liveLIVE NOW

LIVE : आज राज्यात 8623 रुग्णांची कोरोनावर मात, रिकव्हरी रेट 96 टक्के

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | June 29, 2021, 20:19 IST
  facebookTwitterLinkedin
  LAST UPDATED 5 MONTHS AGO

  AUTO-REFRESH

  HIGHLIGHTS

  21:29 (IST)

  मंत्रालयात पार्किंगला निर्बंध, केवळ निवडक 30 पदांवर असलेल्या व्यक्तींना वाहन पार्किंग करता येईल, शासकीय वाहनांवर लावणार स्टीकर, स्टीकर नसलेल्या वाहनांना प्रवेश नाही

  20:56 (IST)

  राष्ट्रवादी कॉंग्रेसची पार पडली महत्वाची बैठक
  राष्ट्रवादीचे काही प्रमुख नेते, मंत्री होते उपस्थित
  प्रफुल्ल पटेलांच्या निवासस्थानी झाली बैठक
  महामंडळ वाटपाबाबत बैठकीत चर्चा - नवाब मलिक
  महामंडळ अध्यक्ष, उपाध्यक्ष सदस्य कोण? यावर चर्चा
  विभागवार नावांची चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती
  देशमुखांना विनाकारण त्रास दिला जातोय - मलिक
  राजकीय सूडबुद्धीनं ही कारवाई होतेय - मलिक
  मविआ सरकारला बदनाम केलं जातंय - मलिक
  मविआ सरकारमध्ये समन्वय - नवाब मलिक
  'संघटना आणि अधिवेशनात येणाऱ्या मुद्यांवर चर्चा'
  अध्यक्षपदाची निवडणूक झाली पाहिजे - नवाब मलिक
  तिन्ही पक्ष एकत्र येऊन निर्णय घेतील - मलिक

  20:5 (IST)

  राज्यात दिवसभरात 8,085 रुग्णांची नोंद
  राज्यात दिवसभरात 8,623 कोरोनामुक्त
  राज्यात दिवसभरात 231 रुग्णांचा मृत्यू
  रिकव्हरी रेट 96 तर मृत्युदर 2.1 टक्के
  राज्यात सध्या 1 लाख 17,098 अॅक्टिव्ह रुग्ण 

  19:10 (IST)

  अनिल देशमुखांना अटकेची वाटत असावी भीती - दरेकर
  त्यामुळेच ईडी चौकशीला सामोरे जात नाहीत - दरेकर
  'ईडी चौकशीनंतर पलांडे आणि शिंदे यांना अटक'
  'आपल्याबाबतही तसंच होण्याची भीती वाटत असावी'
  'देशमुखांनी चौकशीला जाण्यासाठी नकार दिला असावा'
  विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचं वक्तव्य
  'कायद्यासमोर कोणालाही पळवाट काढता येत नाही'
  कायदा हा सर्वांना सारखा असतो - प्रवीण दरेकर

  18:44 (IST)

  'वर्षा'वर शरद पवार-उद्धव ठाकरेंची झाली बैठक
  शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये 1 तास महत्वाची चर्चा
  पवार-ठाकरे बैठकीतील चर्चा मात्र गुलदस्त्यात

  18:37 (IST)

  नाशिक - इगतपुरीतील रेव्ह पार्टी प्रकरण, एका अभिनेत्रीसह 12 महिलांना 7 दिवसांची पोलीस कोठडी, 6 जुलैला करणार कोर्टात हजर

  18:27 (IST)

  पुणे शहराच्या सर्वसमावेशक विकासासाठी कटिबद्ध, पुणे शहराचे प्रश्न तातडीनं मार्गी लावण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय, सहकार्यानं काम करावं; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश

  18:12 (IST)

  5, 6 जुलैला विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन
  शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हीप जारी
  पावसाळी अधिवेशनात उपस्थित राहण्याचे आदेश

  17:54 (IST)

  'डेल्टा प्लसबाबत चिंता करण्याची सध्या गरज नाही'
  राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

  17:37 (IST)

  लसीकरणाबाबत हलगर्जीपणा नको - राजेश टोपे
  'लसीकरणाला दुय्यम स्थान दिलं नाही पाहिजे'
  '70% लसीकरण केल्यास दाहकता राहणार नाही'
  ती लाट केव्हा येईल तेव्हा येईल - आरोग्यमंत्री
  'लसीकरणच कोरोनाची दाहकता कमी करू शकतो'
  'पहिला डोस झाला, दुसरा डोस लवकर होत नाही'
  दुसऱ्या डोसचे नियम पाळले पाहिजेत - राजेश टोपे
  'आरोग्य विभागाला नागरिकांचं सहकार्य अपेक्षित'
  'आम्ही सर्व जिल्ह्यांना तिसऱ्या टप्प्यात आणलंय'
  कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळावेत - राजेश टोपे
  डेल्टाबाबत 4 हजार लोकांचे सॅम्पल घेतले - टोपे
  '21 जण डेल्टाचे रुग्ण आढळले, एकाचा मृत्यू झाला'
  वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जातायत - राजेश टोपे
  2 हजार 40 लोकांमध्ये फेक लसीकरण - राजेश टोपे
  यासंदर्भात 10 जणांना अटक केलीय - राजेश टोपे

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स