• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • LIVE: मुंबईत 1919 रुग्णांची कोरोनावर मात, रिकव्हरी रेट 96 टक्क्यांवर

LIVE: मुंबईत 1919 रुग्णांची कोरोनावर मात, रिकव्हरी रेट 96 टक्क्यांवर

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | June 26, 2021, 19:45 IST
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  21:42 (IST)

  'विंडी'नुसार पुढच्या 5 दिवसांत मान्सून पुन्हा सक्रिय
  राज्यात सर्वत्र विजेच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज
  5 जुलैपर्यंत कोकण आणि विदर्भात मुसळधार पाऊस
  उर्वरित महाराष्ट्रात समाधानकारक पावसाचा अंदाज

  20:35 (IST)

  अनिल देशमुखांना ईडीकडून पुन्हा समन्स
  मंगळवारी चौकशीला हजर राहण्याचे आदेश 

  19:42 (IST)

  मी देखील रस्त्यावर उतरलो असतो - मुख्यमंत्री
  पण सरकार मागण्या मान्य करतंय - मुख्यमंत्री
  'संघर्ष कधी अन् संवाद कधी, हे कळायला हवं'
  खरा नेता तोच जो लोकांसोबत आहे - मुख्यमंत्री
  'संवादाऐवजी अनेकांची आदळआपट सुरू आहे'
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विरोधकांना टोला 

  17:11 (IST)

  ताज हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा फोन
  बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा निनावी फोन
  मुंबई पोलीस, बॉम्बशोधक पथक घटनास्थळी 

  17:11 (IST)

  अनिल देशमुखांच्या 2 खासगी सचिवांना अटक
  कुंदन शिंदे, संजीव पालांडेला 1 जुलैपर्यंत कोठडी
  आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात दोघांना ईडी कोठडी
  बार मालकांच्या जबाबानंतर दोघांवर कारवाई 

  15:30 (IST)

  संजय राऊतांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट 
  मुख्यमंत्र्यांसोबत संघटनात्मक चर्चा - संजय राऊत
  'पक्ष मजबूत असेल तर सरकार अधिक काळ टिकेल'
  मुख्यमंत्री आमचाच राहील - संजय राऊत
  'उद्धवजींच्या नेतृत्वात सरकार कार्यकाळ पूर्ण करेल'
  'मुख्यमंत्र्यांकडून विधानसभा अधिवेशनाची तयारी'
  पवारांचा राजकीय मेसेज सीएमना दिला - राऊत
  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उत्तम काम करतायत - राऊत
  लोकांमध्ये मुख्यमंत्र्यांची लोकप्रियता वाढतेय - राऊत
  भविष्यात मविआला फायदा होईल - संजय राऊत
  'पवार साहेबांनी कोणाला भेटावं हा त्यांचा प्रश्न'
  राष्ट्रीय स्तरावर आघाडी स्थापन होतेय - संजय राऊत
  'राहुल गांधी - शरद पवार एकत्र आल्यास फायदा होईल'
  'प्रताप सरनाईकांनी त्यांची भावना पत्रात व्यक्त केली'
  सरनाईकांसंदर्भात लवकरच एक बातमी मिळेल - राऊत

  13:32 (IST)

  ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा
  लोणावळ्यात 2 दिवसांची ओबीसी परिषद
  'सर्वजण एकत्र आल्यास समाजाचे प्रश्न सुटतील'
  'आपापसात लढत राहिल्यास प्रश्न सुटणार नाहीत'
  समाजासाठी पक्षाची झूल बाजूला ठेवू - वडेट्टीवार

  12:46 (IST)

  OBC राजकीय आरक्षणासाठी रस्त्यावर - फडणवीस
  'मविआ'नं मराठा, ओबीसी आरक्षण घालवलं - फडणवीस
  ओबीसींसाठी भाजपनं योजना राबवल्या - फडणवीस
  भाजपच्या काळात ओबीसी खातं तयार - फडणवीस
  'अपयशाचं खापर मविआ सरकार मोदींवर फोडते'
  ओबीसींचं आरक्षण भाजपनं वाचवलं - फडणवीस
  '50 टक्क्यांवर गेलेलं आरक्षण आम्ही वाचवलं'
  OBC आरक्षणाचे खरे मारेकरी कॉंग्रेस - फडणवीस
  'आमच्या हाती सूत्र द्या, आरक्षण परत आणू'
  ...अन्यथा राजकीय सन्यास घेऊ - देवेंद्र फडणवीस

  9:33 (IST)

  मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी
  वशिष्ठी नदीवरील जुना पूल वाहतुकीसाठी बंद
  चिपळूणमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा
  वीकेंडला कोकणात आलेल्या प्रवाशांचे हाल

  9:12 (IST)

  लोणावळ्यात 2 दिवसांची ओबीसी परिषद
  सकाळी 11 वाजता परिषदेचं होणार उद‌्घाटन
  ओबीसी संघटना, राजकीय नेते येणार एकत्र
  छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार राहणार उपस्थित
  माणिकराव ठाकरे, परिणय फुकेही राहणार हजर
  दिवसभर विविध मुद्द्यांवर विचारमंथन

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स