LIVE : राज्यपालांना शेतकऱ्यांचं ऐकायला वेळ नाही, शेतकरी नेत्यांनी निवेदन फाडले

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | January 25, 2021, 16:55 IST
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  21:52 (IST)

  पद्मश्री पुरस्कारांची घोषणा - पुरुषोत्तम गंगावणे, नामदेव कांबळे, जसवंतीबेन पोपट, गिरीश प्रभुणे, सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री 

  जाहीर

  महाराष्ट्रातून रजनीकांत श्रॉफ यांना पद्मभूषण, नृपेंद्र मिश्रा, सुमित्रा महाजन यांना 'पद्मभूषण'

  तरुण गोगोई, रामविलास पासवान, केशुभाई पटेल यांना मरणोत्तर 'पद्मभूषण' जाहीर

  प्रसिद्ध पार्श्वगायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांना मरणोत्तर 'पद्मविभूषण'
  जपानचे पूर्व पंतप्रधान शिंजो आबे यांना 'पद्मविभूषण'

  20:35 (IST)

  ट्रॅक्टर रॅलीनंतर शेतकरी आणखी आक्रमक
  1 तारखेला संसदेवर काढणार मोर्चा

  20:21 (IST)

  राज्यात दिवसभरात 1,842 नवीन रुग्ण
  राज्यात 3,080 रुग्णांची कोरोनावर मात
  राज्यात दिवसभरात 30 रुग्णांचा मृत्यू
  राज्यातील रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 95.25%
  राज्यात एकूण 43,561 अॅक्टिव्ह रुग्ण

  20:18 (IST)

  राज्यात आज 477 केंद्रांवर लसीकरण
  35,816 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण

  20:8 (IST)

  वेगवान व कॅशलेस प्रवासासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील राजीव गांधी सागरी सेतू (वांद्रे-वरळी) आणि यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील पथकर नाक्याच्या सर्व मार्गिकांवर उद्यापासून 100 टक्के फास्टटॅग प्रणालीची अंमलबजावणी होणार

  19:58 (IST)

  प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचं अभिभाषण, नव्या पिढीला राष्ट्रपतींकडून संदेश, न्याय, समता, बंधुता आपली जीवनमूल्य, ही मूल्य जपणं आपलं कर्तव्य, सीमेवरील जवानांच्या कार्याचा गौरव, शेतकऱ्यांचंही राष्ट्रपतींनी केलं कौतुक

  19:35 (IST)

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या दुपारी नागपूरला जाणार, गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाचं उद‌्घाटन करणार

  19:12 (IST)

  नाशिक - ओझर विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी ओलांडला 2 लाखांचा टप्पा, आजपासून नाशिक-बेळगाव विमानसेवा सुरू, पालकमंत्री छगन भुजबळांच्या हस्ते बोर्डिंग पासवाटप, आठवड्यातून तीन दिवस नाशिक-बेळगाव विमानसेवा, या विमानसेवेमुळे उत्तर कर्नाटक, गोवा आणि कोल्हापूर झालं नाशिकसोबत कनेक्ट, स्टार एअर कंपनीकडून दिली जाणार विमानसेवा, अवघ्या 1900 रुपयांमध्ये पोहोचता येणार बेळगावला; दिल्ली, पुणे, अहमदाबाद, हैदराबाद, बंगळुरूनंतर नाशिककरांना आता बेळगाव ही एअर कनेक्टिव्हिटी

  18:46 (IST)

  सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकलची गुड न्यूज
  'लोकलसेवा सर्वांसाठी लवकरच सुरू होणार'
  यासंदर्भातील निर्णय घेणार -उद्धव ठाकरे
  मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आढावा

  18:36 (IST)

  'आझाद मैदानावर फडकवणार तिरंगा'
  सर्व संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाचा निर्धार

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स