Live Updates: माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | December 29, 2021, 19:57 IST |
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  22:9 (IST)

  राज्यातील सर्व शाळांमध्ये 3 ते 12 जानेवारी दरम्यान 'जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा' अभियान

  22:3 (IST)

  नितेश राणेंचं प्रकरण कोर्टात आहे - एकनाथ शिंदे
  'जे होईल ते कायदेशीर होईल, नियमानं होईल'
  'कोर्ट काय निर्णय देतं ते बघून पुढची कारवाई'
  महाराष्ट्राची परंपरा सुसंस्कृत आहे - एकनाथ शिंदे
  'असे प्रकार रोखण्यासाठी अधिवेशनात नवी नियमावली'
  'कुठल्याही प्रतिनिधीचा अवमान होईल असं करू नये'
  'अशी आचारसंहिता प्रत्येकानं घालून घेतली पाहिजे'
  'आपण किती प्रश्न सोडवतो यावर जनतेचं लक्ष असतं'

  21:55 (IST)

  'न्यूज18 लोकमत'च्या बातमीचा दणका
  नवी मुंबईतील डान्स बारवर पोलिसांची कारवाई
  डान्स बारमध्ये कोरोना नियमांची पायमल्ली
  'न्यूज18 लोकमत'नं दाखवली होती बातमी
  डान्सबारचं लायसन्स रद्द केलं जाण्याची शक्यता

  21:33 (IST)
  राज्यात दिवसभरात 3,900 नव्या रुग्णांची नोंद
   
  21:30 (IST)

  पनवेल उपमहापौरांच्या वाढदिवशी नियमांची पायमल्ली
  भाजपचे उपमहापौर जगदीश गायकवाडांचा कार्यक्रम
  जगदीश गायकवाडांच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांची गर्दी
  प्रशांत ठाकूरांच्या उपस्थितीत नियमांची पायमल्ली
  कामोठेत गायकवाडांचा धूमधडाक्यात वाढदिवस साजरा
  कार्यकर्त्यांना मास आणि सोशल डिस्टन्सिंगचा विसर

  21:22 (IST)

  महाराष्ट्रात ओमायक्रॉनचं संकट अधिक गडद
  राज्यात दिवसभरात ओमायक्रॉनचे 85 नवे रुग्ण
  आतापर्यंत राज्यात ओमायक्रॉनचे एकूण 252 रुग्ण

  नवी मुंबईत कोरोनाची धक्कादायक आकडेवारी समोर
  दोन दिवसांत 5 पटीनं कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ
  नवी मुंबईत दिवसभरात कोरोना रुग्णसंख्या 165
  कोरोना रुग्णसंख्या वाढीमुळे मनपाची चिंता वाढली

  19:7 (IST)

  मुंबईत कोरोनाचा पुन्हा धोका वाढला
  मुंबईत दिवसभरात कोरोनाचे 2510 नवे रुग्ण
  मुंबईत दिवसभरात 251 जण कोरोनामुक्त
  मुंबईत सध्या 8 हजार 60 अॅक्टिव्ह रुग्ण

  18:59 (IST)

  कोविड प्रतिबंधात्मक नियम मोडणाऱ्या हॉटेल, उपाहारगृहांवर होणार कठोर कारवाई, पालकमंत्री आदित्य ठाकरेंनी महापालिका मुख्यालयात महापौर आणि आयुक्तांच्या उपस्थितीत घेतली आढावा बैठक
  महापालिका आयुक्त चहल यांनी प्रशासनाची तातडीनं बैठक घेऊन दिले निर्देश, हॉटेल व उपाहारगृहांचं दैनंदिन सीसीटीव्ही फुटेज तपासणार, महापालिका आणि पोलीस प्रतिनिधींचं संयुक्त भरारी पथक ठेवणार लक्ष

  संयुक्त अरब अमिराती देशांमधून मुंबई विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना आगमनप्रसंगी आरटीपीसीआर चाचणी व त्यासापेक्ष 7 दिवसांचं गृहविलगीकरण सक्तीचं, हवाईमार्गे आलेल्या आणि लक्षणं नसलेल्या कोविडबाधित रुग्णांसाठी बीकेसी आणि नेस्को कोविड केंद्रात स्वतंत्र, निःशुल्क विलगीकरण व्यवस्था, मालाड आणि कांजुरमार्ग कोविड केंद्र तात्काळ कार्यान्वित करण्याचे निर्देश

  17:53 (IST)

  मी व्यस्त असल्यानं चौकशीला येऊ शकत नाही - राणे
  नारायण राणेंचं कणकवली पोलीस ठाण्याला पत्र - सूत्र
  'आणखी 2-3 दिवस व्यस्त असणार, त्यानंतर येऊ शकेन'
  आपण कॉन्फरन्सवर माझी जबानी घेऊ शकता - सूत्र

  17:50 (IST)

  राज्यपालांकडून दिव्यांग शिक्षण संस्थेला संगणक खरेदीसाठी 15 लाखांचा निधी जाहीर

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स