• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Live Updates:टिपू सुलतान हे अधिकृतरित्या या मैदानाचं नामकरण झालेलं नाही, आदित्य ठाकरेंची माहिती

Live Updates:टिपू सुलतान हे अधिकृतरित्या या मैदानाचं नामकरण झालेलं नाही, आदित्य ठाकरेंची माहिती

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | January 26, 2022, 15:48 IST
  LAST UPDATED 4 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  21:54 (IST)

  पालघर - अपघातात एकाचा मृत्यू, 5 जण जखमी
  चिंचणी बीचवर कारचालकाची अनेकांना धडक

  21:42 (IST)

  भिवंडी - टेंभिवली गावच्या हद्दीतील हृदयद्रावक घटना, वीटभट्टीवर कोळसा भरलेल्या ट्रॉलीचा अपघात, कोळसा भरलेली ट्रॉली झोपड्यावर कोसळली, दुर्घटनेत 3 चिमुकल्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू, ट्रकचालकासह 4 जण पोलिसांच्या ताब्यात

  21:1 (IST)

  '5 ते 6 दिवसांत पर्यटनस्थळं सुरू होण्याची शक्यता'
  पर्यटनस्थळांबाबत निर्णय होऊ शकतो - आदित्य ठाकरे
  'औरंगाबादेत जास्त रुग्ण असल्यानं थोडी काळजी'
  'पालिकांचा कारभार व्हॉट‌‌्सअॅपवर आणण्याचा विचार'
  'औरंगाबादेत पर्यटनासाठी स्वतंत्र कार्यालयाचा विचार'
  'डेक्कन ओडिसीसाठी टेंडर मागवण्याचा प्रयत्न सुरू'
  राज्याचा महसूल हळूहळू वाढतोय - आदित्य ठाकरे
  'वातावरण बदलाच्या जिल्हावार परिणामावर विशेष अभ्यास'

  20:54 (IST)

  मुंबईच्या वांद्रे परिसरातील इमारत दुर्घटना
  अडकलेल्या व्यक्तीला 4 तासांनंतर बाहेर काढलं
  आलम शाहला भाभा रुग्णालयात केलं दाखल
  ढिगाऱ्याखाली कुणी अडकलं आहे का, शोध सुरूच

  20:27 (IST)

  उद्या दुपारी 3.30 वा. राज्य मंत्रिमंडळाची बैठक
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हीसीद्वारे राहणार उपस्थित

  20:11 (IST)

  मुंबईच्या वांद्रे परिसरातील इमारत दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 4 भावंडं जखमी, नशीब बलवत्तर असल्यानं चौघांचीही प्रकृती स्थिर, कुणाच्याही जीवाला धोका नाही, इमारत दुर्घटनेतील 3 जखमींवर भाभा रुग्णालयात उपचार

  19:31 (IST)

  दहिसर परिसरातून 7 कोटींच्या बनावट नोटा जप्त
  गुन्हे शाखेच्या पथकाकडून 7 आरोपींना अटक
  आरोपींकडून 7 मोबाईल, एक लॅपटॉपही हस्तगत

  18:58 (IST)

  टिपू सुलतान नामकरण खरं की खोटं? - भातखळकर
  'पोलीस मागवणार अहवाल, उद्या करणार खुलासा'
  डीसीपींनी आम्हाला लेखी दिलंय - अतुल भातखळकर
  उद्या सायंकाळपर्यंत आंदोलन स्थगित - भातखळकर
  जनतेला आंदोलनाचा अधिकार - प्रवीण दरेकर
  'कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज, अनेक कार्यकर्ते जखमी'
  अधिकृत कागदपत्रं नसताना नामकरण कसं? - दरेकर
  युगपुरुषांची नावं द्या, हा आमचा आग्रह - प्रवीण दरेकर
  'डीसीपी पालिकेकडून लेखी माहिती मागवतायत'
  'आजच्या आंदोलनात शिवसैनिकही, नवहिंदुत्व दिसलं'

  18:33 (IST)

  सत्तेसाठी निर्लज्जतेचा कळस - देवेंद्र फडणवीस
  'टिपूचं नाव देण्याचा कार्यक्रम पोलीस संरक्षणात'
  नाव न देण्याच्या मागणीसाठी केलं होतं आंदोलन
  भाजप,विहिंप,बजरंग दल कार्यकर्त्यांवर लाठीमार-अटक
  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांकडून तीव्र निषेध
  'क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचं नाव देण्याचा घाट'
  राज्य सरकार दडपशाही करतंय - चंद्रकांत पाटील
  हे थांबवा, अन्यथा राज्यभर आंदोलन करू - भाजप
  'मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीवर कधीही वाईट भाष्य नाही'
  मी फक्त कारभारावर बोललो होतो - चंद्रकांत पाटील
  बाळासाहेबांचं स्मारक शिवसेनेला जमलं नाही - पाटील
  ते आम्ही केलं, काहीही बोलू नका - चंद्रकांत पाटील
  तुमचं हिंदुत्व काँग्रेसलादेखील सांगा - चंद्रकांत पाटील
  उगाच हिंदुत्वाचा आव आणू नका - चंद्रकांत पाटील

  17:55 (IST)

  मुंबई - वांद्रे भागात 4 मजली इमारत कोसळली
  दुर्घटनेत 15 जण जखमी, रुग्णालयात उपचार
  ढिगाऱ्याखालून 6 लोकांना बाहेर काढलं
  अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी
  अद्यापही काहीजण अडकल्याची शक्यता

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स