• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Live Updates: बुधवारी संध्याकाळी 7 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बोलावली बैठक

Live Updates: बुधवारी संध्याकाळी 7 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बोलावली बैठक

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | February 28, 2022, 14:23 IST
  LAST UPDATED 4 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  22:12 (IST)

  युक्रेन-रशिया युद्धावर संयुक्त राष्ट्राच्या महासभेत चर्चा
  शस्त्रसंधी करावी, महासचिवांनी केलं आवाहन
  शांतता हाच पर्याय असल्याचं केलं अधोरेखित

  22:12 (IST)

  युद्धामुळे युक्रेनमध्ये अडकलेत भारतीय
  'सुटकेसाठी महत्त्वाची भूमिका बजावावी'
  पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मंत्र्यांना निर्देश
  भारतीयांच्या सुटकेसाठी मंत्री प्रयत्न करणार

  20:45 (IST)

  संयुक्त राष्ट्र महासभेचं विशेष सत्र
  रशिया-युक्रेन युद्धावर होणार चर्चा
  रशियाविरोधात प्रस्ताव मंजुरीची शक्यता

  20:28 (IST)

  पंतप्रधान मोदींची उच्चस्तरीय बैठक
  गेल्या 48 तासांमधील ही तिसरी बैठक
  रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर चर्चा
  मंत्रालयाचे तिन्ही अधिकारी उपस्थित

  19:34 (IST)

  गोंदिया जिल्ह्यातील 30 राईस मिलचालकांवर जिल्हाधिकाऱ्यांनी केली दंडात्मक कार्यवाही, 'न्यूज18 लोकमत'नं धान घोटाळा उघडकीस आणला होता

  19:30 (IST)

  रशिया-युक्रेन युद्धाबाबत मोठी बातमी
  रशिया आणि युक्रेनमधील बैठक संपली
  बेलारूसमध्ये दोन्ही देशांमध्ये झाली चर्चा
  चर्चेतून युद्धावर तोडगा निघणार का?

  19:13 (IST)

  राज्याच्या मुख्य सचिवपदी मनुकुमार श्रीवास्तव
  श्रीवास्तव 1986 च्या तुकडीचे IAS अधिकारी

  18:30 (IST)

  'बेलारूसमधील अमेरिकेचा दूतावास बंद'
  रशियन प्रसारमाध्यमांनी केला दावा

  18:16 (IST)

  बेलारूसमध्ये अण्वस्त्र तैनात करू शकते रशिया
  जगावर दाटले अणुयुद्धाचे ढग
  रशियाकडून परमाणू पाणबुड्या तयार
  अण्वस्त्र पथक रशियाकडून तयार

  17:54 (IST)

  युक्रेनहून विद्यार्थ्यांना घेऊन विमान भारतात
  युक्रेनहून सहावं विमान भारतात दाखल
  'ऑपरेशन गंगा'अंतर्गत विमान भारतात

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स