महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक संपली
विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीबाबत चर्चा
आघाडीच्या नेत्यांमध्ये अडीच तास खलबतं
उद्या पुन्हा सकाळी बैठकीचं सत्र सुरू राहील
20:31 (IST)
राज्यपाल वि. आघाडी सरकार संघर्ष शिगेला
मुख्यमंत्र्यांचं राज्यपालांना खरमरीत पत्र - सूत्र
'विधिमंडळ कायदे आपल्या अधिकार कक्षेत नाही'
सरकारच्या कायद्यांवर अविश्वास दाखवला - सूत्र
मुख्यमंत्र्यांकडून राज्यपालांवर नाराजी व्यक्त - सूत्र
अध्यक्षपद निवडणूक घेण्याबाबत सरकार ठाम
कायदे तपासण्याचा अधिकार तुम्हाला नाही - सूत्र
अभ्यासात अनावश्यक वेळ घालवू नये - सूत्र
आपला हस्तक्षेप करण्याचा संबंधच नाही - सूत्र
उद्धव ठाकरेंनी राज्यपालांना ठणकावलं - सूत्र
निवडणूक घेण्याबाबत आग्रही भूमिका मांडली
20:13 (IST)
एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंशी फोनवरून चर्चा
विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबाबत केली चर्चा
19:49 (IST)
भाजपच्या 12 निलंबित आमदारांचं राज्यपालांना पत्र
'निलंबित असताना मतदानाचा हक्क हिरावला जातोय'
'मतदान करणं हा आमचा संवैधानिक अधिकार'
राज्यपालांनी परवानगी दिली नसल्याची माहिती
यापूर्वी अध्यक्षांकडेही दिलगिरी व्यक्त केली होती
'विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाली तर...'
'आमचा मतदानाचा अधिकार अबाधित ठेवावा'
12 निलंबित आमदारांनी अशीही केली होती विनंती
18:54 (IST)
विधानसभा अध्यक्षपद निवडणूक
राज्य सरकारनं राज्यपालांना 3 पत्रं लिहिली
अद्यापही अध्यक्ष निवडणुकीबाबत उत्तर नाही
निवडणूक कार्यक्रमावर अजूनही प्रश्नचिन्ह
18:22 (IST)
31 डिसेंबरला रात्री साईमंदिर राहणार बंद; जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर साई संस्थानचा निर्णय, नववर्षाच्या स्वागताला भक्त साईदर्शनाला मुकणार, या वर्षी निर्बंधांमुळे साईमंदिर राहणार बंद, 1 जानेवारीला सकाळी 6 वाजता उघडणार मंदिराची कवाडं
18:8 (IST)
वयोमर्यादा ओलांडलेल्या परीक्षार्थींना अखेर MPSC कडून दिलासा, MPSC पूर्व परीक्षा 2021 साठी 1 वर्ष वयोमर्यादा विशेष सवलतीचा लाभ मिळणार, शासनानं वयोमर्यादा सवलतीचं परिपत्रक काढलं पण अर्ज करण्यासाठी मुदतवाढच मिळत नव्हती, आता मुलांना 31 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार, 'न्यूज18 लोकमत'च्या पाठपुराव्याला अखेर यश
18:5 (IST)
वयोमर्यादा ओलांडलेल्या परीक्षार्थींना अखेर mpsc कडून दिलासा
mpsc पूर्व परीक्षा 2021 साठी 1 वर्ष वयोमर्यादा विशेष सवलतीचा लाभ मिळणार
शासनाने वयोमर्यादा सवलतीचं परीपत्रक काढलं पण अर्ज करण्यासाठी मुदतवाढच मिळत नव्हती
आता मुलांना 31 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार
17:58 (IST)
छत्रपती संभाजी महाराजांचं तुळापूर येथील स्मृतिस्थळ; वढू बुद्रुकच्या समाधीस्थळ परिसराचा विकास करणार, मातोश्री महाराणी छत्रपती सईबाई महाराजांच्या राजगड पायथ्याच्या समाधीस्थळाचाही विकास; तुळापूर, वढू बुद्रुक विकासासाठी दीडशे कोटींचा आराखडा; स्मारक परिसर विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; उपमुख्यमंत्री अजित पवारांची विधानसभेत घोषणा
17:56 (IST)
मालेगाव, अमरावतीत मोर्चे निघाले - फडणवीस
'अमरावतीला हजारो लोक रस्त्यावर आले'
'सोशल मीडियातून खोट्या बातम्या पसरवल्या'
मोर्चे संपवून परतताना तोडफोड - फडणवीस
'जाणीवपूर्वक हिंदूंच्या दुकानांची तोडफोड'
रझा अकादमीवर कारवाई का नाही? - फडणवीस
'पोलीस दलाची अवस्था सुधारण्याची आवश्यकता'
'देशातील सर्वोत्तम पोलीस दल राहणार नाही'
'घोटाळेबाजांचं रॅकेट उघड करण्याची गरज'
'भ्रष्टाचाराचे पुरावे दिले, कारवाई काहीच नाही'
'पैसे देऊन आलेले पोलीस वसुलीच करणार'
राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे - फडणवीस
महिला अत्याचाराच्या घटनांचा वाचला पाढा
राज्यात महिलांना सुरक्षित वाटतंय का? - फडणवीस
फडणवीसांचा आघाडी सरकारवर हल्लाबोल
परीक्षा घोटाळ्यांवरूनही सरकारवर घणाघात
कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स