• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Live Updates: केंद्रातील भाजप सरकार हे ब्लॅकमेलिंग सरकार, नाना पटोलेंची टीका

Live Updates: केंद्रातील भाजप सरकार हे ब्लॅकमेलिंग सरकार, नाना पटोलेंची टीका

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | October 24, 2021, 16:09 IST
  LAST UPDATED 10 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  23:25 (IST)

  टी-20 वर्ल्ड कप - भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबल्यात पाकिस्तानचा भारतावर दणदणीत विजय; बाबर आणि रिझवानची शानदार खेळी; पाकिस्ताननं भारताचा 10 विकेट्स राखून उडवला धुव्वा; पाकिस्तानकडून भारताचा लाजिरवाणा पराभव; भारतीय गोलंदाजांना विकेट घेण्यात अपयश; टी-20 वर्ल्ड कपच्या पहिल्याच मॅचमध्ये भारताकडून निराशा

  टी-20 वर्ल्ड कपमध्ये हायव्होल्टेज मॅच
  भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला
  पाकिस्तानचा भारतावर दणदणीत विजय
  बाबर आणि रिझवानची शानदार खेळी
  पाकनं 13 चेंडू राखून गाठलं विजयी लक्ष्य
  भारताचा 10 विकेट्सनं उडवला धुव्वा
  एकही विकेट न गमावता पाकिस्तान विजयी
  भारतीय गोलंदाजांना विकेट घेण्यात अपयश
  पाकिस्तानकडून भारताचा लाजिरवाणा पराभव
  टी-20 वर्ल्ड कपच्या पहिल्याच मॅचमध्ये निराशा

  20:40 (IST)

  एनसीबीच्या समीर वानखेडेंचं पोलीस आयुक्तांना पत्र
  मला ड्रग्ज प्रकरणात अडकवलं जातंय - वानखेडे
  चुकीच्या पद्धतीनं अडकवण्याचा प्रयत्न - वानखेडे
  'माझ्याविरुद्ध कोणतीही कारवाई केली जाऊ नये'
  हे प्रकरण माझ्या वरिष्ठांकडे आहे - समीर वानखेडे
  मला काही लोकांकडून धमक्या - समीर वानखेडे
  'तुरुंगात टाकण्याच्या, नोकरीवरून काढण्याच्या धमक्या'
  'एसीबी पोलीस महासंचालकांना पत्राची प्रत दिली' 

  19:14 (IST)

  साताऱ्यासह रत्नागिरी जिल्ह्यात भूकंपाचे धक्के
  देवरुख-संगमेश्वर दरम्यान बसले भूकंपाचे हादरे
  रत्नागिरीतील भूकंपाची तीव्रता 4.46 रिश्टर स्केल
  कोयना धरण परिसरही भूकंपानं हादरला
  कोयनातील भूकंपाची तीव्रता 3.9 रिश्टर स्केल
  भूकंपाचा केंद्रबिंदू वारणा खोऱ्यात 

  18:36 (IST)

  औरंगाबाद - पैठण दरोड्यातल्या अत्याचारित महिलांची विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंनी घेतली भेट; पोलिसांनी आतापर्यंत 3 आरोपींना पकडलं असून इतर आरोपीही लवकर ताब्यात घ्यावेत आणि 45 दिवसांत चार्जशीट दाखल करण्याच्या पोलिसांना सूचना - नीलम गोऱ्हे 

  16:54 (IST)

  प्रभाकर साईलच्या आरोपांवर एनसीबीचं निवेदन
  साईलचे आरोप समीर वानखेडेंनी फेटाळले
  प्रभाकर साईलचे आरोप तथ्यहीन - एनसीबी
  'साक्षीदाराकडे पुरावे असतील तर कोर्टात जावं'
  सोशल मीडियापेक्षा कोर्टात बोलावं - एनसीबी 

  16:44 (IST)

  पुणे - कुख्यात गुन्हेगार संतोष जगताप खून प्रकरण
  पोलिसांच्या गुन्हे शाखेनं 2 आरोपींना केली अटक
  पवन मिसाळ आणि महादेव अडलिंगेला अटक
  पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची माहिती 

  16:30 (IST)

  'आर्यन खानला सोडण्यासाठी पैशांची मागणी'
  'ड्रग्ज प्रकरण दाबण्यासाठी पैसे मागितले'
  प्रभाकर साईल यांचा गंभीर आरोप
  गोसावीचा बॉडीगार्ड असल्याचा साईलचा दावा
  मध्यस्थांमार्फत 25 कोटी मागितले - साईल
  गोसावी, सॅममार्फत पैसे मागितल्याचा आरोप
  शाहरुख खानच्या मॅनेजरशी बोलल्याचा दावा
  एनसीबीच्या कारवाईवर साईलचे प्रश्नचिन्ह
  साईल यांचे समीर वानखेडेंवर गंभीर आरोप
  जीवाला धोका असल्याचा साईल यांचा दावा

  'एनसीबीच्या पंचांचे आरोप धक्कादायक, गंभीर'
  'पोलिसांनी चौकशी करून सुमोटो कारवाई करावी'
  शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची मागणी

  'ड्रग्ज प्रकरणात 'एसआयटी' चौकशी करा'
  अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची मागणी
  'फिल्मसिटीत दहशत माजवण्यासाठी आर्यनवर कारवाई'
  मंत्री नवाब मलिक यांचा गंभीर आरोप

  16:6 (IST)

  भाजपचा सरकार अधिकाऱ्यांना  तोडपाणी करायला सांगते
  नाना पटोलेंचा गंभीर आरोप
  शाहरुख खानच्या मुलाला अडकवण्यासाठी केलेले हे प्रकरण- पटोले
  केंद्रातील भाजप सरकार हे ब्लॅकमेलिंग सरकार- नाना पटोले
  NCB च्या कारवाईमध्ये भाजपचा हात- नाना पटोले

  16:2 (IST)

  आरोग्य विभागाचा पेपर फुटल्याचा आरोप 
  अंधेरीतल्या साकीनाक्यातील सेंटरवर गोंधळ
  'क' गटाचा पेपर फुटला, विद्यार्थ्यांचा आरोप 
  एक तास आधीच पेपर फुटल्याचा आरोप
  परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचा प्रचंड गोंधळ 
  संतप्त विद्यार्थ्यांचा परीक्षा केंद्रावर ठिय्या 

  14:6 (IST)

  'आर्यनला सोडण्यासाठी पैशांची मागणी'
  'ड्रग्ज प्रकरण दाबण्यासाठी पैसे मागितले'
  प्रभाकर साईल यांचा गंभीर आरोप
  गोसावीचा बॉडीगार्ड असल्याचा साईलचा दावा
  मध्यस्थांमार्फत 25 कोटी मागितले - साईल
  गोसावी, सॅममार्फत पैसे मागितल्याचा आरोप
  शाहरुखच्या मॅनेजरशी बोलल्याचा दावा
  एनसीबीच्या कारवाईवर साईलचे प्रश्नचिन्ह
  साईल यांचे समीर वानखेडेंवर गंभीर आरोप
  जीवाला धोका असल्याचा साईल यांचा दावा

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स