Live Updates: सांगलीत 47 वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी कोरोना पॉझिटिव्ह

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | December 29, 2021, 00:24 IST
  LAST UPDATED 9 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  22:14 (IST)

  अधिवेशनात सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार
  'विधिमंडळात 50 जणांना कोरोनाची लागण'
  आमच्या 2 मंत्र्यांना कोरोना झाला - अजित पवार
  'राज्यात ओमायक्रॉनचा फैलाव वाढतोय'
  'कोरोना रुग्ण वाढतायत, काळजी घेणं गरजेचं'
  5 दिवसांत 24 विधेयकं मंजूर - अजित पवार
  चर्चा करून विधेयकं मंजूर केली - अजित पवार
  ऐतिहासिक शक्ती विधेयक मंजूर - अजित पवार
  'महिला शक्तीला बळ देण्याचं काम केलं'
  'सिंधुदुर्गात आमच्या गाडीचं सारथ्य महिलेनं केलं'
  इम्पेरिकल डेटासाठी निधी मंजूर - अजित पवार
  'सर्व विभागांना न्याय दिला, कुणावर अन्याय नाही'
  एकूण 28 विधेयकांवर कामकाज झालं - अजित पवार
  'विदर्भ-मराठवाड्यावर अन्यायाचा आरोप खोटा'
  'ओबीसी अरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नये'
  दोन्ही सभागृहात ठराव मंजूर केला - अजित पवार
  'ठराव निवडणूक आयोगाला पाठवला जाईल'

  22:12 (IST)

  विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
  विद्यापीठ सुधारणा विधेयक गदारोळात मंजूर
  कुलपतीचे अधिकार कमी केले नाहीत - सामंत
  'विरोधकांकडून चुकीची माहिती पसरवली जातेय'
  उदय सामंतांचं विरोधकांच्या आरोपांना उत्तर
  जमीन बळकावण्याचा प्रयत्न नाही - उदय सामंत
  तसा प्रकार झाल्यास आम्ही हाणून पाडू - सामंत
  प्र-कुलपतीच्या कायद्यात बदल नाही - सामंत
  विधेयक एवढं का झोंबलंय? - उदय सामंत

  21:31 (IST)

  विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलं
  आजचा लोकशाहीतील काळा दिवस - फडणवीस
  सर्वात घाबरट आणि पळपुटं सरकार - फडणवीस
  चर्चा न करता विधेयक मंजूर केलं - फडणवीस
  प्रतिगामी पद्धतीनं विद्यापीठांवर कब्जा - फडणवीस
  विद्यापीठ हे राजकारणात नव्हतं - फडणवीस
  विद्यापीठं राजकारणाचा अड्डा बनणार - फडणवीस
  'नवीन शैक्षणिक धोरणाविरोधात हा कायदा'
  देवेंद्र फडणवीसांची मविआ सरकारवर टीका
  'विद्यापीठांना शासकीय महामंडळ बनवायचंय'
  'सगळ्या प्राधिकारणांवर सरकारची सरशी'
  'राज्यपालांची भेट घेऊ, न्यायालयात जाऊ'
  'प्रत्येक विद्यापीठात भाजप आंदोलन करणार'
  'उद्या पैसे घेऊन डिग्री वाटल्या तरी आश्चर्य नको'
  लोकशाहीच्या प्रथांचं उल्लंघन केलं - मुनगंटीवार
  हा सरकारचा आतंकवाद आहे - सुधीर मुनगंटीवार
  'सरकारकडून अव्यवस्था निर्माण करण्याचं काम'
  'लोकशाहीचं उल्लंघन करत हा कायदा आणला'
  सरकारचे आमदार त्यांच्याच विरोधात - फडणवीस

  20:56 (IST)

  दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत पहिली कसोटी
  आफ्रिकेच्या पहिल्या डावात सर्व बाद 197 धावा
  भारताच्या भेदक माऱ्यासमोर आफ्रिकेची दाणादाण
  पहिल्या डावात भारताकडे 130 धावांची आघाडी
  मोहम्मद शामीला सर्वाधिक 5 विकेट्स
  सिराज 1, बुमरा, शार्दूलला प्रत्येकी 2 विकेट्स

