LIVE Updates: राज्यात गेल्या 4 दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ; आज 4 हजार 654 नवे रुग्ण

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | August 27, 2021, 20:36 IST
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  20:58 (IST)

  टोमॅटोबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय
  'M.I.S स्कीमअंतर्गत राज्यानं टोमॅटो खरेदी करावेत'
  'सरकारनं टोमॅटो खरेदी करून त्याची विक्री करावी'
  'खरेदी-विक्री व्यवहारात राज्याला जो तोटा येईल...'
  '...त्याचा 50 टक्के भार केंद्र सरकार उचलणार'
  'राज्य सरकारनं केंद्राला याबाबत प्रस्ताव पाठवावा'
  केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांची चर्चा
  पियूष गोयल, केंद्रीय कृषिमंत्री तोमर यांच्याशी चर्चा
  'टोमॅटो निर्यात खुलीच आहे, बंद केलेली नाही'

  20:29 (IST)

  मुंबईत दिवसभरात 364 नवीन रुग्ण
  मुंबईत दिवसभरात 214 कोरोनामुक्त, 5 मृत्यू

  20:20 (IST)

  राज्यात दिवसभरात 4,654 नवीन रुग्ण
  राज्यात दिवसभरात 3,301 कोरोनामुक्त
  राज्यात दिवसभरात 170 रुग्णांचा मृत्यू

  19:16 (IST)

  'एसटी कर्मचाऱ्यांनी टोकाची भूमिका घेऊ नये'
  उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं आवाहन
  'कसा मार्ग काढायचा यासंदर्भात आढावा घेतोय'
  इथून पुढं इलेक्ट्रिक बसेस घेणार - अजित पवार
  'पहिल्या टप्प्यात 500 कोटी पगारासाठी द्यायचा निर्णय झालाय'
  उपमुख्यमंत्री अजित पवारांची पत्रकार परिषदेत माहिती

  19:12 (IST)

  उपमुख्यमंत्री अजित पवारांची पत्रकार परिषद
  पुणे जिल्ह्यात कोरोना संसर्ग दर 3.1% - अजित पवार
  'पुण्यात 2.8 टक्के, पिंपरी-चिंचवडमध्ये 2.9 टक्के'
  पुणे जिल्ह्यात टेस्टिंग कमी झाली नाही - अजित पवार
  'मात्र येणारे सण बघता लोकांनी खबरदारी घ्यावी'
  'ऑक्सिजनची मागणी वाढली तर चिंतेची बाब'
  'कठोर निर्णय घ्यावे लागतील असं सीएम म्हणाले'
  'शिक्षक, शिक्षकेतर घटकांना लसीकरणास प्राधान्य'
  'गणेशोत्सवाबाबतही लवकरच निर्णय घेणार'
  त्याआधी सर्वांशी चर्चा करू - अजित पवार
  'नियमावली आलीय, सरकारी पातळीवर निर्णय घेऊ'

  19:1 (IST)

  नाणार रिफायनरी 100 टक्के होणार - राणे
  राजापूरच्या सभेत नारायण राणेंची घोषणा
  काहींचा नाणार होऊ नये म्हणून खोडा - राणे

  18:56 (IST)

  नाशिक - भाजप कार्यालयावर हल्ला प्रकरण
  सेना नगरसेवक दीपक दातीर यांना दिलासा
  बाळा दराडे यांनाही कोर्टाचा दिलासा
  30 ऑगस्टपर्यंत अटकेला केली मनाई
  सेशन्स कोर्टानं दिला अटकपूर्व जामीन

  18:39 (IST)

  राज्यातील अतिवृष्टीबाधितांना दिलासा मिळणार
  'अतिवृष्टीबाधितांना 2019 दराप्रमाणे वाढीव मदत'
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला निर्णय

  18:19 (IST)

  मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसनातील रखडलेले प्रकल्प
  'प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आराखडा तयार करा'
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे बैठकीत निर्देश
  झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांचा बैठकीत आढावा

  17:49 (IST)

  'विरोधकांनी राडा केल्यास जशास तसं उत्तर'
  युवासेना नेते वरुण सरदेसाईंचा विरोधकांना इशारा
  रागाच्या भरात अपशब्द वापरल्याची सारवासारव

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स