LIVE : सोलापुरात 4 मुले भीमा नदीत वाहून गेले, शोधकार्य सुरू

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | May 29, 2021, 21:51 IST |
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  21:25 (IST)

  'कोरोना' संबंधित वस्तूंवर जीएसटी माफी, सवलत
  केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून मंत्रिगट स्थापन
  मंत्रिगटाच्या सदस्यपदी अजित पवारांची नियुक्ती
  'समिती 8 जूनपर्यंत केंद्राकडे शिफारसी करणार'
  जीएसटी परिषदेतील अजित पवारांच्या मागणीची दखल

  20:46 (IST)

  कोरोनामुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेली मुलं
  'त्या' मुलांची शिक्षण आणि निवासाची सोय व्हावी
  सनाथ फाऊंडेशनची उच्च न्यायालयात याचिका
  योग्य ती कार्यवाही करण्याचा मुद्दाही याचिकेत नमूद 

  कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या मुलांची शिक्षण आणि निवासाची सोय व्हावी यासाठी योग्य प्रक्रिया राबवावी या करता सनाथ फौंडेशनच्या गायत्री पाठक यांनी असीम सरोदे यांच्या साहाय्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे कोरोनाने मृत्यू एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या मुलांच्या जगण्याचा प्रश्न तीव्र बनला आहे याबाबत विविध राज्यांनी घोषणाबाजी केली आणि आश्वासन खूप दिली मात्र प्रत्यक्षात काहीच केलेलं नाही याकडे ही याचिकेद्वारे लक्ष वेधण्यात आलंय विशेषतः दोन्ही पालक।गमावलेल्या मुलांच्या संपत्ती मध्ये फेरफार व्हायचीही शक्यता आहे यामुळं याबाबतही योग्य ती कार्यवाही व्हावी हाही मुद्दा याचिकेत नमूद करण्यात आला आहे

  20:12 (IST)

  राज्यासाठी सकारात्मक, दिलासादायक बातमी
  राज्यात नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त अधिक
  राज्यात दिवसभरात 31,964 कोरोनामुक्त
  राज्यात दिवसभरात 20,295 नवीन रुग्ण
  राज्यात दिवसभरात 443 रुग्णांचा मृत्यू
  रिकव्हरी रेट 93.46 तर मृत्युदर 1.65 टक्के
  राज्यात सध्या 2 लाख 76,573 अॅक्टिव्ह रुग्ण

  मुंबईत दिवसभरात कोरोनाचे 1048 नवे रुग्ण
  मुंबईत दिवसभरात 1359 कोरोनामुक्त
  मुंबईत दिवसभरात 25 रुग्णांचा मृत्यू
  मुंबईत रुग्णदुपटीचा वेग 399 दिवसांवर 

  17:16 (IST)

  कुस्तीपटू सुशील कुमारला 4 दिवसांची कोठडी
  दिल्लीतील रोहिणी कोर्टाचा निर्णय  

  17:15 (IST)

  संभाजीराजेंनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट
  दोन्ही नेत्यांमध्ये मराठा आरक्षण मुद्द्यावर चर्चा
  संभाजीराजेंची भूमिका महत्त्वाची - आंबेडकर
  'राजकीय पक्षांना मराठा आरक्षणात रस नाही'
  'आरक्षण समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचं साधन'
  'रिव्ह्यू पीटिशन आणि राजसत्ता हे दोनच पर्याय'
  राज्यकर्त्यांची प्रामाणिक इच्छा हवी - आंबेडकर
  'राजकारणात शिळेपणा आलाय तो ताजेपणा हवा'
  'परिस्थिती प्रतिकूल मात्र प्रयत्न करावे लागतील'
  लवकरच दिल्लीत गोलमेज परिषद - संभाजीराजे
  'मुख्य नेते, खासदार, मुख्यमंत्र्यांना निमंत्रित करणार'

  16:9 (IST)

  पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक वास्तव समोर
  CSR फंडातील 48 व्हेंटिलेटर्स खासगी रुग्णालयांना
  'या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करा'
  'दोषींविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा'
  भाजपचे आमदार लक्ष्मण जगतापांची मागणी

  15:53 (IST)

  कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता - मुख्यमंत्री
  'पहिल्या लाटेत वृद्धांना, आता मुलांना धोका'
  आपल्या कुटुंबाची काळजी घ्या - मुख्यमंत्री
  'पावसाळ्यात अधिक खबरदारी घेतली पाहिजे'
  कोरोना आजार अंगावर काढू नका - मुख्यमंत्री
  'औषधांचा अनाठायी, अनावश्यक वापर टाळा'
  'डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेणं टाळा'
  'लस घेतल्यानंतरच्या परिणामांची नोंद ठेवायला हवी'
  'म्युकरमायकोसिसवर उपचारपद्धती निश्चित करावी'
  'राज्यात ऑक्सिजनची कमतरता पुन्हा भासू नये'
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे प्रशासनाला निर्देश 

  13:23 (IST)

  आयपीएलचे उर्वरित सामने यूएईमध्ये
  बीसीसीआयचे राजीव शुक्लांची माहिती

  13:4 (IST)

  स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण रद्द
  सरकारची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
  ओबीसींना मिळणारं राजकीय आरक्षण संपुष्टात

  12:1 (IST)

  मुंबई व्यापारी संघटनेनं घेतली राज्यपालांची भेट
  दुकानं सुरू करायला परवानगी देण्याची मागणी
  'लॉकडाऊनकाळात GST, वीजबिलात सवलत द्या'
  लॉकडाऊनचा कालावधी वाढणार असल्यानं मागणी

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स