Live Updates: पुण्यात नवले पुलाजवळ अपघाताच सत्र सुरूच, 3 ट्रक एकमेकांना धडकले

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | November 28, 2021, 17:56 IST |
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  21:19 (IST)

  आंतरराष्ट्रीय प्रवास करून आल्यास जिल्हा प्रशासनाला माहिती देणं बंधनकारक, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना, आंतरराष्ट्रीय प्रवास करून आल्यानंतर माहिती न दिल्यास कठोर कारवाई होणार, नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढले सविस्तर आदेश

  20:57 (IST)

  आधी पेट्रोल-डिझेलनं रडवलं, आता CNG रडवणार
  CNG, PNG ची दरवाढ सहन करावी लागणार
  दोन महिन्यांत तिसऱ्यांदा सीएनजी महागला
  10 महिन्यांत 14 रुपयांनी महागला सीएनजी

  20:41 (IST)

  उद्या सकाळी 10 वा. राज्य मंत्रिमंडळाची बैठक
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हीसीद्वारे उपस्थित राहणार

  20:2 (IST)

  'जिओ' वापरणाऱ्या ग्राहकांसाठी खुशखबर
  जिओकडून नवीन अनलिमिटेड प्लॅन जाहीर
  सर्वात कमी दरात दर्जेदार सेवेचं पाळलं वचन
  या नवीन योजना 1 डिसेंबर 2021 पासून उपलब्ध

  17:25 (IST)

  दोन वर्षांत महाराष्ट्र 20 वर्षं मागे - प्रवीण दरेकर
  'असणारे प्रकल्प ठप्प, अर्ध्या मंत्रिमंडळावर डाग'
  गुन्हेगारीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर - दरेकर
  ही महाविकास आघाडीची उपलब्धी - प्रवीण दरेकर
  महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा - दरेकर
  राज्यात सरकार नावाची चीज अस्तित्वात नाही - दरेकर
  याला मार्ग काढू शकतं ते आमचं सरकार - प्रवीण दरेकर
  निश्चितपणे देवेंद्रजींच्या नेतृत्वात सरकार येणार - दरेकर
  'पालकमंत्री झाल्यावर शहरातील गुन्हेगारी वाढली'
  विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांची छगन भुजबळांवर टीका
  विकासकामांच्या मुद्यावर मनपा निवडणूक लढणार - दरेकर

  16:34 (IST)

  दुसऱ्या डावात न्यूझीलंडच्या 1 बाद 4 धावा
  भारत-न्यूझीलंड कानपूर कसोटी रंगतदार अवस्थेत

  16:31 (IST)

  कानपूर - भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिली कसोटी
  भारताच्या 7 बाद 234 धावा, डाव केला घोषित
  न्यूझीलंडसमोर विजयासाठी 284 धावांचं आव्हान
  श्रेयस अय्यर, वृद्धिमन साहाची शानदार अर्धशतकं
  कसोटी जिंकण्यासाठी आता गोलंदाजांवर भिस्त

  16:19 (IST)

  संघर्ष एसटी कामगार युनियनचं मुख्यमंत्र्यांना खुलं पत्र
  'शशांक राव सोमवारपासून बेमुदत उपोषणाला बसणार'
  'विलीनीकरणाच्या मागणीसाठी उपोषण करणार'
  'कर्मचाऱ्यांचा संप सरकारकडून चिरडण्याचा प्रयत्न'
  'मोठ्या प्रमाणावर एसटी कामगारांवर कारवाई झाली'
  संवेदनशील मुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची पत्रात मागणी

  15:17 (IST)

  राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला
  धुळे बस आगारातील 36 कर्मचारी निलंबित
  अकोल्यातील 110 एसटी कर्मचारी निलंबित
  जालन्यात आतापर्यंत 170 कर्मचारी निलंबित
  आंदोलक आक्रमक, सरकारविरोधात घोषणाबाजी

  15:15 (IST)

  बीडमधील आणखी एका मंदिराला धमकी पत्र
  अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवस्थानाला धमकी पत्र
  मंदिर उडवण्याची धमकी, 50 लाखांची मागणी
  धमकीच्या दुसऱ्या पत्रानं बीडमध्ये खळबळ

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स