Live Updates: ठाण्याच्या रस्त्यावर 'बर्निंग मिनी बस'चा थरार, सुदैवाने जीवितहानी नाही

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | November 27, 2021, 22:38 IST |
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  21:55 (IST)

  मुंबई - कुर्ल्यातील तरुणीचं हत्या प्रकरण
  पोलिसांनी 2 आरोपींना घेतलं ताब्यात
  प्रेमप्रकरणातून 18 वर्षांच्या मुलीची हत्या
  आरोपीनं मित्राच्या मदतीनं केली हत्या
  दोन्ही आरोपी 18 ते 20 वयोगटातील 

  ब्रेकींग कुर्ला मर्डर केस ही प्रेम प्रकरणातून झाली आहे.मयत मुलगी ही 18 वर्षाची असून गोवंडी विभागातील रहिवासी आहे.तिचे आणि रेहान नामक 18 वर्षाच्या मुलाचे प्रेम संबंध होते.मात्र मयत तरुणी वारंवार रेहान ला लग्नासाठी दबाव टाकत होती.या रागातून रेहान ने त्याचा मित्र फैजल सह तिच्या हत्येचा कट रचला.दि २३ रोजी तिला भेटण्याचा बहाण्याने कुर्ला एचडीआयएल येथे बोलावले आणि तिची हत्या केली.तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे का? याचा अजून पोलीस तपास करीत आहे.ताब्यात घेतलेले दोन्ही आरोपीं हे 18 ते 20 वयोगटातील असल्याचे समोर आले आहे.
   
  21:39 (IST)

  कुर्ल्यातील तरुणीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरण
  विनोबा भावे पोलिसांनी 2 आरोपींना घेतलं ताब्यात 

  20:39 (IST)

  जालन्यात आरोपीसमोर जाळून घेतानाच व्हिडिओ व्हायरल
  जागेच्या वादातून मारहाण केल्यानं तरुणानं घेतलं जाळून
  मुख्य आरोपी चुलता जेरबंद, 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल 
  परतूर तालुक्यातल्या वाई येथील खळबळजनक घटना 

  20:39 (IST)

  नागपूर - सहलीसाठी गेलेले 3 तरुण कन्हान नदीत बुडाले
  मौदा पोलीस ठाणे हद्दीतील वलाना गावाजवळची घटना
  एका तरुणाचा मृतदेह सापडला तर दोघांचा शोध सुरू
  प्रशांत पटेल, अभिषेक चव्हाण, हरेकृष्ण लिंबाचिया
  नागपूरच्या स्वामिनारायण मंदिर गोशाळाचे कर्मचारी
  पोहता येत नसतानाही कन्हान नदीपात्रात उतरले होते  

  19:2 (IST)

  अहमदनगर - जिल्हा रुग्णालयातील जळीतकांड प्रकरण
  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुनील पोखरणांना जामीन
  डॉ.सुनील पोखरण यांना जिल्हा सोडण्यास मात्र बंदी 

  18:3 (IST)

  अहमदनगर - बनावट बायोडिझेल प्रकरण
  शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुतेला दिलासा
  दिलीप सातपुतेला अटकपूर्व जामीन मंजूर
  सातपुतेसह 8 जणांना अटकपूर्व जामीन मंजूर 

  17:30 (IST)

  परमबीर सिंग प्रकरणात मोठा पर्दाफाश
  संजय पुनामियाकडे सापडली गोपनीय फाईल
  संजय पुनामिया परमबीर सिंगांचे निकटवर्तीय
  फोनमध्ये गृहखात्याची 27 पानांची गोपनीय फाईल
  गोपनीय फाईल प्रकरण सायबर पोलिसांकडे वर्ग
  सायबर पोलिसांनी दाखल केला स्वतंत्र गुन्हा

  16:48 (IST)

  'कोरोनाच्या नव्या व्हेरियंटला दूर ठेवण्यासाठी प्रशासन सज्ज'
  नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली तातडीची बैठक
  सर्व जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, न.प. सीईओंची बैठक
  'सर्व रुग्णालयांचं अग्निशमन, विद्युत ऑडिट करून घ्या'
  'आयसीयू, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर उपकरणांची तपासणी करा'
  सर्व सज्ज ठेवण्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश
  'कोविड प्रतिबंधात्मक नियमांच्या पालनासाठी जनजागृती करा' 

  16:21 (IST)

  पुणे - आरोग्य परीक्षा पेपरफुटी प्रकरणी गुन्हा दाखल
  प्राथमिक चौकशीत 100 पैकी 92 प्रश्न एकसारखे
  आरोग्य विभागाकडून सायबर पोलिसात गुन्हा दाखल
  'ड' वर्ग पदासाठीचा लेखी पेपर फुटल्याची होती तक्रार
  गेल्या 31 तारखेला झाली होती लेखी परीक्षा 

  15:13 (IST)

  कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची पंतप्रधानांकडून दखल
  परदेशातून येणाऱ्यांच्या कडक तपासणीचे आदेश
  लसीकरणाकडे अधिक लक्ष देण्याच्या सूचना
  'नागरिकांना अधिक काळजी घेण्याची गरज'
  पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जनतेला आवाहन 

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स