Live Updates : राज्यात आज दिवसभरात 50 हजारापेक्षा जास्त रुग्णांची कोरोनावर मात

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | January 29, 2022, 22:59 IST |
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  22:58 (IST)

  महाराष्ट्रात आज दिवसभरात 27 हजार 971 नवे कोरोनाबाधित रुग्ण, 61 रुग्णांच्या मृत्यूची नोंद, दिवसभरात 50 हजार 142  रुग्णांची कोरोनावर मात, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे  94.91 टक्क्यांवर

  20:48 (IST)

  खासदार डॉ.अमोल कोल्हेंचं आळंदीत 'आत्मक्लेश'
  'व्हाय आय किल गांधी' चित्रपटात नथुरामची भूमिका
  पुरोगामी, गांधीवाद्यांनी केली होती कोल्हेंवर टीका
  गांधी पुण्यतिथी पूर्वसंध्येला 'बापूं'च्या चरणी लीन
  कोल्हेंची इंद्रायणी घाटावरील गांधी स्मारकाला भेट
  डॉ.कोल्हेंनी महात्मा गांधींना वाहिली आदरांजली
  'ज्यांच्या भावना दुखावल्या त्यांच्या प्रती दिलगिरी'
  गांधींच्या हत्येचं कधीही समर्थन केलं नाही - कोल्हे 

  20:47 (IST)

  मुंबईत दिवसभरात 1 हजार 411 नवे रुग्ण
  मुंबईत दिवसभरात 3 हजार 547 रुग्ण बरे
  मुंबईत दिवसभरात 11 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू  

  20:34 (IST)

  नाशिक कोरोना अपडेट:
  - कोरोना रुग्णांत वाढता आलेख कायम
  - जिल्ह्यात,दिवसभरात नवे 2338 रुग्ण
  - तर 2406 झाले बरे
  - मात्र,जिल्ह्यात 4 बळीची नोंद
  - आतापर्यंत,कोरोना बळींची संख्या 8 हजार 801
   - जिल्ह्यात,नाशिक शहर हॉटस्पॉट कायम 
  - शहरात नवे 1451 रुग्ण

  20:8 (IST)

  महात्मा गांधी पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला खासदार अमोल कोल्हे गांधीजींच्या चरणी लीन
  इंद्रायणी काठच्या स्मारकावर वाहिली आदरांजली 
  गांधीवाद्यांच्या भावना दुखावल्याबद्दलही व्यक्त केली दिलगिरी

  20:5 (IST)

  खासदार अमोल कोल्हेचा आळंदीत आत्मक्लेश

  गोडसेच्या भूमिका स्वीकारल्यावरून कोल्हे यांचा आत्मक्लेश

  पुरोगामी, गांधीवाद्यांनी केली होती कोल्हेंवर टीका

  19:52 (IST)

  भारतरत्नं गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतल्या ब्रिच कँडी हाँस्पीटलमध्ये गेले २१ दिवसांपासुन उपचार सुरू आहेत. लता दिदींना कोविड १९ संसर्गाची बाधा झाल्यापासून त्यांना ब्रिच कँडी हाँस्पिटलमधील आयसीयू मध्येच ठेवण्यात आलंय. दोन दिवसांपुर्वी त्यांचा व्हेंटीलेटर सपोर्ट काढण्यात आलांय. त्यानंतरही त्यांना लवकर बरं वाटावं म्हणून आयसीयू मध्येच ठेवण्यात आलंय. त्यांच्या प्रकृतीत फारश्या सुधारणा नसल्या तरी त्यांची तब्येत स्थिर असल्याचं डाँक्टरांचं म्हणनं आहे. त्यांच्यावर उपचार करताना त्या औषधांना फार कमी प्रतिसाद देत असल्याचीही माहीती मिळतेय. मंगशेकर कुटुंबीय त्यांच्या प्रकृतीला लवकर आराम पडो अशी प्रार्थनाही करत आहेत आणि त्यांच्या चाहत्यांनाही त्यांनी प्रार्थना करण्याचे आवाहन केलंय.

  19:20 (IST)

  जळगाव कोरोना अपडेट

  जिल्ह्यात आज 268 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. 

  आज बरे झालेले रुग्ण 451

  आज झालेले मृत्यू 01

  सक्रीय रुग्ण संख्या 3224

  आता पर्यंत एकूण आढळलेले रुग्ण 1 लाख 49 हजार 979

  आतापर्यंत एकूण बरे झालेल्या मध्ये 1 लाख 44 हजार 110

  आतापर्यंत एकूण मृत्यू  2585

  19:14 (IST)

  मुंबई :
  मुंबईत दिवसभरात 1411 नवे कोरोनाबाधित रुग्ण
  दिवसभरात 3547 रुग्णांची कोरोनावर मात
  दिवसभरात 11 जणांचा मृत्यू

  17:58 (IST)

  नागपूर :
  पतंग उडवतांना छतावरुन खाली कोसळल्याने 12 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

  नागपूरच्या भांडेवाडी परिसरातील भोले नगरमधील घटना

  अपघातानंतर वेळेत उपचार न मिळाल्याने चिमुकल्याचा मृत्यू

  खाजगी रुग्णालयाने आधी पैशाची मागणी केली तर सरकारी रुग्णालयात डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा नातेवाईकांचा आरोप

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स