• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Live Updates: गोवावाला कम्पाउंड मनी लॉन्ड्रिंग प्रकरण, नवाब मलिकांकडून ईडीला महत्त्वाची माहिती

Live Updates: गोवावाला कम्पाउंड मनी लॉन्ड्रिंग प्रकरण, नवाब मलिकांकडून ईडीला महत्त्वाची माहिती

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | May 24, 2022, 23:18 IST
  LAST UPDATED A MONTH AGO

  हाइलाइट्स

  23:15 (IST)

  - गोवावाला कम्पाउंड मनी लॉन्ड्रिंग प्रकरण

  - हसीना पारकरचा बॉडीगार्ड आणि ड्रायव्हर म्हणून काम पाहणारा सलीम पटेल राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होता, नवाब मलिक यांचा ईडीला जबाब

  - 2002 सालापासून मी सलीम पटेलला ओळखत होतो, तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होता आणि आणि राष्ट्रवादीचे तत्कालीन मुंबई अध्यक्ष चंद्रकांत त्रिपाठी यांच्या नेतृत्वात तो काम करत होता

  - नवाब मलिक यांनी जबाबात  गोवावाला कंपाउंड संदर्भात झालेल्या व्यवहाराच्या बऱ्याच गोष्टी माहिती न्हवत्या अस म्हटलंय

  - गोवावाला कम्पाउंडच्या संबंधित व्यवहारात नवाब मलिक यांचे भाऊ अस्लम मलिक यांचाही महत्वाचा रोल

  - 2005 साली मलिक यांनी सलीम पटेल विषयी लोकांना विचारलं त्यावेळी त्यांना त्याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचं सांगण्यात आलं असंही म्हटलं

  - सलीम पटेल हा हसीना पारकरचा अत्यंत जवळचा निकटवर्तीय होता, हसीना पारकरने केलेल्या जवळपास सर्व व्यवहाराची त्याला कल्पना असायची

  - गोवावाला कम्पाउंड संदर्भात झालेल्या व्यवहारात सलीम पटेलला नवाब मलिक यांच्याकडून 15 लाख मिळले होते

  - यातील दुसरा आरोपी सरदार शाहवली खान याला 5 लाख, हसीना पारकरला रोख स्वरूपात 5 लाख आणि चेकमध्ये 5 लाख असे पैसे देण्यात आले होते

  - हे पैसे नवाब मलिक यांचा मुलगा फराझ मलिक आणि भाऊ अस्लम मलिक यांच्यासमोर देण्यात आले होते

  21:39 (IST)

  दावोस - जागतिक आर्थिक परिषदेत करार
  80 हजार कोटींचे गुंतवणूक करार
  ऊर्जानिर्मिती क्षेत्रात 50 हजार कोटींची गुंतवणूक

  20:40 (IST)

  राज्यसभा निवडणुकीसाठी मविआची बैठक संपन्न
  सीएमसोबत प्रमुख नेत्यांची 'वर्षा'वर झाली बैठक
  बैठकीत राज्यसभा निवडणूक रणनीतीवर चर्चा
  स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर बैठकीत चर्चा

  19:37 (IST)

  संभाजीराजेंना उमेदवारी न दिल्यानं नाराजी
  संभाजीराजेंसाठी मराठा कार्यकर्ते आक्रमक
  शिवसेनेकडून आमचा विश्वासघात - राजे समर्थक
  आश्वासन पाळा, अजूनही वेळ गेली नाही - समर्थक
  शरद पवारांनी विश्वासघात केला - राजे समर्थक
  संजय राऊतांनी हे पाप केलंय - संभाजीराजे समर्थक
  'शिवसेनेला येत्या निवडणुकीत धडा शिकवणार'
  छत्रपतींचं नाव घेऊन महाराष्ट्राला धोका - समर्थक
  धोका या शब्दाचं नाव शरद पवार ठेवावं - समर्थक
  सेनेची शिव-शाहूंच्या विचारांशी गद्दारी - समर्थक
  'अजून 2 दिवस वाट पाहून रस्त्यावर उतरणार'

  18:47 (IST)

  - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सह्याद्रीची बैठक आटोपून 'वर्षा'वर निघाले
  - उपमुख्यमंत्री अजित पवार सह्याद्रीची बैठक आटोपून 'वर्षा'वर दाखल

  18:40 (IST)

  मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 'माहिती भवन' इमारत हस्तांतरणाचा सामंजस्य करार, 'माहिती भवन' प्रसारमाध्यमांसाठी उपयुक्त ठरेल - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

  18:1 (IST)

  अजित पवार, वळसे पाटील 'सह्याद्री'वर
  दुसऱ्या मजल्यावर महत्त्वाची बैठक सुरू
  बैठकीत या 2 नेत्यांसह 3 अपक्ष आमदार

  17:54 (IST)

  राज्यसभा निवडणुकीसाठी मविआची खास बैठक
  सीएमसोबत प्रमुख नेत्यांची 'वर्षा'वर 6 वा. बैठक
  थोरात, जयंत पाटील, एकनाथ शिंदे बैठकीला
  निवडणुकीच्या रणनीतीबाबत होणार चर्चा
  ओबीसी आरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक
  यासंदर्भातही बैठकीत चर्चा होण्याची शक्यता

  17:50 (IST)

  गडचिरोली जिल्ह्यात ट्रॉमा केअरसह सुसज्ज मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याला शासनाची तत्त्वत: मंजुरी, रुग्णालयासाठी तज्ज्ञ स्टाफच्या नेमणुकीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे निर्देश, जिल्ह्यात विमानतळ आणि गडचिरोली-वडसा-कोनसरी मार्गासाठी राज्य शासन रेल्वेला संमतीपत्र देणार, पालकमंत्री एकनाथ शिंदेंच्या मागणीला उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून सकारात्मक प्रतिसाद

  17:44 (IST)

  नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील वसुली प्रकरण, भाजप आमदार मंदा म्हात्रेंनी घेतली गृहमंत्र्यांची भेट, नवी मुंबईतील अवैध धंद्यांबाबत गृहमंत्र्यांना दिली माहिती, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी, पोलीस आयुक्तांशी गृहमंत्र्यांनी फोनवर केली चर्चा, राज्याच्या पोलीस महासंचालकांकडेही केली तक्रार, माहिती घेऊन संबंधितांवर कारवाई करणार - पोलीस महासंचालक

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स