  20:2 (IST)

  महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा धोका वाढला
  राज्यात दिवसभरात 2172 कोरोनाचे नवे रुग्ण
  राज्यात दिवसभरात कोरोनामुळे 22 जणांचा मृत्यू
  राज्यात आज ओमायक्रॉनचा एकही रुग्ण नाही

  19:34 (IST)

  रिलायन्स फॅमिली डे 2021
  अंबानी कुटुंबीयांकडून नववर्षाच्या शुभेच्छा
  आरोग्याला नेहमीच पहिलं प्राधान्य - अंबानी
  कुटुंब संस्थेला प्राधान्य - मुकेश अंबानी
  'कोरोनाकाळात प्रत्येकाची कुटुंबाप्रमाणे काळजी'
  'भारत जगातील सर्वोत्तम अर्थव्यवस्था बनेल'
  'मिशन अन्नसेवेच्या माध्यमातून कोरोनात काम'
  कोट्यवधी नागरिकांना अन्नपुरवठा - नीता अंबानी
  रुग्णसेवेतही रिलायन्स फाऊंडेशनचा पुढाकार

  18:43 (IST)

  'रजा अकादमी प्रत्यक्ष बंदमध्ये सहभागी नव्हती'
  अमरावती दंगलप्रकरणी 686 जण अटकेत - गृहमंत्री
  विद्यार्थ्यांना आम्हाला आश्वस्त करायचंय - गृहमंत्री
  'शेवटचा माणूस सापडेपर्यंत पोलीस चौकशी करतील'
  6 आस्थापनांवर कारवाई केली आहे - वळसे पाटील
  चौघांचा ऑर्केस्ट्राचा परवाना रद्द - दिलीप वळसे पाटील
  '10 जणांना कारवाई का करू नये अशी नोटीस'
  'पोलीस बदल्यांपायी 1 रुपया द्यावा लागणार नाही'
  कुणी माझ्यापर्यंत आलं तर कुणाचीही गय नाही - गृहमंत्री
  'हिंगणघाटप्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबाला मदत'
  सीएम निधीतून 5 लाख 73 हजार दिले - वळसे पाटील
  'मिशन शौर्य एव्हरेस्टबाबत थेट नियुक्तीचं धोरण नाही'

  18:27 (IST)

  गडचिरोली पोलिसांचं अभिनंदन करतो - वळसे पाटील
  '2 वर्षं कोरोनाच्या बंदोबस्तामुळे पोलिसांवर ताण'
  'खून आणि खुनाचा प्रयत्न यात वाढ झाली नाही'
  'महिला अत्याचाराचे 30548 गुन्हे दाखल आहेत'
  'पती आणि नातेवाईकांनी केलेल्या छळामुळे यात वाढ'
  बलात्काराच्या गुन्ह्यात 948 नं वाढ - वळसे पाटील
  'संघटित गुन्हेगारीत 818 जणांवर 108 गुन्ह्यात कारवाई'
  वाळू उपशात एक धोरण स्वीकारलं पाहिजे - गृहमंत्री
  मर्यादेपेक्षा जास्त उपसा केला जातोय - वळसे पाटील

  18:19 (IST)

  नागरिकांनी आता काळजी घेतली पाहिजे - महापौर
  'ओमायक्रॉनचे रुग्ण वाढतायत, गर्दी करू नये'
  '10 ते 20% लोक नियम पाळत नाही आहेत'
  'पंतप्रधान चिंतेत आहेत, सूचना दिल्या आहेत'
  'नियमांचं पालन करून नववर्षाचं स्वागत करा'
  लसीकरणासाठी नागरिकांनी पुढे यावं - महापौर
  'थर्टीफर्स्टला नाईट क्लबबाबत आयुक्त घेतील निर्णय'
  व्यवसायाचा विचार केला जाईल - किशोरी पेडणेकर
  आर्थिक नुकसान होतंय याची कल्पना आहे - महापौर

  17:13 (IST)

  राष्ट्रपती राजवटीला मविआ सरकार घाबरत नाही - नाना पटोले

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स