2 फेब्रुवारीला एमआयजी क्लब इथं बैठक
राज ठाकरेंनी बोलावली महत्त्वपूर्ण बैठक
मनपा निवडणुकीसाठी रणनीती तयार करणार
पक्षनेते, सरचिटणीस, शहर अध्यक्षांना निमंत्रण
21:41 (IST)
अपघातात चालकाचा कारमध्ये जळून मृत्यू
नागपूरजवळच्या पाचगाव शिवारातील घटना
दरीत कोसळल्यानंतर कारनं घेतला पेट
दुर्घटनेत चालक अशोक राऊत यांचा मृत्यू
20:37 (IST)
सुप्रीम कोर्टानं पदोन्नतीतील आरक्षण वैध ठरवलं असून हा निकाल ऐतिहासिक व दूरगामी परिणाम करणारा आहे, या
निकालाचं मी मनःपूर्वक स्वागत करतो, ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊतांची प्रतिक्रिया
20:34 (IST)
चंद्रपूर : कॉईलमध्ये वापरल्या जाणाऱ्या कॉपर तारेने पतंग उडवणे बालकाला पडले महागात, पतंगीच्या कॉपर तारांचा विजवाहक तारांना झाला स्पर्श, जोरदार धक्का लागल्याने बालक गंभीर जखमी
20:32 (IST)
गोंदिया शहरातील सामाजिक कार्यकते धनेद्र भरले यांच्यावर अज्ञात आरोपीने केला गोळीबार, गोंदिया रामनगर पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या कंटगी गावाजवळ झाला गोळीबाराचा थरार
20:10 (IST)
शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर आणि भाजप नेते केशव उपाध्ये यांच्यात ट्विटर वॉर, माझ्या आमदारकीची चिंता नसावी, उर्मिला मातोंडकरांचं केशव उपाध्येंना प्रत्युत्तर
20:6 (IST)
शिर्डीजवळील साकुरी शिवारात अपघात, टँकरखाली चिरडल्यानं दुचाकीस्वाराचा मृत्यू
18:58 (IST)
गोव्यात दिवसभरात 20 कोरोना रुग्णांचा मृत्यू
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतील हा उच्चांक
गोव्यात काल 15 जणांचा झाला होता मृत्यू
18:28 (IST)
नाशिक - इगतपुरीत गँगवॉरचा भडका
पूर्ववैमनस्यातून दोन गटात तुफान राडा
घटनेत एकाचा खून, एकजण गंभीर जखमी
राज्य राखीव दलाच्या 2 तुकड्या दाखल
गावात संचारबंदी लागू, बाजारपेठा बंद
17:51 (IST)
मुंबई - धारावी परिसरात आज शून्य कोरोना रुग्णाची नोंद
पहिल्या लाटेत रुग्णसंख्या शून्य होईपर्यंत 269 दिवस लागले
दुसऱ्या लाटेत 119 दिवसांनंतर धारावीत रुग्णसंख्या शून्य
तिसऱ्या लाटेत 31 दिवसांनंतर धारावीत रुग्णसंख्या शून्य
कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स