LIVE : पुण्यासाठी दिलासादायक बातमी, कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट!

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | April 27, 2021, 18:12 IST |
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  22:7 (IST)

  वर्धा - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्या वर्ध्यात, जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड वॉर्डला देणार भेट, महिलेचा आयसोलेशन रूमच्या दारातच झाला होता मृत्यू, 'न्यूज18 लोकमत'नं दाखवली होती बातमी, फडणवीस जिल्हाधिकाऱ्यांशी परिस्थितीवर करणार चर्चा

  21:59 (IST)

  नितीन गडकरींनी घेतली सर्वपक्षीय बैठक
  'दुसऱ्या लाटेचा गंभीरतेनं सामना करा'
  केंद्रीय मंत्री गडकरींचं नेत्यांना आवाहन
  'पीएसए प्लांटची मागणी तात्काळ नोंदवा'

  21:44 (IST)

  केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या पुढाकारानं विदर्भातील पालकमंत्र्यांची बैठक; अमरावती, नागपूर विभागांचे आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी होते उपस्थित; ऑक्सिजन, रेमडेसिवीर, कोविड सेंटर आदी विषयांवर बैठकीत चर्चा

  21:19 (IST)

  राज्यात दिवसभरात 66,358 नवीन रुग्ण
  राज्यात दिवसभरात 67,752 कोरोनामुक्त
  राज्यात दिवसभरात 895 रुग्णांचा मृत्यू
  रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 83.21, मृत्युदर 1.5%
  राज्यात सध्या 6 लाख 72,434 ॲक्टिव्ह रुग्ण

  20:39 (IST)

  सीए फायनलच्या परीक्षा पुढे ढकलल्या
  कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
  सीए फायनलची परीक्षा 21 मे रोजी होती
  सीए इंटरमीडिएट 22 मे रोजी होणार होती

  20:13 (IST)

  राज्य टास्क फोर्ससाठी महसूल विभागातून 5 विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक, एक अप्पर जिल्हाधिकारी आणि 4 उपजिल्हाधिकाऱ्यांचा समावेश, कोरोना व्यवस्थापनात राज्यातील रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा, रेमडेसिवीर आणि इतर औषधांचा पुरवठा सुरळीत आणि गतीनं करण्यासाठी नेमणूक

  20:8 (IST)

  मुंबईसाठी दिलासादायक, सकारात्मक बातमी
  मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट
  मुंबईत दिवसभरात 4014 नवीन रुग्ण
  मुंबईत दिवसभरात 8240 कोरोनामुक्त
  मुंबईत दिवसभरात 59 रुग्णांचा मृत्यू

  20:0 (IST)

  लसीच्या तुटवड्यावरून आरोप-प्रत्यारोप
  लसीच्या कमी पुरवठ्याचा राज्याचा आरोप
  केंद्र सरकारनं दिली आकडेवारी
  आकडेवारीत लसीचे डोस शिल्लक असल्याचा दावा
  9 लाख 23 हजार डोस शिल्लक असल्याचा दावा
  केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार पुन्हा आमनेसामने

  19:47 (IST)
  कोरोना संकटात प्रशासनाला आघाडीवर राहून सहकार्य करण्याची राज्यपालांची सर्व विद्यापीठांना सूचना, विद्यापीठांनी जनजागृती कार्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावं; राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, एनसीसीसह विद्यार्थी संघटनांना सहभागी करून घेण्याची सूचना
  19:36 (IST)

  खासगी रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठ्यावर लक्ष ठेवण्यासाठी सहाय्यक आयुक्त आणि वॉर्ड ऑफिसर्सना जबाबदारी देण्याची सूचना, आगीमुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी प्रत्येक कोविड केंद्राच्या आवारात फायर ब्रिगेडची गाडी तैनात ठेवण्याची सूचना - एकनाथ शिंदे

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स