• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Live Updates: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बदल, दोन्ही सभागृहांच्या कामाच्या वेळेत बदल?

Live Updates: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बदल, दोन्ही सभागृहांच्या कामाच्या वेळेत बदल?

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | January 25, 2022, 00:40 IST
  LAST UPDATED 4 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  21:20 (IST)

  संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत मोठी बातमी
  दोन्ही सभागृहांचं कामकाज वेगवेगळ्या वेळी होणार?
  जवळपास 700 ते 800 कर्मचाऱ्यांच्या कोरोनाचं वृत्त
  त्याच पार्श्वभूमीवर खबरदारी घेतली जाण्याची शक्यता
  राज्यसभा स.10 ते 3, लोकसभा संध्याकाळी 4 ते 9

  20:59 (IST)

  मुंबई उपनगर जिल्हा वार्षिक योजनेच्या 650 कोटींच्या निधीला मंजुरी 
  - उपमुख्यमंत्री अजित पवार
  पालकमंत्री आदित्य ठाकरेंच्या प्रयत्नांमुळे वित्तीय मर्यादेत अतिरिक्त 270 कोटींची भर

  20:36 (IST)

  जान देंगे, घर नहीं देंगे - जितेंद्र आव्हाड
  रेल्वे प्रशासन गरीबाला घाबरवतंय - आव्हाड
  'रेल्वे हद्दीतल्या झोपड्यांना खाली करण्याची नोटीस'
  लोक रस्त्यावर उतरतील, रेल्वे ठप्प होईल - आव्हाड
  'राज्य सरकार SRA अंतर्गत मदत करायला तयार'

  19:58 (IST)

  कोविड जनुकीय सूत्र निर्धारणांतर्गत 8व्या फेरीतील चाचणीचे निष्कर्ष; एकूण 280 नमुन्यांमध्ये 89% ओमायक्रॉन, 8% डेल्टा डेरिव्हेटिव्ह, 3% डेल्टा व्हेरियंटसह इतर उपप्रकारांनी बाधित नमुने; कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन

  19:55 (IST)
  मुंबई - 27 जानेवारीला सकाळी 10 ते 28 जानेवारीला पहाटे 4 पर्यंत एम/पूर्व आणि एम/पश्चिम विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा 18 तासांसाठी बंद; काटकसरीनं पाणी वापरून सहकार्य करावं, मुंबई महापालिका प्रशासनाचं नागरिकांना आवाहन
   
  19:43 (IST)

  तमाशा कलावंतांना राज्य सरकारचा दिलासा
  'राष्ट्रवादीच्या वेल्फेअर फंडातून एक कोटीची मदत'
  तमाशा कलावंतांनी घेतली शरद पवारांची भेट
  तमाशा सुरू करण्यास परवानगी - उपमुख्यमंत्री
  तमाशा सुरू करण्यास अडचण नाही - गृहमंत्री

  18:50 (IST)

  नागपूर - अश्लील व्हिडिओप्रकरणी 2 नवीन गुन्हे
  कुही, मौदा या 2 पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल
  आतापर्यंत आयोजकांसह 13 आरोपींना अटक

  18:41 (IST)

  मुंबई भाजप कार्यकारिणीची उद्या महत्त्वपूर्ण बैठक, बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरणार, विरोधी पक्षनेते घेणार कार्यकारिणीचा संपूर्ण आढावा

  17:7 (IST)

  नाना पटोलेंच्या बेताल वक्तव्याचा निषेध
  भाजप युवा मोर्चाचं नागपुरात आंदोलन

  16:49 (IST)

  ओबीसींसंदर्भात 'सह्याद्री'वरील बैठक संपली
  स्था.स्व. संस्थांमधील ओबीसी आरक्षणावर चर्चा
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हीसीद्वारे होते उपस्थित
  भुजबळ, शिंदे, परब, वडेट्टीवार होते उपस्थित
  सुप्रीम कोर्टातली पुढील सुनावणी 8 फेब्रुवारीला

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स