- २ जून- अधिसूचना जारी
- ९ जून- अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत
- १० जून- अर्ज छाननी
- १३ जून- अर्ज माघारी घेता येईल
- २० जून- सकाळी ९ ते ४ या वेळेत मतदान व त्यानंतर मतमोजणी
22:37 (IST)
किडनी रॅकेटमध्ये आणखी 3 रुग्णालयांची नावं समोर
पुणे, ठाणे, कोईम्बतूर येथील रुग्णालयांचा समावेश
एजंटमार्फत बनावट कागदपत्रांद्वारे झालं प्रत्यारोपण
21:57 (IST)
मानवतेला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार
अर्भकाला शौचालयाच्या भांड्यात ठेवलं कोंबून
सिंहगड रोड पोलिसांमुळे वाचले चिमुकल्याचे प्राण
प्रियकराच्या मदतीनं जन्म देणाऱ्या महिलेचं कृत्य
वडगाव बुद्रुकच्या तुकाईनगर भागातील घटना
21:25 (IST)
विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक जाहीर
20 जून रोजी होणार विधान परिषद निवडणूक
राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेच्याही निवडणुका
20:28 (IST)
सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील पर्यटनाला 'ब्रेक'
प्रवासी होडी वाहतूक सेवा काही काळ बंद
तारकर्ली बोट दुर्घटनेनंतर प्रशासनाचा निर्णय
'न्यूज18 लोकमत'च्या बातमीचा दणका
औरंगाबाद-जालना मार्गावर भीषण अपघात
7 जण जागीच ठार झाल्याची माहिती
करमाड पोलीस घटनास्थळी, मदतकार्य सुरू
जखमींना औरंगाबादच्या रुग्णालयात हलवलं
19:3 (IST)
डावोस, स्वित्झर्लंड इथं सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेतही पर्यावरण संवर्धनाची सर्वाधिक चर्चा, या पार्श्वभूमीवर कोविडच्या प्रादुर्भावानंतर भारत देश प्रगती करतोय हे दाखवण्यासाठी विविध राज्यांनी एकत्र येऊन गुंतवणूक आणण्यावर भर - आदित्य ठाकरे
18:42 (IST)
"आरक्षण सोडत 31 मे रोजी होते, याचा अर्थ काय? राज्य सरकारने याचे उत्तर द्यावं. निवडणूक आयोग जर आपला कार्यक्रम पुढे घेऊन जात असेल आणि ओबीसींच्या आरक्षणाला त्याठिकाणी तिलांजली देत असेल तर राज्य सरकार गप्प का?", असा सवाल भाजपच्या आशिष शेलार यांनी विचारला.
18:32 (IST)
खासदार नवनीत राणांना धमकीचा फोन
नवनीत राणांना 11 वेळा धमकीचे फोन
'पुन्हा चालिसा वाचली तर जीवानिशी संपवू'
अर्वाच्च भाषा वापरून नवनीत राणांना धमकी
नवनीत राणांकडून दिल्ली पोलिसात तक्रार
कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स