राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
मुंबईत तब्बल 1 कोटी रुपयांचं मद्य केलं जप्त
गोव्यातून आणलं होतं मद्य, 750 बॉक्स मद्य जप्त
आरोपींना केली अटक, या वर्षातील मोठी कारवाई
21:28 (IST)
कोरोना प्रोटोकॉल न पाळता कोविड सेंटरमध्ये डान्स करणं ही रोहित पवारांची कृती निषेधार्ह, पवारांचा नातू म्हणून वेगळा न्याय का? विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचा सवाल
21:28 (IST)
कोरोना प्रोटोकॉल न पाळता कोविड सेंटरमध्ये डान्स करणं ही रोहित पवारांची कृती निषेधार्ह, पवारांचा नातू म्हणून वेगळा न्याय का? विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचा सवाल
20:10 (IST)
राज्यात दिवसभरात 36,176 कोरोनामुक्त
राज्यात दिवसभरात 24,136 नवीन रुग्ण
राज्यात दिवसभरात 601 रुग्णांचा मृत्यू
रिकव्हरी रेट 92.76 तर मृत्युदर 1.61 टक्के
राज्यात सध्या 3 लाख 14,368 अॅक्टिव्ह रुग्ण
19:20 (IST)
कोरोनाच्या तिसर्या लाटेची शक्यता विचारात घेता नागपुरात लहान बालकांसाठी 200 खाटांचं रुग्णालय सुसज्ज ठेवावं, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी नागपूर महापालिकेला सूचना, यासाठी आवश्यक ती सर्व मदत नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटतर्फे करण्याची ग्वाही, म्युकरमायकोसिसच्या स्थितीचाही बैठकीतून घेतला आढावा
19:13 (IST)
शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर चोरणारी टोळी जेरबंद, पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई, या टोळीकडून 10 ट्रॅक्टर, 4 जीप, 6 बाईक्स जप्त; तब्बल 77 लाखांची चोरीची वाहनं हस्तगत, याप्रकरणी 4 आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांनी केली अटक
19:0 (IST)
बीएमसीच्या ग्लोबल टेंडरला 8 पुरवठादारांकडून प्रतिसाद
1 जूनपर्यंत टेंडरमध्ये सहभाग घेण्यासाठी मुदत वाढवली
पालिकेच्या म्हणण्याप्रमाणे आतापर्यंत 5 कंपन्यांशी चर्चा
3 पुरवठादारांनी आयत्यावेळी इच्छा व्यक्त केल्यानं मुदतवाढ
लसींचा पुरवठा सुरळीत व्हावा, पुरवठादारांकडून काही अडचणी न येण्यासाठी प्रयत्न
18:33 (IST)
लस मुलांसाठी प्रभावी असल्याचा 'मॉडर्ना'चा दावा
12 ते 17 या वयोगटासाठी लस सुरक्षित - मॉडर्ना
17:23 (IST)
पदोन्नतीत आरक्षण मुद्यावर कॉंग्रेसची झाली बैठक
हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे - नाना पटोले
सुप्रीम कोर्टाच्या अधीन राहून प्रमोशन द्या - पटोले
रिक्त जागा तातडीनं भराव्यात - नाना पटोले
आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार - नाना पटोले
'शासन निर्णय रद्द करायला सरकारला भाग पाडू'
7 मेचा शासन निर्णय असंवैधानिक - नाना पटोले
काढलेला जीआर तात्काळ रद्द करा - कॉंग्रेस
जीआर हा विश्वासात घेऊन काढलेला नाही - राऊत
मंत्रिमंडळ बैठकीत विषय आला नाही - नितीन राऊत
मुख्यमंत्री लवकरच आम्हाला वेळ देतील - नितीन राऊत
उपसमिती आमच्या आग्रहानं तयार झाली - राऊत
16:53 (IST)
मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक संपली
सह्याद्री अतिथीगृहात झाली महत्वाची बैठक
अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे होते उपस्थित
तरुणांच्या रखडलेल्या नियुक्तीवर चर्चा - अशोक चव्हाण
मराठा आरक्षण कायदेशीर प्रक्रियेवर चर्चा - चव्हाण
'विनायक मेटे आणि संभाजीराजेंच्या भूमिकेत फरक'
'संभाजीराजेंचा समाजाला न्याय मिळण्यासाठी प्रयत्न'
विनायक मेटेंची राजकीय भूमिका - अशोक चव्हाण
रस्त्यावर उतरण्यापेक्षा सुप्रीम कोर्टात बाजू मांडा - चव्हाण
'आरक्षणाबाबत राजकीय पोळी भाजण्याचं काम'
अशोक चव्हाणांचा भाजपवर हल्लाबोल
'केंद्राच्या पुनर्विचार याचिकेत आरक्षण भूमिका नाही'
कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स