• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Live Updates: अनिल देशमुख यांनी केला पुन्हा जामिनासाठी अर्ज

Live Updates: अनिल देशमुख यांनी केला पुन्हा जामिनासाठी अर्ज

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | January 27, 2022, 22:35 IST
  LAST UPDATED 4 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  22:14 (IST)

  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंगांना समन्स
  'एसीबी कार्यालयात 2 फेब्रुवारीला जबाब नोंदवा'
  राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून समन्स
  अनिल देशमुखांचा जामिनासाठी पुन्हा अर्ज
  अनिल देशमुखांचा नियमित जामिनासाठी अर्ज
  मुंबई सत्र न्यायालयात 3 फेब्रुवारीला सुनावणी

  22:12 (IST)


  बदलापूर - पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली
  पाईपलाईन फुटून हजारो लीटर पाणी वाया
  पाईपलाईन फुटल्यानं कमी दाबानं पाणीपुरवठा होणार

  22:2 (IST)


  केंद्रीय मंत्री नारायण राणे सिंधुदुर्गात दाखल
  उद्या पत्रकार परिषद घेण्याची शक्यता

  21:32 (IST)

  नाशिक - जिल्ह्यात कोरोना रुग्णांत मोठी वाढ
  2 दिवसांमध्ये जिल्ह्यात 4,696 नवे रुग्ण
  2 दिवसांमध्ये 5,385 रुग्ण कोरोनामुक्त
  नाशिक शहर कोरोनाचा हॉटस्पॉट

  21:22 (IST)

  ठाणे - कालीचरण महाराजला जामीन 
  ठाणे न्यायालयानं केला जामीन अर्ज मंजूर
  15 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
  जितेंद्र आव्हाडांनी दाखल केली होती तक्रार
  महात्मा गांधींविरोधात केलं होतं आक्षेपार्ह विधान 

  20:50 (IST)

  विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी दिल्लीत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांची सदिच्छा भेट घेतली, लोकलेखा समितीच्या रिफॉर्म कमिटीसंदर्भात या भेटीदरम्यान झाली विस्तृत चर्चा

  20:43 (IST)

  पीएसआय 2020 ची मुख्य परीक्षा पुढे ढकलली, हायकोर्टाच्या आदेशानं 86 मुलांना मुख्य परीक्षेस द्यावा लागतोय प्रवेश, फेरनियोजन करावं लागत असल्याचं MPSC आयोगाकडून स्पष्टीकरण

  20:36 (IST)

  पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंचा औरंगाबाद दौरा
  वेरूळ लेणी आणि अजिंठा लेणीची पाहणी
  अजिंठा लेणीच्या प्रतिकृतीलाही दिली भेट
  'अजिंठा, वेरूळ लेणीवर विकासाची गरज'
  पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

  20:29 (IST)

  पुण्यात पीएमपीएल आता कॅब सेवा देणार
  बससोबतच कॅब सेवेलाही होणार सुरुवात
  पर्यावरणपूरक ई-बसेसची संख्या वाढवणार
  तिकीट बुकिंगसाठी 'अॅप' तयार करणार

  20:28 (IST)

  नागपूरच्या कृणाल रुग्णालयात राडा
  संतप्त नातेवाईकांची डॉक्टरांना मारहाण
  रुग्णाला मृत घोषित केल्यावर संताप
  वेळेवर उपचार न मिळाल्याचा आरोप

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स