• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • LIVE: ...तर असहकार आंदोलन पुकारणार; नागपूरमधील व्यापारी आक्रमक

LIVE: ...तर असहकार आंदोलन पुकारणार; नागपूरमधील व्यापारी आक्रमक

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | August 02, 2021, 18:14 IST
  LAST UPDATED 10 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  21:36 (IST)

  मुंबईत दुकानं रात्री 10 पर्यंत खुली ठेवता येणार
  हॉटेल-रेस्टॉरंट सर्व दिवस दुपारी 4 पर्यंत खुले
  मुंबईत स्विमिंग पूल मात्र बंद राहतील

  20:8 (IST)

  राज्यात दिवसभरात 8,429 कोरोनामुक्त
  राज्यात दिवसभरात 4,869 रुग्णांची नोंद
  राज्यात दिवसभरात 90 रुग्णांचा मृत्यू
  रिकव्हरी रेट 96.65 तर मृत्युदर 2.1 टक्के
  राज्यात सध्या 75 हजार 303 अॅक्टिव्ह रुग्ण

  20:0 (IST)

  उद्या राज्य मंत्रिमंडळाची 'सह्याद्री'वर महत्वाची बैठक
  पूरस्थितीचा आढावा, मदतीबाबत घेणार निर्णय?

  19:32 (IST)

  मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबईसाठी वेगळी ऑर्डर असतील, या जिल्ह्यांमध्ये सध्याची नियमावली लागू नसेल

  19:24 (IST)

  महाराष्ट्रासाठी आताची सर्वात मोठी बातमी
  राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये मुभा नाही
  कोरोना रुग्णसंख्या जास्त असल्यानं निर्णय
  कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात आधीची नियमावली
  पुणे, पालघर, सोलापूर, नगर, बीडमध्ये निर्बंध
  रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमध्ये निर्बंध कायम
  मात्र इतर जिल्ह्यांत रात्री 8 पर्यंत दुकानं खुली
  शनिवारी दु.3 पर्यंत सर्व दुकानं खुली राहणार
  मॉल्सही खुली राहणार, पण रविवारी सर्व बंद
  फक्त अत्यावश्यक सेवेची दुकानं रविवारी खुली
  खासगी, शासकीय कार्यालयं पूर्ण क्षमतेनं खुली
  पण गर्दीच्या ठिकाणी नियम पाळणं गरजेचं
  उद्यानं, बगिचे, खुली मैदानं सुरू राहणार
  ब्युटीपार्लर, स्पा, हेअर सलून खुली राहणार
  50 टक्के आसन क्षमतेनं खुली राहणार
  रविवारी पूर्ण बंद तर शनिवारी दुपारी 3 पर्यंत
  जिम्नॅशियम, योगा क्लास रात्री 8 पर्यंत
  सिनेमागृहं, मल्टिफ्लेक्स मात्र बंद राहणार
  हॉटेल्स दुपारी 4 पर्यंत 50% क्षमतेनं खुली
  सर्वसामान्यांसाठी लोकलसेवा बंदच राहणार

  18:55 (IST)

  एमपीएससीबाबत अजित पवारांनी शब्द पाळलाय, 31 जुलैपूर्वीच अजित पवारांनी राज्यपालांकडे एमपीएससी आयोगावरील नियुक्तीसंबंधीची यादी राज्यपालांकडे पाठवली, राज्यपाल निश्चितच त्यावर लवकर निर्णय घेतील; रोहित पवारांची ट्विटद्वारे माहिती

  18:47 (IST)

  मराठा आरक्षणाबाबत खासदारांनी लोकसभेत आवाज उठवायला हवा होता, पण तसं झालं नाही - अशोक चव्हाण

  18:45 (IST)

  मराठा आरक्षण उपसमितीची झाली बैठक - अशोक चव्हाण
  14 ठिकाणी होस्टेलबाबत प्रक्रिया पूर्ण - अशोक चव्हाण
  15 ऑगस्टपर्यंत ही होस्टेल सुरू होतील - अशोक चव्हाण
  'सारथी'ची 8 कार्यालयं सुरू होणार - अशोक चव्हाण
  गुरुवारी महसूलमंत्र्यांसोबत बैठक - अशोक चव्हाण
  तारादूत नियुक्तीचा निर्णय झालाय - अशोक चव्हाण
  अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळावर सदस्य नेमणूक
  मराठा आरक्षणाबाबत 199 गुन्हे मागे घेतले - चव्हाण
  काही प्रकरणं न्यायालयात आहेत - अशोक चव्हाण

  18:38 (IST)

  राज्यातील पूरस्थितीचा आढावा - अशोक चव्हाण
  कोकण विभागाचं सर्वाधिक नुकसान - चव्हाण
  4038 रस्ते, पूल वाहून गेले - अशोक चव्हाण
  2 प्रकारच्या दुरुस्ती कराव्या लागणार - अशोक चव्हाण
  वाहतुकीसाठी काही रस्ते तात्पुरते दुरुस्ती करावे लागणार
  यासाठी 200 कोटी रुपये लागणार - अशोक चव्हाण
  कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी 2 हजार 224 कोटी लागणार

  18:14 (IST)

  राज्य मागासवर्गीय आयोगाचा महत्वपूर्ण निर्णय
  राज्यातील जातीनिहाय जनगणना करण्याचा ठराव

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स