शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचं 31 मार्चला होणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन, कोरोना निर्बंध नियमावलीमुळे निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत होणार भूमिपूजन, जुन्या महापौर निवासाच्या जागेत बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाची होणार उभारणी
20:18 (IST)
राज्यात दिवसभरात 31,643 नवीन रुग्ण
राज्यात दिवसभरात 20,854 कोरोनामुक्त
राज्यात दिवसभरात 102 रुग्णांचा मृत्यू
सध्या 3 लाख 36 हजार 584 ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबईत दिवसभरात 5,888 नवीन रुग्ण
मुंबईत दिवसभरात 12 रुग्णांचा मृत्यू
19:44 (IST)
नागपूर शहरात होळीला लागलं गालबोट, क्षुल्लक वादातून एकाची निर्घृण हत्या, 3 ते 4 आरोपींनी धारधार शस्त्रानं केली हत्या
19:40 (IST)
गडचिरोली - पाचही मृत माओवाद्यांची ओळख पटली
50 लाख बक्षीस असलेल्या माओवादी भास्करचा मृत्यू
जहाल माओवादी भास्करवर 115 गुन्हे दाखल
भास्करचा मृत्यू हा माओवादी चळवळीसाठी हादरा
टिपागड दलमचा उपकमांडर नैतामचाही समावेश
प्लाटून पंधराची सदस्य सुजाता गावडेचाही समावेश
18:45 (IST)
बंडातात्या कराडकरांचं देहूतील आंदोलन स्थगित
5 मागण्यांचं निवेदन देऊन केलं आंदोलन स्थगित
उद्याच्या तुकाराम बीज सोहळ्याला लावणार हजेरी
येणारी आषाढी वारी ही पायीच व्हावी, अशी मागणी
18:42 (IST)
बेळगाव - महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवारी अर्ज, युवा आघाडी अध्यक्ष शुभम शेळके यांचा अर्ज दाखल, 17 एप्रिलला होणार लोकसभा पोटनिवडणूक, राष्ट्रीय पक्षांना मराठी भाषिक शह देणार का?
18:19 (IST)
पुण्यात दिवसभरात 2547 नवीन रुग्ण
पुण्यात दिवसभरात 2771 कोरोनामुक्त
पुण्यात दिवसभरात 32 रुग्णांचा मृत्यू
18:17 (IST)
सातारा - कोयनानगर इथं शासकीय निवासस्थानात लिपिकाची आत्महत्या, बंडू कुंभार हे कोयनानगर जलसंपदा विभागातील कर्मचारी, कोयनानगर पोलिसांत गुन्हा दाखल
18:14 (IST)
नाशिक पोलीस, पालिकेचा गर्दीवर नवीन फंडा
एका तासात खरेदी करून घरी जा
तासाभरासाठी कोणालाही आता 5 रु. शुल्क
...अन्यथा भरावा लागणार 500 रुपये दंड
नाशिक शहरातील काही भागात उपक्रम
वाढणारी गर्दी रोखण्यासाठी हे सशुल्क बंधन
17:54 (IST)
नागपुरात दिवसभरात 3,188 नवीन रुग्ण
नागपुरात दिवसभरात 55 रुग्णांचा मृत्यू
कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स