liveLIVE NOW

Live Updates: समीर वानखेडे दिल्लीहून मुंबईत परतले

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | October 26, 2021, 22:47 IST
  facebookTwitterLinkedin
  LAST UPDATED A MONTH AGO

  AUTO-REFRESH

  HIGHLIGHTS

  22:19 (IST)

  समीर वानखेडे दिल्लीहून मुंबईत दाखल
  दिल्लीतल्या चौकशीनंतर वानखेडे मुंबईत

  22:14 (IST)

  ड्रग्ज पार्टी प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईल
  प्रभाकर साईलला उद्या चौकशीसाठी बोलावलं
  भ्रष्टाचाराच्या आरोपांसंदर्भात चौकशी करणार
  एनसीबीचं दक्षता पथक उद्या दुपारपर्यंत मुंबईत
  एनसीबीचं पथक प्रभाकर साईलची चौकशी करणार

  21:23 (IST)

  राज्य मंत्रिमंडळाची उद्या दुपारी 3.30 वाजता सह्याद्री अतिथीगृहात बैठक

  20:33 (IST)

  पंढरपूर - अल्पवयीन मुलीवर सलग 7 दिवस अत्याचार झाल्याचा आरोप, तक्रारीनंतर पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, आरोपींवर कारवाई होत नसल्याचा नातेवाईकांचा आरोप, आरोपींवर तात्काळ कारवाईची गोपीचंद पडळकरांची मागणी

  20:21 (IST)

  नवाब मलिकांनी घेतली होती मुख्यमंत्र्यांची भेट
  या भेटीनंतर मुंबई पोलीस दलात वाढल्या हालचाली
  SIT स्थापन करण्याच्या हालचालींना आला वेग
  24 तासांमध्ये होऊ शकते एसआयटीची स्थापना
  वरिष्ठ IPS अधिकाऱ्याच्या नेतृत्वात SIT स्थापन होणार
  एनसीबी अधिकाऱ्यांविरोधात दाखल झाल्यात तक्रारी
  सर्व तक्रारी SIT कक्षेत घेतल्या जाण्याची शक्यता
  SIT मार्फत चौकशीसाठी जारी करणार समन्स - सूत्र

  20:0 (IST)

  एनसीबीचं दक्षता पथक उद्या दुपारपर्यंत मुंबईत
  मुख्य दक्षता अधिकारी ज्ञानेश्वर सिंह उद्या मुंबईत
  सोशल मीडियावरील प्रतिज्ञापत्राबाबत तपास
  समीर वानखेडे यांची तपासणी केली जाणार
  साक्षीदार साईल प्रभाकर यांचीही चौकशी होणार

  19:58 (IST)

  बीडीडी चाळीच्या पुनर्विकास कामाचा आढावा
  , गतीनं कामं पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

  19:35 (IST)

  संत पालखी मार्ग भूमिपूजन कार्यक्रमाला मोदी येणार
  'कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी पंढरपुरात येणार'
  खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांची माहिती
  विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी नरेंद्र मोदी इच्छुक

  18:56 (IST)

  मलिकांनी घेतली गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांची भेट
  वानखेडेंवरील आरोपांबाबत चौकशीची मागणी
  एसआयटीमार्फत चौकशी करा - नवाब मलिक
  'पंचांचे वानखेडेंवरील आरोप धक्कादायक'
  'पंचांच्या प्रतिज्ञापत्रातून अनेक गोष्टी बाहेर'
  तक्रारींवर गृहखातं निर्णय घेणार - नवाब मलिक
  पंच प्रभाकर साईल यांचे आरोप गंभीर - मलिक
  मुंबई बदनाम झाली तर हे देशाचं नुकसान - मलिक
  मुख्यमंत्री, पंतप्रधानांना पत्र लिहिणार - मलिक
  एनसीबीच्या कारवायांसंदर्भात पत्र लिहिणार - मलिक
  बॉलिवूड बदनाम झालं तर देश बदनाम - मलिक
  आम्ही कुणाचा धर्म किंवा जात काढत नाही - मलिक

  18:55 (IST)

  महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार
  'एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 112 कोटींचा निधी'
  निधी तातडीनं वितरित करा, अजित पवारांचे निर्देश

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स