Live Updates: शेतकऱ्यांचं वीजबिल ऊस बिलातून वसूल करणार, साखर संचालकांचा आदेश

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | October 29, 2021, 21:17 IST |
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  22:16 (IST)

  देशाचा गौरव वाढवणारे क्रिकेटपटू निर्माण व्हावेत, मुंबई क्रिकेट असोसिएशनला संपूर्ण सहकार्य - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

  22:14 (IST)

  ड्रग्ज प्रकरणाचा तपास NIAकडे जाण्याची शक्यता - सूत्र
  एनआयएनं संबंधित माहिती एनसीबीकडून घेतली - सूत्र
  एनसीबीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली - सूत्रांची माहिती

  21:35 (IST)

  पोपटाचा धंदा माझा नाही - नवाब मलिक
  मलिकांनी देवेंद्र फडणवीसांना दिलं प्रत्युत्तर
  '100 हून अधिकांना 26 फर्जी केसेसमध्ये अडकवलं'
  नवाब मलिकांचं पुन्हा समीर वानखेडेंवर टीकास्त्र
  'एका केसमध्ये 30 फिल्मस्टार बोलावले'
  मात्र कुठलीही अटक नाही - नवाब मलिक
  ज्ञानेश्वर सिंह यांना लेखी पत्र लिहिणार - मलिक
  आम्हाला कुणी धमकावलं तरी घाबरत नाही - मलिक
  'आम्हाला झोप लागतेय, दुसऱ्यांच्या झोपा उडवल्या'

  21:26 (IST)

  पुणे - शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील बँकेवरील दरोडा प्रकरण, दरोड्यातील आरोपींना ग्रामीण पोलिसांकडून बेड्या, 2 कोटी 19 लाखांचं सोनं आणि 18 लाखांची रोकड केली जप्त

  20:44 (IST)

  लूज बॉल आला की फटका मारायचाच - उद्धव ठाकरे
  'तो क्रिकेटमध्ये असो किंवा राजकारणात असो'
  'पण फटका मारताना विकेटही टाकायची नाही'
  सरकारकडून जे हवंय ते झालं म्हणून समजा - मुख्यमंत्री

  19:57 (IST)

  'शेतकऱ्यांचं वीजबिल ऊस बिलातून वसूल करणार'
  साखर संचालकांच्या कार्यालयाकडून पत्र पाठवलं
  सर्व साखर कारखान्यांना यासंदर्भात पाठवलं पत्र

  19:42 (IST)

  सुनील गावस्करांच्या कसोटी पदार्पणाला यंदा 50 वर्षं पूर्ण, एमसीएच्या वतीनं वानखेडे स्टेडियमवर विशेष सन्मान सोहळा,सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर यांचा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या हस्ते गौरव, सुनील गावस्करांना वानखेडेवर कायमस्वरूपी विशेष कक्ष तर दिलीप वेंगसरकरांचं स्टेडियमच्या एका स्टँडला नाव

  19:1 (IST)
  पर्यटन व इतर कारणांसाठी परदेशगमन करणारे नागरिक आणि शासकीय, खासगी आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना 28 दिवसांनंतर घेता येईल कोव्हिशिल्डचा दुसरा डोस
   
  18:52 (IST)

  उद्या सकाळी 11 वाजता आर्यन सुटणार
  पहाटे 5.30 वा. रिलीज ऑर्डर टाकली जाणार
  ओपन बेल बॉक्समध्ये रिलीज ऑर्डर टाकणार
  आर्यन खानला मिळाली रिलीज ऑर्डर
  मुंबई सत्र न्यायालयाकडून रिलीज ऑर्डर
  जेल प्रशासन ऑर्डर कन्फर्म करून घेणार
  कोर्ट प्रशासनाकडून कन्फर्म करून घेणार
  या संपूर्ण प्रक्रियेला सकाळचे 10 वाजणार
  पुढे आर्यनला बाहेर काढण्याची होणार प्रक्रिया

  18:21 (IST)

  सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर यांचा एमसीएच्या वतीनं वानखेडे स्टेडियमवर विशेष सन्मान सोहळा, दिलीप वेंगसरकर स्टँडचं शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद‌्घाटन

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स