Live Updates: नवी मुंबईत परमबीर सिंगांची सीआयडीने केली 5 तास चौकशी

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | November 29, 2021, 21:34 IST |
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  21:56 (IST)

  पराग अग्रवाल ट्विटरचे नवे सीईओ
  जॅक डोर्सींनी दिला पदाचा राजीनामा
  पराग अग्रवाल IIT मुंबईचे पदवीधर

  21:25 (IST)

  शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं 100 टक्के लसीकरण आवश्यक, पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

  21:24 (IST)

  नवी मुंबई - परमबीर सिंग सीआयडी कार्यालयाबाहेर
  परमबीर सिंगांची CID कार्यालयात 5 तास चौकशी
  मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याच्या प्रकरणात झाली चौकशी
  परमबीर सिंगांना कोकण भवनच्या मागील गेटनं सोडलं

  20:47 (IST)

  परमबीर सिंग आणि सचिन वाझे भेट प्रकरण
  चांदीवाल आयोग सुनावणीसाठी वाझेची होती तारीख
  तर दाखल होण्यासाठी आले परमबीर सिंग
  समन्स रूममध्ये परमबीर-वाझे दोघंही आमनेसामने
  मात्र दोघांच्या याच भेटीनं नवा वाद झाला उत्पन्न
  नवी मुंबईचे पो.उपनिरीक्षक पाटील होते गार्ड इन्चार्ज
  ताफ्यातील गार्ड होता समन्स रूमबाहेर तैनात
  सुनावणीसाठी अचानक आले होते परमबीर सिंग
  समन्स रूममध्ये जाण्यासाठी गार्डनं रोखलं का नाही?
  चांदीवाल आयोगाच्या निदर्शनाला, गार्डची होणार चौकशी
  कोणाच्या निर्देशावरून भेट? याची होणार चौकशी
  यासंदर्भात गार्ड इन्चार्जलाही झाली विचारणा
  घटनेच्या चौकशीचे अधिकृत सरकारी आदेश अद्याप नाही

  20:9 (IST)

  'राज्यातील शाळा ठरल्याप्रमाणे 1 डिसेंबरलाच सुरू होणार'
  नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर कोणताही बदल नाही - टोपे
  'विदेशी फ्लाईटवर बंदी घाला, केंद्राला विनंतीपत्र पाठवणार'
  'केंद्र सरकारनं विदेशी फ्लाईटवर बंदी आणली नाहीतर...'
  'काही वेगळा पर्यायी निर्णय घेता येतो का त्यावरही विचार'
  विदेशातून आलेल्या प्रवाशांनी होम क्वारंटाईन पाळावं - टोपे
  'नाहीतर संस्थात्मक विलगीकरणाचाही निर्णय होऊ शकतो'
  'ओमायक्रॉन व्हेरियंटबद्दल WHO कडून काळजी व्यक्त'
  'तसे संशोधनात्मक निष्कर्ष समोर येणं अजून बाकी'
  लोकांनी घाबरून जाऊ नये - आरोग्यमंत्री राजेश टोपे
  'कोरोना निर्बंध आणखी कठोरपणे पाळलेच पाहिजेत'
  मास्कची कारवाई आणखी कठोर करणार - राजेश टोपे

  19:54 (IST)

  द.आफ्रिकेतल्या आर्यनमॅन स्पर्धेतून 2 खेडाळू नाशकात
  स्पर्धा जिंकून आल्यानं काढली होती भव्य मिरवणूक
  'त्या' दोन्ही खेळाडूंचा कोरोना अहवाल निगेटिव्ह
  चिंतेत पडलेल्या नाशिक मनपा प्रशासनाला दिलासा

  19:11 (IST)

  'तलाव ठेक्याची रक्कम भरण्यास मुदतवाढ'
  फेब्रुवारी अखेरपर्यंत मुदतवाढ - अस्लम शेख
  राज्यातील मच्छीमार सहकारी संस्थांना मोठा दिलासा

  19:2 (IST)

  शालेय शिक्षण विभागाचा अध्यादेश

  18:59 (IST)

  पुण्यात कोरोनाचे नवे निर्देश आयुक्तांकडून जारी. सांस्कृतिक कार्यक्रम, चित्रपटगृहाना 50 टक्केच परवानगी. पुण्यात होऊ घातलेल्या सवाई गंधर्व महोत्सवाचं आयोजन 25 टक्के आसन क्षमतेनंच होणार. खुल्या जागेतील कार्यक्रमाना फक्त आसनक्षमतेच्या फक्त 25 टक्के परवानगी.

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स