LIVE NOW

LIVE : संजय राठोडांच्या खात्याची जबाबदारी अन्य मंत्र्याकडे देण्याची शक्यता

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

Lokmat.news18.com | February 28, 2021, 9:42 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated February 28, 2021
auto-refresh

Highlights

9:42 pm (IST)

वानवडी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन
भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंना नोटीस
पूजाची आजी शांता राठोड यांनाही नोटीस
सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी नोटीस

9:23 pm (IST)

राज्यात दिवसभरात 8,293 नवे रुग्ण
राज्यात दिवसभरात 3,753 रुग्ण बरे
राज्यात दिवसभरात 62 रुग्णांचा मृत्यू
रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 93.95 टक्के
राज्यात सध्या 77,008 ॲक्टिव्ह रुग्ण

8:37 pm (IST)

'कोविड-19' लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी बृहन्मुंबई महापालिका सुसज्ज, महापालिकेच्या रुग्णालयांसह निवडक खासगी रुग्णालयांमध्येही लसीकरणाची सुविधा, टप्प्याटप्प्यानं वाढवणार बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील लसीकरण केंद्रांची संख्या

8:34 pm (IST)

रिलायन्स इंडस्ट्रीजची स्काय ट्रान कंपनीत गुंतवणूक, स्काय ट्रानमध्ये रिलायन्सचं भागभांडवल आता 54.46 टक्के, स्काय ट्रान ही दळणवळण क्षेत्रातील कंपनी

8:11 pm (IST)

पूजा चव्हाणला न्याय मिळेल तेव्हाच सत्याचा विजय होईल -चंद्रकांत पाटील

7:57 pm (IST)

सुप्रीम कोर्टातील सुनावणीपूर्वी विविध प्रतिनिधींसोबत मुख्यमंत्र्यांची चर्चा, मराठा आरक्षण टिकण्यासाठी जे आवश्यक ते केले जाईल -उद्धव ठाकरे

7:32 pm (IST)

'फडणवीसांनी अविश्वास ठराव मांडावा'
'किती आमदार सोबत आहेत दाखवून देऊ'
फडणवीसांच्या आरोपावर अजित पवारांचा टोला

7:30 pm (IST)

'उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतंय'
अजित पवार, एकनाथ शिंदे, परबही उपस्थित
अजूनही कोरोनाचा धोका गेला नाही -मुख्यमंत्री
'कोरोनाला आटोक्यात आणण्याचे प्रयत्न'
8 तारखेला अर्थसंकल्प सादर करणार -मुख्यमंत्री
दुसरी लाट वाढू नये यासाठी प्रयत्न -मुख्यमंत्री
विरोधकांच्या आरोपात तथ्य नाही -मुख्यमंत्री
'विरोधकांकडून कोरोना योद्ध्यांची चेष्टा'
विरोधकांची याबाबत मला कीव येते -मुख्यमंत्री
महाराष्ट्रातला विरोधी पक्ष दुतोंडी -उद्धव ठाकरे
'सीमाप्रश्नावरच्या विरोधकांच्या भूमिकेबाबत आनंद'
...तर सीमावासीयांना न्याय देऊ शकू -मुख्यमंत्री
केंद्रातलं सरकार सगळं ओरबाडतंय -मुख्यमंत्री
'इंधनाच्या दरवाढीबाबत का बोलत नाहीत?'
'GST'ची राज्याची रक्कम येणं बाकी -मुख्यमंत्री
विराटची सेंच्युरी पाहिली -उद्धव ठाकरे
'मात्र पेट्रोलची सेंच्युरी पहिल्यांदाच पाहतोय'
आम्ही विनासायास कर्जमुक्ती केली -मुख्यमंत्री
'कोरोनाच्या काळातही कर्जमुक्ती दिली'
राठोडप्रकरणी मुख्यमंत्र्यांचं महत्वपूर्ण वक्तव्य
न्यायानं वागणं ही आमची जबाबदारी -मुख्यमंत्री
पूजाच्या कुटुंबीयांचं मुख्यमंत्र्यांना पत्र -मुख्यमंत्री
'संजय राठोड प्रकरणी गलिच्छ राजकारण'
तपास निष्पक्षपणे व्हायला हवा -मुख्यमंत्री
'संजय राठोडांचा राजीनामा स्वीकारलाय'
तपास यंत्रणांवर दडपण नको -उद्धव ठाकरे
'घटनेच्या निष्पक्षपणे चौकशीचे आदेश दिलेत'
'तपासाची दिशा भरकटवण्याचं विरोधकांचं काम'
कोणालाही पाठीशी घालणार नाही -मुख्यमंत्री
'पूजा चव्हाण प्रकरणी चौकशी नीट होऊ द्या'
'तुमच्या काळातही हीच तपास यंत्रणा होती'
या यंत्रणांवर तुमचा आताच अविश्वास का? -सीएम
गुन्हा दाखल केला म्हणजे न्याय नाही -मुख्यमंत्री
'दोषी कोणीही असला तरी कारवाई होणारच'
फडणवीसांनी फुकटचा सल्ला दिला -मुख्यमंत्री
'सरकारचं काही चुकत असेल तर जरूर सांगा'
तुमच्याकडे असलेले पुरावे द्या -मुख्यमंत्री
'वनखात्याचा कारभार सध्या माझ्याकडे आहे'
'चौकशी सुरू आहे, तपासाचा अहवाल येऊ द्या'
'पूजाची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हे नोंदवणार'
'खासदाराच्या आत्महत्येवर का बोललं जात नाही?'
त्यावर विरोधक का बोलत नाहीत? -मुख्यमंत्री
सुसाईड नोटमध्ये मोठी नावं -उद्धव ठाकरे
'ज्यांनी गर्दी केली त्यांच्यावर कारवाई झाली'
पुन्हा लॉकडाऊन करायला लावू नका -मुख्यमंत्री
'सर्वांना कोरोना नियमांचं पालन बंधनकारक'
'मराठा आरक्षण सद्यस्थितीचा आढावा घेतला'
केंद्रानं सकारात्मक भूमिका घ्यावी -अशोक चव्हाण

6:43 pm (IST)

'मराठा आरक्षण प्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली'
बैठकीत साधकबाधक चर्चा झाली -उदयनराजे
मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा -उदयनराजे
सर्व पक्षांची ही नैतिक जबाबदारी -उदयनराजे
'मराठा आरक्षणप्रश्नी इच्छाशक्तीचा अभाव'
'राज्यातील 70% मराठा समाज मागास'
'सारथीसारखी संस्था बंद पडण्याच्या मार्गावर'
मराठा समाजाला न्याय मिळावा -उदयनराजे
शासनानं श्वेतपत्रिका काढावी -उदयनराजे

6:31 pm (IST)

पुणे - कोथरुडमध्ये गतिमंद मुलींच्या संस्थेत एका मुलीनं दुसऱ्या मुलीला दुसऱ्या मजल्यावरून ढकलून दिल्यानं गतिमंद मुलीचा मृत्यू, 
कोथरुड पोलिसात गुन्हा दाखल

Load More
कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स