पुन्हा पाण्यावरून पुणे मनपा आणि जलसंपदा विभागात जुंपली, उद्यापासून पोलीस बंदोबस्त घेऊन महापालिकेचा पाणीपुरवठा कमी करण्याबाबत जलसंपदा विभागाच्या कारवाईवर महापौरांची नाराजी
22:15 (IST)
महाराष्ट्रात तूर्तास नवे निर्बंध नाही मात्र केंद्राशी चर्चा करुन पुढची व्यूहरचना ठरवू, कर्नाटकात ओमायक्रोनबाधित रुग्ण आढळल्यानंतर आरोग्यमंत्री टोपेंचा सूचक इशारा
पालिकेनं जिनोम सिक्वेन्ससाठी पाठवलेल्या रुग्णांची आकडेवारी आणि माहिती राज्य सरकारकडे दिली, एकूण 9 इतर देशातून आलेले बाधित प्रवासी आहेत, ज्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय, त्यांचे सॅम्पल्स पण नव्या व्हेरियंटच्या टेस्टसाठी पाठवले
कर्नाटकमार्गे भारतात ओमायक्रॉनचा शिरकाव
'त्या' 6 संशयितांमुळे महाराष्ट्राचा जीव टांगणीला
दोघांचे रिपोर्ट तपासणीसाठी पुण्यात पाठवले
पिंपरी-चिंचवडमध्ये 2, पुण्यात 1 संशयित
मुंबई, कल्याण, मीरा-भाईंदरमध्ये प्रत्येकी 1 संशयित
21:1 (IST)
राज्यात दिव्यांगांची नोंदणी करून दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्यासाठी 12 डिसेंबर 2021 ते 12 मार्च 2022 विशेष मोहीम राबवली जाणार; जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंचा महत्वपूर्ण निर्णय, त्या-त्या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी करणार नियंत्रण, शासन निर्णय निर्गमित
20:47 (IST)
नाशिकच्या मनमाडमध्ये दुपारनंतर थांबलेल्या पावसाला मनमाडसह नाशिकच्या ग्रामीण भागात पुन्हा सुरुवात. एकीकडे कडाक्याची थंडी, दाट धुके तर दुसरीकडे पुन्हा पाऊस सुरू झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत. शेतकऱ्यांसोबत मेंढपाळाना बसली धास्ती
20:32 (IST)
राज्यात दिव्यांगांची नोंदणी करून दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र व ओळखपत्र (UDID) देण्यासाठी १२ डिसेंबर २०२१ ते १२ मार्च २०२२ विशेष मोहिम राबविली जाणार, जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा महत्वपूर्ण निर्णय, त्या-त्या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी करणार नियंत्रण; शासन निर्णय निर्गमित
20:8 (IST)
मुंबई बाळ बेपत्ता प्रकरण, आईनेच चिमुकलीला संपवलं, मुलगी नको म्हणून पाण्याच्या टाकीत टाकलं, पोलीस तपासात उघड, महापौर किशोरी पेडणेकर यांची माहिती
कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स