LIVE Updates: किरीट सोमय्यांना कोल्हापूरमध्ये प्रवेशबंदी मागे

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | September 27, 2021, 20:55 IST |
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  21:36 (IST)

  जीएसटी प्रणालीतील त्रुटी दूर करून ती सोपी, दोषविरहित करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली केंद्रस्तरीय मंत्रिगट स्थापन

  20:42 (IST)

  नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वरमध्ये दुहेरी हत्याकांड
  महिलेचा गळा आवळून, मुलीची दगडानं ठेचून हत्या
  कळमेश्वर-झुणकी रोडवरील धक्कादायक प्रकार
  महिलेसह मुलीची ओळख पटवण्याचं काम सुरू
  हत्येचं कारण अस्पष्ट, हत्येनंतर आरोपी फरार

  20:11 (IST)

  गडचिरोली - जंगलात अभियान राबवणाऱ्या C-60 कमांडो जवानांवर माओवाद्यांचा गोळीबार, कोपर्शीच्या जंगलात तीन वेळा पोलीस कमांडो आणि माओवाद्यांमध्ये चकमक, कुठलीही जीवितहानी नाही, कुकरबॉम्बसह इतर माओवादी वापराचं साहित्य जप्त, पोलिसांच्या वाढत्या दबावानंतर जंगलातून माओवाद्यांचं पलायन

  19:46 (IST)

  हायस्पीड रेलमार्गाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

  19:46 (IST)

  हायस्पीड रेलमार्गाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

  19:44 (IST)

  कोल्हापूर - किरीट सोमय्यांवरील जिल्हाबंदी उठवली, जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाबंदीचे दिले होते आदेश, किरीट सोमय्यांना राजकीय विरोध होणार नाही अशी माहिती असल्याचं पत्रात नमूद, किरीट सोमय्या उद्या अंबाबाईचं दर्शन घेऊन कागल पोलिसात तक्रार दाखल करणार

  19:9 (IST)

  नागपूर - खापरखेडा पोलिसांनी बनावट दारू कारखान्यावर छापा टाकून 17 लाखांचा मुद्देमाल केला जप्त

  19:7 (IST)

  सारथी तसेच बार्टीच्या विद्यार्थ्यांचे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील यश कौतुकास्पद, मुख्यमंत्र्यांनी केलं राज्यातील गुणवत्ता यादीतील सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन

  19:6 (IST)

  नाशिक - बाजार समिती सभापती, सर्व संचालकांना दणका
  जिल्हा उपनिबंधकांचा मुदतवाढ प्रस्ताव सीएमनी फेटाळला
  विद्यमान सभापती देविदास पिंगळे हे राष्ट्रवादीचे नेते
  सहकार खात्यात थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा हस्तक्षेप
  नियत मुदतवाढ संपताच संचालक मंडळ बरखास्तीचे आदेश
  बाजार समितीवर पुन्हा प्रशासक नियुक्ती निश्चित, पुन्हा निवडणूक होणार

  18:25 (IST)

  नाशिक जिल्ह्यातील एकूण पात्र (वय 18 वर्षांपेक्षा अधिक वयोगट) लोकसंख्येच्या 50 टक्क्यांहून अधिक लोकांना लसीचा पहिला डोस दिल्याचा टप्पा आज पार पडला, नाशिक जिल्ह्यातील सर्व आरोग्य विभागातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमाला यश

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स