 1 तरुण ठार, दुसरा गंभीर
  नगरमधून 15 तरुण ट्रेकिंगसाठी आले होते

  20:25 (IST)

  रत्नागिरी :

  - रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना निर्बंधांवर शिथिलता 

  - नाईट कर्फ्यु चे नियम शिथिल

  - आठवडा बाजार, पर्यटन स्थळे, नाट्यगृहे, चित्रपट गृहे ५० % असं क्षमतेवर राहणार सुरू 

  - लसीकर आवश्यक तसेच कोरोनाचे नियम बंधनकारक 

  - रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी आज जिल्ह्यातील निर्बंध केले शिथिल

  - अंत्ययात्रेवरील बंदी देखील उठवली

  20:19 (IST)

  रोहित पवार :
  महाराष्ट्र सरकारने वाईन बाबत जो निर्णय घेतला आहे तो शेतकर्‍यांच्या फायद्यासाठी घेतलेला आहे. शेतकर्‍यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी द्राक्ष आणि इतर पिकांची जोड द्यावी द्राक्ष मध्ये जास्त प्रमाणात वाईन असते. म्हणूनच सरकारने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेतला असावा
  शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सरकारने हे धोरण घेतले आहे. आणखीही चांगले धोरण आखण्याची गरज आहे 

  20:7 (IST)

  पुणे कोरोना अपडेट : 
  - पुण्यात दिवसभरात २८४६ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
  - दिवसभरात रुग्णांना ५५२१ डिस्चार्ज.
  - पुणे शहरात करोनाबाधीत ०७ रुग्णांचा मृत्यू.  तर पुण्याबाहेरील ०३.  एकूण १० मृत्यू. 
  -३०१ ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.
  - इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर- ४८
  - नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर- २८
  - पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ६४४३४१.
  - पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २४०३०.
  - एकूण मृत्यू -९२६१.
  -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ६११०५०.
  - आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १११२९

  18:53 (IST)

  पालघर नगरपरिषद, बोईसर ग्रामपंचायतीचा मुंबई महानगर प्रदेश क्षेत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामध्ये समावेश करण्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

  18:45 (IST)

  मुंबईतील रहिवाशांच्या सोयी सुविधेसाठी सुरू असलेल्या विविध विकासकामांचा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आढावा घेतला. ही कामे दर्जेदार आणि नियोजित वेळेत पूर्ण व्हावीत, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स