LIVE: मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेची वाहतूक पूर्णपणे सुरळीत सुरू

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | July 25, 2021, 18:40 IST |
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  21:34 (IST)

  पूरग्रस्त भागातील बचाव कार्याचा अहवाल
  मदत आणि पुनर्वसन विभागानं दिली माहिती
  2 लाख 30 हजार लोकांना सुखरूप बाहेर काढलं
  एकूण 149 मृत्यू, 50 लोक जखमी, 100 लोक बेपत्ता
  875 गावं बाधित, 3248 जनावरांचा मृत्यू

  21:17 (IST)

  पूरग्रस्त भागातील आरोग्य यंत्रणेशी आरोग्यमंत्र्यांचा संवाद, साथरोगाचा फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपचारासह लोकांना मानसिकदृष्ट्या सावरा, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं आवाहन

  20:45 (IST)

  औरंगाबाद - बिअर वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात
  अपघातग्रस्त ट्रकमधून बिअरच्या बॉक्सची लूट
  शेकडो नागरिकांची बिअर घेण्यासाठी चढाओढ
  वैजापूरजवळील करंजगाव परिसरातील घटना
  रात्रीच्या अंधारात बाटल्या फुटून अनेक जण जखमी
  आसपासच्या अनेक गावातून नागरिकांचा सपाटा सुरू

  20:19 (IST)

  कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग बंदच राहणार
  कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं केलं स्पष्ट
  राष्ट्रीय महामार्गावर साडेतीन फूट पाणी
  सांगली फाटा परिसरात अजूनही महापुराचं पाणी
  जड वाहतुकीलाही रस्ता खुला करणं अशक्य

  20:18 (IST)

  राज्यात दिवसभरात 6,843 रुग्णांची नोंद
  राज्यात दिवसभरात 5,212 कोरोनामुक्त
  राज्यात दिवसभरात 123 रुग्णांचा मृत्यू
  रिकव्हरी रेट 96.33 तर मृत्युदर 2.09 टक्के
  राज्यात सध्या 94 हजार 985 अॅक्टिव्ह रुग्ण

  19:14 (IST)

  कोल्हापूर - राधानगरी धरणाचे 4 दरवाजे उघडले
  राधानगरीतून 7 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग
  राधानगरी धरण परिसरात मुसळधार पाऊस
  पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता
  राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 पुणे-बंगळुरू हायवे पूर्णपणे बंद
  कोल्हापूरमधून रत्नागिरी, वैभववाडीला जाणारे रस्ते बंद
  गडहिंग्लज, चंदगड, कोल्हापूर, सांगली हे मार्गही बंद
  उद्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पाहणी करण्याची शक्यता
  कोल्हापूर शहरात येणारे सगळे रस्ते पूर्णपणे बंद
  कोल्हापुरात पेट्रोल आणि डिझेलची मोठी टंचाई

  18:51 (IST)

  'पॉर्न अॅप्स, वेबसाईट, ओटीटीची झाडाझडती करा'
  टास्क फोर्स नियुक्त करून झाडाझडती करा - शेलार
  आशिष शेलारांची गृहमंत्री अमित शाहांकडे मागणी

  18:39 (IST)

  सातारा - मृत्यू झालेल्यांची यादी प्रशासनाकडून जाहीर
  भूस्खलन, पूर, दरड कोसळल्यानं एकूण 40 जणांचा मृत्यू
  सर्वाधिक मृत्यू आंबेघर, मिरगाव, ढोकावळे या गावातील
  सातारा जिल्ह्यातील 7 जण अजूनही बेपत्ता

  18:0 (IST)

  सातारा - आंबेघर दुर्घटनेतील मृतांची संख्या 14
  आंबेघर दुर्घटनेतील अजून 3 मृतदेह सापडले
  8 महिन्यांचं बाळ अजून ढिगाऱ्याखाली

  17:30 (IST)

  कराडसह परिसरात पाणी ओसरतंय - जयंत पाटील
  'सांगलीत पाणी पुढील काही तासात कमी होईल'
  'म्हैसाळ इथं मात्र सध्या पाणी पातळी थोडी जास्त'
  सोडलेलं पाणी कालांतरानं ओसरेल - जयंत पाटील
  स्थानिकांनी घाबरून जाऊ नये - जयंत पाटील

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स